जरा टेन्शन देणार्या विषयावर जाणकार (तात्या, नाना आणि इतर) व्यक्तिंचा सल्ला घ्यावा असे वाटले म्हणून ही चर्चा.
मंदी आणि महागाई हळुहळू पाय पसरत आहेत. अशा वेळेस काय करावे? घरांच्या कर्जाचे व्याजदर वाढतात आहे, त्यामुळे परतफेडीचा काळ वाढणार, तसेच इतर कर्जेही महाग होणार.
असे दिसते आहे की ऑटो आणि आय टी इंडस्ट्री ची वाट लागणार - तसेच आय टी मधील बर्याच नोकर्या जातील (२०००-२००१ चे ले-ऑफ अनुभवलेत मी), परिणामी बरीच घरांची कर्जे बुडतील, त्यामुळे कदाचित जागांचे भावही खाली येतील. पण अशा परिस्थितीत काय करावे? कर्जे प्री-पेमेंट करून लवकर फेडावीत का? की व्याजदर ४-५ वर्षाने खाली येईल म्हणून वाट पहावी?
गुलाबी आंखे जो तेरी देखी...
कविता