नातं - भाग १
नातं
कुण्या एका गावाच्या वेशीवर एक कुटुंब छोट्याश्या घरात रहात असतं. आईवडील आणि त्यांची चार मुलं. आईवडील वेशीबाहेरच्या जंगलात जाऊन वनौषधी गोळा करून गावातल्या एका वैद्याला विकत असत. त्यातून मिळणार्या पैशांतून घर चालत असे. दोन वेळेचं जेवण कसंबसं भागत होतं. वडिलांकडे वंशपरंपरागत आलेलं वनौषधी आणि आयुर्वेदाचं ज्ञान त्यांना जंगलात वनस्पती निवडण्यात कामी येत होतं. आईचं काम होतं त्यांना मदत करणं आणि चूल पेटवण्यासाठी लाकडं गोळा करणं. कित्येक वर्षं हे नित्यनियमाने सुरू होतं.
मुलं मोठी होत गेली. जसजशी मुलं मोठी होत गेली तसतसं आईवडील आणि मुलांमधलं अंतरही वाढत गेलं.
आम्ही अस्पृश्याची पोरे
विठ्ठलाचा पुत्र
रुक्मिणीचा बाळ
संन्याशाचे पोर
म्हणूनी अस्पृश्य
नका देऊ अन्न
नका देऊ पाणी
नका देऊ थारा
पहा हा अस्पृश्य
सावली पडता
दूर हो म्हणती
शिव्या शाप देती
म्हणती अस्पृश्य
दुषणे ठेविली
भिक्षा नाही दिली
मुंज नाही केली
ठेविले अस्पृश्य
ज्ञानराज श्रेष्ठ
भक्तराज श्रेष्ठ
योगीराज श्रेष्ठ
परि तो अस्पृश्य?
गीता उपदेशी
बोले ज्ञानदेवी
ज्ञान करी मुक्त
परि तो अस्पृश्य?
विठोबाचा प्राण
विसोबाचा गुरू
नामयाचा बाप
परि तो अस्पृश्य?
जनीची साजणी
दीनांची माउली
संतांची साउली
तरी ती अस्पृश्य?
काव्यरस
छावणी - २
http://www.misalpav.com/node/29500
*******
३ जून १९४७ !!
या दिवशी दिल्लीहून आकाशवाणीवरुन एक महत्वाची घोषणा केली जाणार होती.
जनाब जिन्हांना अपेक्षीत असलेलं पाकीस्तान मिळणार की नाही? हिंदुस्तान एकसंध राहणार की देशाची फाळणी होणार? फाळणी झालीच तर ती नेमक्या कोणत्या आधारावर? पश्चिमेला पंजाब आणि पूर्वेला बंगाल यांच्यातील नेमका कोणता भाग पाकीस्तानमध्ये जाणार? पाकीस्तान झालंच तर तिथल्या हिंदू आणि शीखांचं काय? त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार? पाकीस्तान की हिंदुस्तान?
उभ्या हिंदुस्तानातील अनेकांचं भवितव्य या घोषणेवर अवलंबून होतं.
फुलपाखरू उद्यान
नमस्कार
धागा भटकंती मधे उघडावा की कलादालन मधे ते समजत नव्हतं. शेवटी भटकंती मधे उघडायचं ठरवलं. भटकंती फार लांबची नाही. ठाण्यातलीच. ओवळेकर वाडी, ओवळा, येथे हे फुलपाखरू उद्यान आहे. अनेक वर्ष फुलपाखरं, त्यांना पोषक ठरणारी झाडं इत्यादी बाबींचा अभ्यास करत हे उद्यान उभारलं गेलेलं आहे.
इथे जाण्यासाठी घोडबंदर रोड वर हायपरसिटी सोडलं, की डावीकडे वेदांत हॉस्पिटल लागतं, ते गेलं की डावीकडे अतिशय छोटी गल्ली आहे. 'श्री गावदेवी कडे' असा फलक तिथे लावलेला आहे. तिथून आत जायचं. दोनच मिनिटांवर एल्व्हिस बटरफ्लाय गार्डन लागतं, पण ते 'हे' नव्हे.
अंधार क्षण भाग ३ - वुल्फगांग हाॅर्न (लेख १२)
अंधार क्षण - वुल्फगांग हाॅर्न
२२ जून १९४१. पहाटे ४.३० वाजता जर्मन तोफखान्याचा पहिला गोळा सोविएत हद्दीत आदळला आणि जगातल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात संहारक आक्रमणाला प्रारंभ झाला. या तोफखाना दलाचं नाव होतं पँझर. तोपर्यंत जर्मनीने दुस-या महायुद्धात मिळवलेले सगळे नेत्रदीपक विजय हे पँझरचंच कर्तृत्व होतं.
एकामागोमाग एक तोफगोळे सोविएत सैनिकांवर आणि तटबंदीवर आदळत होते. ते दृश्य बघून २२ वर्षांचा वुल्फगांग हाॅर्न प्रचंड भारावून गेला होता. " आमच्या सैन्याची ताकद बघून जी भावना मनात आली तिचं शब्दांत वर्णन करता येणार नाही.
एका अडनिड गावाची गोष्ट........२
एका अडनिड गावाची गोष्ट........१
*
हणम्या आणि रम्याची चिता धडाडत पेटली होती, अगतिकतेने सारं गाव त्या चितेकडे डोळे सताड उघडे टाकून पाहत होते. बळीवर बळी ते घेत होते, पण आधी गावाच्या वेशीभायेर असलेलं भय आता गावाच्या जागृत बिरोबाच्या मंदिरापर्यंत पोचलं होते, म्हणजे आता त्यांचा वावर गावभर होता? असला प्रश्न चेहरयावर घेऊन प्रत्येकाचे डोळे त्या दोन चिता पहात होत्या.
मराठा आरक्षण दोन्ही बाजू
मराठा आरक्षण या विषयावर पुन्हा चर्चा सुरु झालेली आहे. याचे कारण न्यायालयाचा आलेला निकाल.
या विषयावर टिव्हीवर सर्व बाजू मांडणारी चर्चा झाली. कुठलेही मत बनवण्यापूर्वी ही चर्चा जरूर पहा.
यात तज्ञांनी मांडलेले काही महत्त्वाचे मुद्दे
राज्यकर्त्या जमातीलाच बॅकवर्ड ठरवण्याचा प्रयत्न झालेला आहे.
एका नव्या इतिहासाची सुरुवात -१
ही एक काल्पनिका आहे – फँटसी. मराठीत दुर्मिळ असलेला प्रकार. इथे तांत्रिक तपशिलापेक्षा कथानकात रस घ्यावा अशी वाचकांना विनंती आहे. शक्यतेच्या पातळ्या तपासण्याचे निकष मानवी ज्ञानाच्या कक्षेत कमी आहेत. शास्त्रे भौतिक पातळ्या तपासू शकतात. अभौतिक अस्तित्वे शास्त्रीय उपकरणांनी टिपता येणार नाहीत. कलाकाराचा मेंदू अन व्यवहारी माणसाचा मेंदू यात वैद्यकीय उपकरणे तारतम्य करू शकतील का शंका आहे.
तेव्हा चिकित्सक दृष्टीपेक्षा तरतम दृष्टी ठेवली तर या कथेचा चांगल्या प्रकारे आस्वाद घेता येईल.
..
मिसळपाव