मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मला न आवडलेली पुस्तके: आत्मचरित्रे/चरित्रे

पुस्तकमित्र · · जनातलं, मनातलं
http://www.misalpav.com/node/28198 http://www.misalpav.com/node/28241 http://www.misalpav.com/node/29133 ------------------------------------------------------------------------------- या आधीच्या ३ धाग्यांप्रमाणेच या धाग्यात लिहूया मला न आवडलेल्या आत्मचरित्रे/चरित्रे याबद्दल. चरित्रे/आत्मचरित्रे न आवडण्याची कारणे काही अशी सांगता येतील की त्या पुस्तकात सत्याचा विपर्यास झालेला कधी कधी दिसतो. तर कधी आत्मप्रौढीचा वास येतो. कधी कधी लेखकाच्या रटाळ भाषेमुळे ही पुस्तके कंटाळवाणी वाटू शकतात. लिहूया तर तुम्हाला एखादे चरित्र्/आत्मचरित्र का आवडले नाही याबद्दल!

वाचने 13903 वाचनखूण प्रतिक्रिया 51

आदूबाळ 16/10/2014 - 02:12
विजया मेहतांचं आत्मचरित्र. त्यात सुरुवातीला स्वता:चा त्रयस्थ उल्लेख लय डोक्यात गेला. बेबीने हे केलं आन बेबीने पाणी प्यायलं आन बेबीने साडी नेसली. वैतागलो.

बोका-ए-आझम 16/10/2014 - 07:45
आत्मचरित्र हाच प्रकार मुळात आवडत नाही. एकतर ते नि:पक्षपाती असणं अशक्य. दुसरं म्हणजे आपल्याकडे लोक उपदेश आणि स्वत:चं उदात्तीकरण फार करतात आत्मचरित्रं लिहिणारे. एखादंच हंसा वाडकरांच्या ' सांगत्ये ऐका ' सारखं साधंसरळ आत्मचरित्र सापडतं. चरित्रांमध्ये पण ती जर जवळच्या एखाद्या व्यक्तीने लिहिली असतील, उदाहरणार्थ. 'चीपर बाय द डझन' हे मुलांनी लिहिलेलं आईवडिलांचं चरित्र आहे, तरच वाचनीय असतात.

In reply to by आदूबाळ

जेपी 16/10/2014 - 17:07
यावेळेसपण राईट्ट आदुदादु.हे बहुतेक पुणे विद्यापीठाचे कुलगुरु पण होते. आणखीन एक पुस्तक आहे त्याचे नाव ,लेखक, किंवा मजकुर पण आठवत नाय *wink*

In reply to by जेपी

'मी आणि माझा बाप' मधली श्री. नरेन्द्र आणि इतर ज्युनियर जाधवांचं लिखाण पुष्कळसं आत्मस्तुतीपर वाटतं. ते तसं असणं सहाजिक असावं जर त्यांनी मिळवलेल्या लौकिक यशाचा विचार केला तर. ते पटलं नाही तरी समजण्यासारखं आहे. पण तो सगळा फापटपसारा वगळून जर फक्त त्यांच्या वडिलांनी आत्मचरित्रपर लिहिलेली काही पानं वाचली तर खूप ती प्रभावित करणारी वाटली. एका वेगळ्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थीतीत जीवन घालवलेल्या व्यक्तिचे अनुभवाचे बोल, विचार वाचायला खूप आनंद वाटला.

In reply to by पिवळा डांबिस

दशानन 16/10/2014 - 23:18
ज्या परिस्थितीतून ते आले आहेत, आणि त्यांनी ज्या ज्या परिस्थिती आपले आयुष्य निर्माण होण्यासाठी वेचले आहे, ते पाहता थोडाफार दोष आपण नजरेआड करणे देखील मानवतेला धरून आहे.

In reply to by प्यारे१

होय, चेक करून बघतां तुम्ही म्हणताय ते टायटल आहे हे खरं. पण त्यामुळे विशेष काय फरक पडावा ते समजलं नाही! पुस्तक वाचलं असल्याशी कारण! तुमचं पुस्तकाबद्दलचं मत अधिक वाचनीय असेल, ते मांडा ना...

In reply to by पिवळा डांबिस

प्रसाद१९७१ 17/10/2014 - 17:11
त्यांनी मिळवलेल्या लौकिक यशाचा
न.जा चे सो कॉल्ड यश हे मोठे प्रश्न चिन्ह आहे पण ते का मिळाले आहे ह्याचे उत्तर सोप्पे आहे. त्यांचे कतृत्व काय आहे हा तर मोठा गहन प्रश्न आहे. पदव्या मिळवळे हे जर कतृत्व असेल तर मग बोलायलाच नको.

