श्रावण.
लेखनविषय:
पाहुणा पहाटे
अचानक धसमुसळा
जागवून गेला.
पाकळीवर ओल्या
भार .
थेंबाचा.
कोवळ्या सोवळ्या
पोरी सरीला,
उभंलावणं
भरजरी उन्हाचं.
वाचने
7954
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
छान आहे कल्पना...
परंतु कविता थोडीशी अपुरी वाटली. त्यामुळे मजा आली नाही...
आवडले. थोडक्या शब्दात आशय सांगतात.
बरोब्बर, अगदी हायकूचीच आठवण झाली. अप्रतिम.
आम्हाला पण कविता अपुरीच वाटली
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
रामदास यांच्या लिखाणातल्या अस्सलपणाने स्तिमित व्हायला होते.
रामदास , तुम्ही इतकी वर्षे नावाजलेल्या प्रकाशनांमधे लिखाण केले नाही याचे मला प्रचंड आश्चर्य वाटते आहे ! मिसळपाववर तुम्ही लिहीणे म्हणजे आमच्याकरता दुधात साखर !
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
असेच म्हणतो. मुक्तसुनित व नंदन यांना एखादी गोष्ट "अस्सल" वाटते यालाच सर्वोच्च दाद समजली जाते. बर्याचदा इट इज नेक्स्ट टु इंपॉसीबल की कुठले साहीत्य त्यांना अजुन कशासारखे वाटत नाही. या दोघांच्या नजरेतुन एक गोष्ट सुटेल तर शपथ. ;-)
कविता छान आहे पण तहान भागली नाही अजुन हवी. :-) एखादी सर सुरू झाली समजायच्या आत थांबावी असे..
ढगाच्या काळ्या
मनात
लोळ विजेचा
कपटी.
कोवळे झाड
बेचिराख.
पहिल्या आषाढात.
अशा बर्याच कविता होत्या. पण प्रसिद्ध केल्या नव्हत्या.
आता माध्यम उपलब्ध आहे म्हणून काहीकाही आठवतो आहे.
रामदास,
तिन्ही कविता सुंदर !!!
- सर्किट
In reply to जियो !!!!! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
मिताक्षरी मोती
खूप आवडल्या.
काही प्रश्न :
जिवण , दादरा म्हणजे नेमके काय ?
In reply to कविता by मुक्तसुनीत
मला वाटते त्या फडक्याला बरणीच्या तोंडाशी चिंधीने किंवा दोरीने करकचून बांधतात.
In reply to दादरा - बरणीच्या झाकणाला बांधतात ते फडके by धनंजय
बांधायचे फडके.
जिवण? माहीत नाही.
चतुरंग
दुसर्या दोन्ही समजल्या. (जिवण शब्द सोडून).
त्या दोनही कविता निखळ रत्नं आहेत!
रामदास, त्या दोन्ही कवितात शब्द तुमच्यासमोर चालत आलेत आणि मनाच्या कागदावर तुम्ही त्यांना उमटवले आहे.
कुठल्या कुठल्या अनुभवांचे मोती मनाच्या तळात सूर मारुन वर काढता पण ते काढताना गाळ ढवळला जाणार नाही ह्याची काळजीही घेता!
हीच प्रतिभा! जियो!!
चतुरंग
In reply to मला पहिली कविता संपूर्ण समजली नाही. by चतुरंग
दोन ओठांनी तयार होणारा तोंडाचा भाग. जिवणी, जिवण तोंड.
रामदासभू.......... बरेच दीस जाहले
तुमचे काव्य शब्द मिपावर नाही आले
छान..