वांग्याचे भरीत... (खांदेशी)
साहीत्य :
हिरवी मोठी वांगी - ४
जाड मिरच्या - ५ ते ६ (चवीनुसार)
लसुण पाकळ्या - ८ ते १०
कांद्याची पात बारीक चिरुन - १ वाटी
शेंगदाणे - १ मुठ
खोबरे काप - आवडीनुसार
कोथिंबीर - बारीक चिरुन आवडीनुसार
तेल तळण्यासाठी
फोडणी साठी - ओवा, मोहरी
मीठ चवीनुसार
कृती :
प्रथम वांग्यास बारीक छेद देवुन गॅसवर खमंग भाजुन घ्यावेत. भाजलेली वांगी गार झाल्यावर त्याची साले व देठे काढुन घ्यावीत. वांग्याचा गर चांगला स्मॅश करुन घ्याव्या.
मिरच्या कढईत थोडे तेल गरम करुन खमंग भाजुन घ्याव्यात. भाजलेल्या मिरच्या, कोथिंबीर, लसुण पाकळ्या एकत्र जाडसर भरडुन ठेचा करुन घ्याव्या.
कढईत २ डाव तेल गरम करुन त्यात ओवा व मोहरीची फोडणी करावी. त्यात शेंगदाणे व खोबरे काप खमंग तळुन घ्यावे. त्यात कांद्याची पात घालुन तेल सुटेपर्य॑त परतावे. त्यात मिरचीचा ठेचा व स्मॅश केलेला वांग्याचा गर घालावा. चवीनुसार मीठ घालुन व्यवस्थित एकत्र करुन घ्यावे. वरुन कोथिंबीर घालावी.
वांग्याचे भरीत तयार!!!!.......
हे भरीत गरम गरम पुरी किंवा कळण्याच्या भाकरी बरोबर एकदम झकास लागते.
वाचने
14272
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
आमचा वीक प्वाईंट!
In reply to आमचा वीक प्वाईंट! by विसोबा खेचर
+१
वांग्याचं भरीत म्हणजे आमचा वीक प्वाईंट!
मस्त
In reply to मस्त by वरदा
तै दा. कूट नाही ....
In reply to तै दा. कूट नाही .... by कुंदन
अरे हो
In reply to मस्त by वरदा
हाच प्रश्न आहे
वरदा...
In reply to वरदा... by बहुगुणी
पण
In reply to पण by वरदा
ग्रील करायला जमले नाही.
In reply to पण by वरदा
तेल..
In reply to तेल.. by प्रभाकर पेठकर
काका
In reply to काका by वरदा
पण गॅस नाही ना...
मस्त
भरीत भाजी
Ameriket Vange bhajayachi trik
In reply to Ameriket Vange bhajayachi trik by खादाड_बोका
बोकेराव, प्
In reply to Ameriket Vange bhajayachi trik by खादाड_बोका
अरे वा
आम्बे वाले तात्या
वरदा ताई,
In reply to वरदा ताई, by मी खवय्या
भारत
वाव..............
काल भरीत केलं
In reply to काल भरीत केलं by प्रियाली
आख्खे शेंगदाणे....
आई ग!
वा
रुचकर
कळण्याची भाकर
कळण्याची भाकरी...भरीत