मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"लाला! मी पास की नापास? "

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
लाला हा जन्माने मुसलमान होता असावा.बुटकीशी व्यक्ति,जेमतेम साडेचार फुट उंची,डोक्याला गुंडाळलेली पगडी (मुंडासे),खाली तोटके धोतर,वरती एक सदरा, रस्त्यातून चालताना मोकळे पाय,हातात आधाराला दांडका त्याची उंची थोडी त्याच्यापेक्षा जास्त,तोंड सतत पान खावून लाल दिसणारे,तिच तोंडातली लाल थुंकी दोन्ही बाजुच्या ओठाच्या फटीतून खाली ओघळणारी, मान सतत रस्त्याकडे खाली झुकलेली,चेहऱ्यावर दाढीचे खुंट,अशी ही व्यक्ति वेंगुर्ल्याच्या मेनरोड वरून सकाळी, मध्यांनी आणि तिन्हीसांजा झाल्यावर चालत जाताना हटकून दिसायची.वाटलंतर त्याला जाताना पाहून, दिवसाची घटका कळायला कठीण होत नसे. वेंगुर्ल्याचे लाल मातीचे त्यावेळचे रस्ते आणि

सांभाळा हो! मला कुणीतरी

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
(अनुवादीत. कवी- आनंद बक्षी) पाहूनी तुझे नयन गुलाबी मन माझे झाले शराबी सांभाळा हो! मला कुणीतरी माझेच सांभाळणे मला झाले आता अशक्यपरी असते एकच जशी प्रतिमा भिंतीवरच्या तस्वीरी आहे तशी तुझी प्रतिमा सदैव माझ्या अंतरी का झालो तुझ्यावर फिदा कळेल का एकदा विचार करूनी कळे ना मला संताप येई माझ्याच प्रीतिवरी ऐकून माझ्या मना गेलो मी पस्तावूनी माझाच मी नाही आता काय करू मी साजणी जादू तुझ्या नयनातली पाहून झालो मी तिचा दुष्मन वाटे सदैव मला रहावे जपून अनेक सुंदरी पासून शपथ तुझी सांगतो तुला वाचवी स्वपनातुनही मला अरेरे! मिळाले नयनासी नयन जरासे हास्य तुझे पाहून तसाच झालो मी घायाळ श्रीकृष्ण सामंत

मंदी, महागाई, कर्ज आणि गुंतवणूक

मनिष ·
जरा टेन्शन देणार्‍या विषयावर जाणकार (तात्या, नाना आणि इतर) व्यक्तिंचा सल्ला घ्यावा असे वाटले म्हणून ही चर्चा. मंदी आणि महागाई हळुहळू पाय पसरत आहेत. अशा वेळेस काय करावे? घरांच्या कर्जाचे व्याजदर वाढतात आहे, त्यामुळे परतफेडीचा काळ वाढणार, तसेच इतर कर्जेही महाग होणार. असे दिसते आहे की ऑटो आणि आय टी इंडस्ट्री ची वाट लागणार - तसेच आय टी मधील बर्‍याच नोकर्‍या जातील (२०००-२००१ चे ले-ऑफ अनुभवलेत मी), परिणामी बरीच घरांची कर्जे बुडतील, त्यामुळे कदाचित जागांचे भावही खाली येतील. पण अशा परिस्थितीत काय करावे? कर्जे प्री-पेमेंट करून लवकर फेडावीत का? की व्याजदर ४-५ वर्षाने खाली येईल म्हणून वाट पहावी?

वांग्याचे भरीत... (खांदेशी)

योगिता_ताई ·
साहीत्य : हिरवी मोठी वांगी - ४ जाड मिरच्या - ५ ते ६ (चवीनुसार) लसुण पाकळ्या - ८ ते १० कांद्याची पात बारीक चिरुन - १ वाटी शेंगदाणे - १ मुठ खोबरे काप - आवडीनुसार कोथिंबीर - बारीक चिरुन आवडीनुसार तेल तळण्यासाठी फोडणी साठी - ओवा, मोहरी मीठ चवीनुसार कृती : प्रथम वांग्यास बारीक छेद देवुन गॅसवर खमंग भाजुन घ्यावेत. भाजलेली वांगी गार झाल्यावर त्याची साले व देठे काढुन घ्यावीत. वांग्याचा गर चांगला स्मॅश करुन घ्याव्या. मिरच्या कढईत थोडे तेल गरम करुन खमंग भाजुन घ्याव्यात. भाजलेल्या मिरच्या, कोथिंबीर, लसुण पाकळ्या एकत्र जाडसर भरडुन ठेचा करुन घ्याव्या.

श्रावण.

रामदास ·
लेखनविषय:
पाहुणा पहाटे अचानक धसमुसळा जागवून गेला. पाकळीवर ओल्या भार . थेंबाचा. कोवळ्या सोवळ्या पोरी सरीला, उभंलावणं भरजरी उन्हाचं.

आली गौराई अंगणी....

धोंडोपंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी, शके १९३० - मंगळवार, १ जुलै २००८ सकाळी नेहमीप्रमाणे कन्सलटेशन सुरू होते. तेवढ्यात मोबाईल खणाणला. ऍड्रेस बुकातला नंबर दिसत नव्हता म्हणजे नेहमीच्या संपर्कातील व्यक्ती नसावी. आमची महत्वाच्या समस्येबद्दल जातकांबरोबर चर्चा चालू होती म्हणून कट केला. लगेच पुन्हा फोन. पुन्हा कट. तिसर्‍यांदा फोन आल्यावर पर्याय नव्हता. कोणीतरी भयंकर संकटात असेल तरच असे दोनदा फोन कट केल्यावर तिसर्‍यांदा फोन करतं. फोन उचलला. समोरून ते गृहस्थ किंचाळले, "अहो पंत, फोन काय कट करताय सारखा. मी कितीवेळ ट्राय करतोय. एक तर इथे पावसामुळे पाणी साचलाय. घरचा फोन बंद आहे.

ज्यूलीची श्रद्धा

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
" मी एक साधारण माणूस आहे.फक्त मी ज्याच्यावर विश्वास ठेवते,ज्यांच्यावर माझी श्रद्धा आहे त्यांवर मी लक्ष ठेवते." "ज्युली तू किती ग्रॆट आहेस " असं मी तिला म्हणालो. त्याचं असं झालं, माझी मोठी वहिनी गोव्याची.पेडण्याला तिचे आईवडिल राहायचे.लहानपणी माझ्या वहिनी बरोबर मी उन्हाळ्याच्या सुट्टीत तिच्या माहेरी अनेक वेळा गेल्याचं आठवतं. उन्हाळ्यात विशेष करून गोव्यात फळफळावळ,फुलं आणि मासे यांची लयलूट असायची.मांडकूर आंबा मला खूपच आवडायचा.तसं पाहिलं तर आंब्यांचा राजा हापूस आणि त्यात वाद नाही.हापूस आंबा नीट पिकल्यावर त्याचा जो गंध दरवळतो तो कुणाकडून लपून राहणार नाही.तसंच हा हापूस आंबा नीट पिकल्यावर कापला की त्