मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिसळपाव आता पोलिसांच्या ताब्यात! :)

विसोबा खेचर ·
लेखनविषय:
राम राम मंडळी, आता येथे जरा जपून लेखन करा बरं! कारंण आपलं मिसळपाव आता महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात गेलं आहे! :) अतिशय कष्टाने व जीव लावून मिसळपाव हे संकेतस्थळ उभारणारे मिसळपावचे तांत्रिक सल्लागार नीलकांतराव हे एम पी एस सी ची परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची पोलिस उप-निरिक्षक (PSI) या पदाकरता निवड झाली आहे.

द्विधा मनाचि

namdev narkar ·
लेखनविषय:
सा॑गु कसे तुला मी माझ्या मनातले ओठा॑त शब्द येन्या आधीच था॑बले ह्या मुक भावना असत्या तुला कळाल्या नसत्या का मग सरीता सागरास मिळाल्या ती नजरा नजर अन चोरुन पाहणे कावरे बावरे होउन गर्दीत मज शोधणे मग कळले मलाही सम भावना तुलाही मग कशास तिश्ठणॅ हे मन का देत नाही ग्वाही

पावसा!

ऋषिकेश ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कोरड्या हृदयात माझ्या बरसून जा रे पावसा एकट्या वाटेत माझ्या हरवून जा रे पावसा वाटतो विश्वास सार्‍या निश्चयाचा मेरू मी अंतरीच्या बालकाला रडवून जा रे पावसा नांदतो रुसवा जसा की डाग तो चंद्रावरी पाहण्या गाली खळी हसवून जा रे पावसा हासतो फसवा अन मी मनातच रडतो किती शुष्क या वैराण नयना भिजवून जा रे पावसा हाकतो होडी कुणी, भिजवतो-भिजतो कुणी बाळगोपाळांस सार्‍या जमवून जा रे पावसा वाटतो तु मित्र कोणा, कोणास तुची देव रे सार्‍यांस सारे देउनीही कमवून जा रे पावसा चिंब हे करसी असे प्रत्येक तु या मानसी भिजण्यास परतूनी यायचे ठरवून जा रे पावसा -ऋषिकेश

सेकंड इनिंग - ( रवि शास्त्री )

अमोल केळकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सेकंड इनिंग - आज काल बरेच क्रिकेटर, क्रिकेटची आपली पहिली इनिंग संपल्यावर समालोचन करणे चालु करतात. बर्‍याच खेळाडुंचे समालोचन ऐकताना( काही अपवाद वगळता ) वाटते की हा जो आत्ता सल्ले देत आहे ते, तो स्वतः खेळत असताना का नाही आचरणात अणायचा? म्हणजे 'दुसर्‍या सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडा पाषाण' असे काहीसे. असो.

जीवनाचे अंतिम उद्दिष्ठ काय?

Rupesh ·

II राजे II (verified= न पडताळणी केलेला) 05/07/2008 - 10:44
जीवनाचे अंतिम उद्दिष्ठ हा प्रश्न व पर्याय दोन्ही पण चुकीचे आहेत असे वाटतं.... आपल्या पैकी कीतीजण ह्या बद्द्ल विचार करत असतील..... मी तर नाही ! हा काही स्टेप्स आहेत ज्या मी ठरवल्या आहेत... त्यातील प्रत्येक पायरी जेव्हा मी चढतो तेव्हा परत नवीन पायरी चढ्ण्याची तयारी करतो... हाच जिवनाचा माझा मुलमंत्र आहे... बाकि तुमचे विचार वाचणे आवडेल ! राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

अवलिया 05/07/2008 - 16:42
उपभोग घेवुन मुक्ति का नाही? (भोगी व योगी) नाना वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील

विसोबा खेचर 05/07/2008 - 18:20
मी 'उपभोग घेणे' ला मत दिले आहे. परंतु नुसते 'उपभोग घेणे' असे नव्हे, तर आयुष्याचे सगळे भोग भोगत उपभोग घेणे हे मला अधिक संयुक्तिक वाटते! असो... नानांचं उत्तर पटलं! आपला, (भोगी आणि योगी) तात्या.

