मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

त्या गेंड्याची दोन पावले - (विडंबन)

विदेश ·
लेखनविषय:
काव्यरस
' (चाल - या डोळयांची दोन पाखरे ..) त्या गेंड्याची दोन पावले, फिरतील तुमच्या भवती - पाठलाग ती सदैव करतील, फक्त मताच्यासाठी ..... वर्तन तुमचे, हात असे हो त्या गेंड्याचा थारा सहवासातून हवाच त्याला, नित्यच तुमचा नारा तुमचा परिचय त्यास हो आंदण, बिलकुल मताचसाठी .. भाव देतही असतील काही, पैसा अडक्यातुनी एका मताचसाठी तुमचे धरतील कर दोन्ही आहेत डोळे, क्षणैक प्रीती, ते तर खुर्चीवरती .. .

माळ्याच्या मळ्यामधी कोण गं उभी....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मराठी गाणी म्हटली की कुठून सुरुवात करावी असा प्रश्न पड्तो. ढोबळमानाने ’पैल तो गे काऊ पासून सुरुवात करुन.. अंगनी माझ्या मनीच्या मोर नाचु लागला इथपर्यंत अनेक मराठी गाण्यांनी आपल्याला भरभरुन आनंद दिला आहे. संत,पंत आणि तंत (शाहिरी) काव्यात मराठी ओवी,अभंग, लावण्या आणि कवितांची गाणी कधी झाली हे आपल्या लक्षातही आलं नाही. मराठीतील ही सर्व गाणी अतिशय सुंदर अशी फुलली आहेत. कोणतं गाणं सुरेख असं म्हणायला गेलो की बोटाच्या चुटकीतून प्रत्येक सुंदर असं गाणं निसटून जातं. एकच एक गाणं आपल्याला आवडतं असं कधी म्हणता येत नाही.

तुमच्या लुमियासाठी { Microsoft Nokia Lumia }

मदनबाण ·
तर मंडळी आता अ‍ॅन्ड्रॉइड वरुन विंडोज ८.१ {अपडेट} वर शिफ्ट झालो आहे. नव्या ओएस आणि नव्या फोनचा अनुभव चांगला आहे. अ‍ॅन्ड्रॉइडच्या युजर इंटरफेसला आता अनेकजण कंटाळले आहेत, आणि सर्व जण नव्या नव्या ओएस वापरण्यास उत्सुक आहेत. हा धागा लुमियाचे अनुभव / अ‍ॅप्स / सेटिंग्स /सिक्युरिटी / तांत्रिक माहिती यासाठी पूर्णपणे खुला आहे, इथे मिपावर लुमिया वापरकर्ते आहेतच त्यांनीही त्यांना माहित असलेल्या गोष्टींची भर या धाग्यात जरुर घालावी.

अंधार क्षण भाग १ - पेट्रास झोलिओंका (लेख ३)

बोका-ए-आझम ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अंधार क्षण - पेट्रास झोलिओंका २२ जून, १९४१ या दिवशी नाझी जर्मनीने सोविएत रशियाविरुद्ध आपल्या महत्वाकांक्षी 'आॅपरेशन बार्बारोसा ' ची सुरूवात केली आणि जगातली आजवरची सर्वात मोठी युद्ध आघाडी - पूर्व आघाडी उघडली गेली. जगातल्या सर्वात भीषण लढाईला सुरुवात झाली.  त्यावेळी जवळजवळ सगळा पश्चिम युरोप हिटलरच्या पायाशी लोळण घेत होता. दोनच शत्रू जिंकायचे राहिले होते - ब्रिटन आणि रशिया. सुरूवातीला  हिटलरने हवाई सामर्थ्याच्या जोरावर ब्रिटन जिंकायचा प्रयत्न केला पण ते जमत नाही हे कळल्यावर त्याने आपलं लक्ष पूर्वेकडच्या सोविएत रशियाकडे वळवलं.

आल्प्सच्या वळणांवर - भाग ३ - स्टेलव्हिओ पास ते विल्डर्सविल

मधुरा देशपांडे ·
आल्प्सच्या वळणांवर - भाग १ , भाग २ हा दिवस सगळ्यात लांबच्या प्रवासाचा होता. सकाळी लवकरच हॉटेल मध्येच नाश्ता करून बाहेर पडलो. आम्ही गाडीत सामान ठेवत असतानाच एक आजोबा या घाटातून सायकलने वर जात होते. युरोपात सायकल तशी काही नवीन नाही. रोज ऑफिसला २०-२२ किमी सायकलने येणारे अनेक लोक आहेत. पण या इतक्या उंच चढावरून सत्तरीच्या आसपासचे आजोबा सायकलने जात होते. कमाल. हॅट्स ऑफ एवढे दोनच शब्द आले मनात.

