ही वाट भटकंतीची: १२ हिमाचल
प्रत्येक वर्षी नोव्हे-डिसे मध्ये महाराष्ट्रा बाहेर फिरायला जायचे असे ठरवले होते, पण काही कारणाने या काळात जाता न आल्याने वाईट वाटले. आणि मग त्याची कसर भरुन काढण्यासाठी उन्हाळ्यात कोठे फिरायला गेले पाहिजे याची लिस्ट काढणे सुरु झाले. काश्मीर की हिमाचल या २ ठिकाणांपर्यंत फायनल झाले. पण नक्की कोठे जायचे ते काही फायनल होईना. सरते शेवटी हिमाचल (शिमला.. कुल्लू..मनाली) ला जाण्याचे ठरवले. पुन्हा उन्हाळ्यात जायचे म्हणजे, मुलांच्या (दूसर्यांच्या) परीक्षा संपलेल्या, लग्न झालेली उत्साही मंडलींची गर्दी हे टाळलेच पाहिजे असे वाटले. त्यामुळे प्लॅन थोडा आधी करावा असे वाटले.
मिसळपाव