धनंजय 06/07/2008 - 01:45
तशी मला ही तिहेरी मतचाचणी पटलेली नाही. वर सर्वांनी याबद्दल स्पष्ट सांगितलेच आहे. तरी जगत राहाणेचा अर्थ मी "मन लावून जगत राहाणे" असा घेतला आहे. " अर्थातच मनापासून जगण्याची शक्ती, अनुभव घेण्यासाठी संवेदना, या सर्व गोष्टी जन्माला आलो म्हणूनच माझ्यापाशी आलेल्या आहेत. "आलिया भोगासी [जणू काही जन्माला आलो ही मोठी कटकट आहे] म्हणून जीवन कंठणे" हा अर्थ मला मान्य नाही. आनंदमय अनुभव समोर असताना जीवनात त्याला मनापासून जागा करणे म्हणजेच भोग घेणे. विरक्त विचार जीवनात येताना त्यांना मनापासून विचारात घेणे, हेही "मनापासून जगणे".

एक 06/07/2008 - 21:54
निदान इंजिनियरिंग मधे जो पर्यंत ती माझ्या वर्गात होती तो पर्यंत तरी.. ;) जोक्स अपार्ट खरं ध्येयही हेच आहे.. -(फ्री युवर माईंडवाला) एक.

श्रीकृष्ण सामंत 07/07/2008 - 01:49
जीवनाचे अंतिम उद्दिष्ठ काय? असं विचारून त्या खाली जी उद्दिष्ठ आपण दिली आहेत त्याच्या बाहेर जाऊन जर माझ्या मनाला वाटतं ते उद्दिष्ठ देण्यास आपण परवानगी दिलीत,मुभा दिलीत, तर मी म्हणेन, "जीवनात अंतिम उद्दिष्ठ असावं यशस्वी होणं" म्हणजे काय? तर हंसत राहणं खूप प्रेम करणं विद्वानाकडून आदर प्राप्त करणं लहानांकडून प्रेम संपादन करणं प्रामाणिक माणसाकडून शाबासकी घेणं. खोट्या मैत्रीतून झालेला गैरविश्वास सहन करणं सौंदऱ्याची स्तुती करणं. इतरा मधलं चांगलं तेव्हडंच पहाणं. "मीपणा" सोडून देणं उत्साही राहून हंसणं,गाणं , खिदळणं आणि शेवटी आपल्यामुळे जगातला एक प्राणी सुखाने श्वास घेऊ शकला याची जाणीव होणं म्हणजेच माझ्या मते यशस्वी होणं आणि यशस्वी होण्याचं उद्दिष्ठ साध्य करणं www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

विकास 07/07/2008 - 02:23
मला एकदम भा.ब. बोरकरांच्या कवितेतील सुरवातीच्या ओळी आठवल्या: तो स्वर्ग नको, सुरलोक नको, मज लोभस हा इहलोक हवा ती तृप्ती नको, ती मुक्ती नको, मज येथील हर्ष नी शोक हवा...

मदनबाण 07/07/2008 - 02:56
आलोय जन्माला म्हणून जग् त राहणे याला दुसरा पर्याय आहे का कोणाकडे?जो पर्यंत मृत्यु येत नाही तो पर्यंत जगण्याशिवाय दुसरं काय करणार ? ऊपभोग घेणे याचा अर्थ मी आयुष्याचा पुरेपुर आनंद घेणे असा घेतला आहे .. मुक्ति मिळवणे मृत्यु हेच अंतीम सत्य असल्याने मुक्ति मिळवणे हे टारगेट (अंतिम उद्दिष्ठ) असावे.. मायेचा खेळ ज्याने ओळखला व ज्याला सर्व गोष्टींतला मोह सोडला आला त्याला मुक्ति मिळवणे अवघड नाही. मदनबाण..... The Soul is Eternal, Steady and Ever Existing. Weapons cannot destroy him nor can fire burn him; Water cannot wet him nor can air dry him up. The Soul is Immortal. -------- Lord Krishna From The Bhagwadgita

वैशाली हसमनीस 07/07/2008 - 13:28
मनात खरोख्ररीची माणुसकी ठेवून माणसासारखे वागणे ,निदान जास्तीत जास्त वागण्याचा प्रयत्न करणे हेच माझ्यामते जीवनाचे उद्दिष्ट असावे.मुक्ति वगैरे नंतर.माणूस म्हणून जगणे महत्त्वाचे.

आशिष सुर्वे 15/07/2008 - 18:49
एकच ध्येय... माझ्या आई-बाबांना सुखी ठेवणे....

पिवळा डांबिस 16/07/2008 - 07:21
जीवनाचे अंतिम उद्दिष्ठ काय? वेदनाहीन मरण!