आज जानेकी ज़िद ना करो (दोन)

संजय क्षीरसागर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज जाने की ज़िद न करो (एक) ही गज़ल (म्हणजे तिचा काव्यविषय), जनसामन्यांसाठी कवि-कल्पना आहे. त्यामुळे, उर्दू शायरी ज्या प्रेमाची कहाणी आहे ते प्रेम, ती `उल्फ़त' काय आहे ते आधी सांगायला हवं. उर्दू गज़लेत प्रिया कधीही पत्नी होत नाही, ती फक्त एक ‘चाहत’ असते. पूरे-उम्र-भरकी चाहत. सार्‍या आयुष्याला पुरुन उरेल अशी अभिलाषा! म्हणजे प्रियकराचं प्रेम बेतहाशा असतं पण ती कधीही त्याला संमती देत नाही.

अश्वत्थामा -3

निलरंजन ·
लेखनविषय:
मागील लेख इथे वाचा * अश्वत्थामा * अश्वत्थामा भाग-2 अश्वत्थामाच्या राज्यकारभाराबद्दल आणि त्याच्या विवाहाबद्दल महाभारतात कुठल्याही प्रकारचे भाष्य केलेले माझ्या वाचनात नाही द्रोणाचार्यांनी पांचाल राज्याचे तुकडे केल्याने द्रुपदाचा तिळपापड झाला आणि त्यातच त्यांनी द्रोणवधाचा प्रण केला आणि त्यासाठी केलेल्या यज्ञातून जन्म झाला पांचाली द्रौपदीचा आणि दृष्टिध्रुम्नचा... पांडव आणि कौरवांच्या शक्ती प्रदर्शनात मध्येच आलेल्या कर्णाला अर्जुनाशी युद्ध करण्याची इच्छा होती पण भीष्मांनी त्याला तुझ्यासारख्या सु

निरवतापाची जत्रा

निराकार गाढव ·
अताशा निरवतापाच्या जत्रंला पूर्वीसारखी मजा नाय रावली. तुमी इचाराल ह्यो निरवताप कोणचा गाव... तर आपल्या सार्वेजेनिक पारापासून तसा अगदी हाकंच्या अंतरावर हाय. येक पाच कोस आलिकडं म्हनाना. तर निरवतापात खूप जत्रा लागतात. खंडोबाची जत्रा, नीळावण्ती देवीची जत्रा, अंबाबायचा गोंदोळ, ग्यानबाची पाल्की, नरसोबाची गाडी,...  निसता उच्छाद असतुया. पोरं आयबापाची नजर चुकावून सांजंला साळा सुटली की उणाडक्या करत जत्रंत शिरायची. मलाबी त्ये बरुबर घ्यायची. गरदीमद्दे लै धम्माल आसायची. देवीच्या म्होरं पोरं लेझीम खेळायची. मंग मोट्टे मानसं पोरांस्नी कायतरी खायाला द्यायच्ये आन एक दोन रुपं बी हाती टिकवायच्ये.

एक उनाड दिवस- कान्हूरपठारावर

प्रचेतस ·
कान्हूरपठार-नगर, पुणे जिल्ह्यांमधे पसरलेला एक ओसाड, रखरखीत, बोडका प्रदेश, फारशा खोल नसलेल्या पण तरीही भरपूर दर्‍याखोर्‍यांनी व्यापलेला पठारी भाग. इथल्या विशिष्ट भूरचनेमुळे त्याहीपेक्षा निसर्गाच्या किमयेने इथे भूरूपांच्या चित्रविचित्र संरचना तयार झाल्या आहेत जशी निघोजची रांजणकुंडे, गुळूंचवाडीचा नैसर्गिक शिलासेतू, वडगाव दर्याचे लवणस्तंभ. ह्या नैसर्गिक भूरूपांबरोबरच विविध देवस्थांनांनीसुद्धा हा प्रदेश समृद्ध आहे जसे निमगावचा खंडोबा, कन्हेरसरची देवी, कवठ्याची यमाई. पश्चिम महाराष्ट्रातील बर्‍याच जणांची कुलदैवते ही याच प्रदेशातील आहेत.

'बॅंग बँग' अर्थात् 'संगीत डोक्याला शॉट'

घाटावरचे भट ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हे प्रकरण परवाच पाहाण्यात आलं. आमचं कुटुंब हृतिक रोशनचं प्रचंड फ्यान असल्यानं जाणं भाग होत. त्यामुळे 'आज आपल्याला हे सहन करावं लागणार आहे' या विचाराने आणि जरा धडधडत्या हृदयानेच थेटरात प्रवेश केला. बाकी ज्यांनी हा सिनेमा पाहिलेला नाहीये पण पाहाणार आहेत, त्यांनी पुढे वाचू नये कारण गोष्ट उघड होते वगैरे.... सिनेमा सुरु होतो लंडनमधे.