मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

श्रावण.

रामदास · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
पाहुणा पहाटे अचानक धसमुसळा जागवून गेला. पाकळीवर ओल्या भार . थेंबाचा. कोवळ्या सोवळ्या पोरी सरीला, उभंलावणं भरजरी उन्हाचं.

वाचने 7954 वाचनखूण प्रतिक्रिया 16

विसोबा खेचर Wed, 07/02/2008 - 16:56
छान आहे कल्पना... परंतु कविता थोडीशी अपुरी वाटली. त्यामुळे मजा आली नाही...

मुक्तसुनीत गुरुवार, 07/03/2008 - 08:18
रामदास यांच्या लिखाणातल्या अस्सलपणाने स्तिमित व्हायला होते. रामदास , तुम्ही इतकी वर्षे नावाजलेल्या प्रकाशनांमधे लिखाण केले नाही याचे मला प्रचंड आश्चर्य वाटते आहे ! मिसळपाववर तुम्ही लिहीणे म्हणजे आमच्याकरता दुधात साखर !

In reply to by मुक्तसुनीत

सहज गुरुवार, 07/03/2008 - 08:45
असेच म्हणतो. मुक्तसुनित व नंदन यांना एखादी गोष्ट "अस्सल" वाटते यालाच सर्वोच्च दाद समजली जाते. बर्‍याचदा इट इज नेक्स्ट टु इंपॉसीबल की कुठले साहीत्य त्यांना अजुन कशासारखे वाटत नाही. या दोघांच्या नजरेतुन एक गोष्ट सुटेल तर शपथ. ;-) कविता छान आहे पण तहान भागली नाही अजुन हवी. :-) एखादी सर सुरू झाली समजायच्या आत थांबावी असे..

In reply to by सहज

रामदास गुरुवार, 07/03/2008 - 10:43
जिवण तोंडावर घट्ट दादरा बांधून माय म्हणते. मोठी झाली बाय माझी. येता जाता अंधारात माजघराच्या लपू नको आता. अशा छोट्या कविता लिहून बघण्याचा प्रयोग केला होता त्याचा एक नमुना.

रामदास गुरुवार, 07/03/2008 - 19:00
ढगाच्या काळ्या मनात लोळ विजेचा कपटी. कोवळे झाड बेचिराख. पहिल्या आषाढात. अशा बर्‍याच कविता होत्या. पण प्रसिद्ध केल्या नव्हत्या. आता माध्यम उपलब्ध आहे म्हणून काहीकाही आठवतो आहे.

सर्किट Fri, 07/04/2008 - 01:22
रामदास, तिन्ही कविता सुंदर !!! - सर्किट

चतुरंग Fri, 07/04/2008 - 04:59
दुसर्‍या दोन्ही समजल्या. (जिवण शब्द सोडून). त्या दोनही कविता निखळ रत्नं आहेत! रामदास, त्या दोन्ही कवितात शब्द तुमच्यासमोर चालत आलेत आणि मनाच्या कागदावर तुम्ही त्यांना उमटवले आहे. कुठल्या कुठल्या अनुभवांचे मोती मनाच्या तळात सूर मारुन वर काढता पण ते काढताना गाळ ढवळला जाणार नाही ह्याची काळजीही घेता! हीच प्रतिभा! जियो!! चतुरंग