दनिलेश 28/07/2008 - 06:23
तुम्ही कितिही उद्दिष्ठ ठरवा, कितिही प्रयत्न करा......... पण शेवटी काय? ............. " होनी तो होकेही रहेगी" .......... so do whatever u want........ do by ur heart and Njoy ur creations...........

सोने

सुवर्णमयी ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
सोने अघटित घडले त्या बाजारी जेव्हा पडले सोने शेती फुलले , जमिनीमध्ये आहे दडले सोने! जरी भाजले तरी राहते कसे बरे हे तसेच सोने? कळेल का मज असे कोणत्या मुशीत घडले सोने? निघून गेली कष्टामध्ये सगळी वर्षे आणिक- आयुष्याच्या संध्याकाळी मग सापडले सोने! (नॉर्थ ड्कोटा येथे एका वृद्ध जोडप्याच्या मागील अंगणात खनिज तेल सापडले:) आणि ते कोट्याधीश झाले या बातमीवर आधारित) चकाकणारे सारे खरेच नसते येथे सोने अंधार्‍या रात्री एकाकी हळूच रडले सोने स्पर्श लाभता सार्थक होई अवघ्या आयुष्याचे - कोंदणात मग हिरा वसवण्या बघ धडपडले सोने

माझी कविता

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
प्रयत्नही करुनही जमत नाही कविता तेव्हा होणारा वैचारिक मनस्ताप माझ्या अहंकाराला डिवचतो. ही अस्वस्थता कोसळत जाते, तिन्ही सांजेला. धुक्यात लपेटलेल्या रस्त्यावरुन कवितेला बिलगुन चालतांना कोणताच विचार मला सुचत नाही. ऐनिलिसिस करता येत नाही गुदमरलेल्या श्वासांचा. आभाळ भरुन आल्यावर मी डोकावून पाहतो, निर्वासित वेदनांच्या गोंगाटात दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत, माझी कविता एकाकी असते.

मैत्री

अनंतसागर ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
गवळ्याने दुधात पाणी घातलं होतं, ते दुध माईनं चुलीवर ठेवलं होतं. इकडे पातेल्यात मात्र निराळीच काहानी होती, दुध आणि पाण्याची मैत्री झाली होती. पातेल्याची गर्मी वाढू लागली, तशी दुधातल्या पाण्याची वाफ होऊ लागली. हे पाहून दुध दु:खी झाला, त्याने पाण्याला अटकाव केला. सायीचा थर त्याने दिला ठेऊन, पाणी बिचारं त्यात बसलं अड्कून. इच्छा असताना त्याला दुधात राहता येईना, सायीच्या भिंतीने बाहेर जाता येईना. शेवटी कंटाळून दुधाला म्हणालं पाणी, "जाऊ दे मला नाही तर नष्ट होऊ आपण दोन्ही." पाण्याचे शब्द ऐकून दुध त्याला म्हणाला, "मरणाची भीती नाही आपल्या मैत्रीला." पाण्याने दुधाला खुप समजावलं, पण दुधने त्याचं एक

मराठी नाटक बंगालीत ..

अभिरत भिरभि-या ·
मराठी नाटक देश पातळीवर पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. आपल्या मराठी नाटकांचे अनुवाद, पुनर्प्रयोग इतर भाषांमधे ही होताना दिसतात.शिरिष आठवल्यांचे एक नाटक नुकतेच बंगाली रंगमंचावर सादर झाले. देश नामक एका आघाडीच्या बंगाली मासिकाने यावर नुकताच परिक्षणात्मक लेखही छापला.मि.पा. च्या वाचकांसाठी त्याचा गोषवारा मुळ लेखक: सुब्रतो घोष . मानुषेर समान मानुष बंगाली नाट्यविश्वात असे कित्येक 'दल' आहेत जे भलेही डामडौलात नसले तरी मोठ्या कष्टाने बंगाली नाटक जोपासताहेत.

आमची पन्नासावी लग्नगांठ

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आमची पन्नासावी लग्नगांठ "एव्हडी वर्ष लग्न टिकून रहाण्याचं एक कारण म्हणजे एकमेकाला वाढू देणं,बदलू देणं." "गेली पन्नास वर्ष एकाच व्यक्ति बरोबर प्रेमाने राहिलो" असे उद्गार तोंडून यावेत हिच मुळी लगन्नाच्या जीवनाची केव्हडी मोठी देणगी-म्हणजे गीफ्ट- असावी.