In reply to by पिवळा डांबिस

विजुभाऊ 18/10/2014 - 13:31
"आम्ही आणि आमचा बाप " या पुस्तकाचे वैषिष्ठ्य म्हणजे तीनही पात्रांची भाषा. खरोखरच शिक्षणामुळे भाषेवर पडणारा फरक अनुभवण्याजोगा आहे.

स्नेहल महेश 16/10/2014 - 12:50
खूप छान आत्मचरीत्र आहे १९५०-६० च्या शतकात हॉर्स रेसिंग सारखं क्षेत्र निवडून त्यात यशस्वी होऊन दाखवणे, कठीण काळात आलेले अनुभव खूप छान प्रकारे लिहिले आहेत नि:पक्षपाती लिखान

In reply to by स्वामी संकेतानंद

संचित 16/10/2014 - 17:13
मित्रानी तारीफ केली म्हणून वाचायला घेतले होते. पण कंटाळलो. कर्हेचे पाणी संपता संपत नाही.

In reply to by इनिगोय

दशानन 16/10/2014 - 22:02
लेखिकेने पुस्तक लिहितानाच ठरवले असावे की "खोटेच सांगेन" रेटून पुस्तक वाचले होते.. पण हाती काहीच लागले नाही. तसे ही मी आत्मचरित्रपर पुस्तकांचा धसका घेतला आहे.. !

In reply to by कवितानागेश

दशानन 16/10/2014 - 23:22
माझा मेंदू त्यावेळी खराब झाला होता, असे स्वत:ला उत्तर देऊन मी गप्प झालो.. तुम्ही काय दिवे लावले, स्वारी.. काय दिवे पेरले :D

In reply to by कवितानागेश

अर्धवटराव 17/10/2014 - 21:49
बिहैण्ड एव्हरी फॉर्चुन देअर इज अ क्राईम म्हणतात ना... एका दशकात बांधकाम व्यवसायात मिळालेल्या "फॉर्च्युन" कडे डोळेझाक व्हावी म्हणुन एव्हढा बटबटीतपणा आणला असावा काय चरित्राला??

In reply to by पिवळा डांबिस

दशानन 16/10/2014 - 23:20
पिडा, मी तुमच्या घरापर्यंत हे पुस्तक फ्रीमध्ये पाठवेन, पण आधी तुम्ही शपथ घ्या, माझा जीव घेणार नाहीत म्हणून... =))

In reply to by दशानन

विचार करून सांगतो!!! ;) (स्वगतः बाकी ह्याचं तंगडं मोडायला इतकी इतर कारणं आहेत की ह्या पुस्तकानेच नेमका काय फरक पडणार आहे?) :)

In reply to by पिवळा डांबिस

दशानन 16/10/2014 - 23:31
आधीच एक तंगडे स्टीलचे आहे, दुसरे काय तोडणार? सोबत.. अजून एक पुस्तक देखील देतो.. पण त्याबद्दल तुम्ही एकतर माझा पाठलाग... अगदी पुढील जन्मी देखील कराल याची मला खात्री आहे, किंवा तुम्ही मला शेवटी मला गिनिपिग म्हणून वापराला.... =))

In reply to by दशानन

कवितानागेश 16/10/2014 - 23:28
मी लहान होते. दवणेन्चे नाव वाचून वाचायला घेतले. कुणीतरी फुकट घरी पाठवले होते. .. सध्या तरी इतकीच कारणे आठवतायत.

In reply to by कवितानागेश

दशानन 16/10/2014 - 23:32
>>>कुणीतरी फुकट घरी पाठवले होते. .. काय योगायोग... सगळ्यांनाच ते पुस्तक फुकटमध्ये मिळाले होते कि काय ;)

In reply to by सखी

प्यारे१ 17/10/2014 - 03:07
>>> नंदनचा हा प्रतिसाद वाचनीय आहे असणारच. :-/ माणूस कोट्याधीश आहे ना? गैरसमज होण्याच्या शक्यतेमुळं.... नंदन 'कोट्या'धीश आहे ना!

आदूबाळ 17/10/2014 - 00:03
सूर्य पेरणारा माणूस वरून आठवलं - आमच्या अण्णा झावर्‍यांचं आत्मचरित्र त्याच वाटेने जाणारं आहे. पण अण्णांना स्वतः लेखनाची लय हाऊस असल्याने ते घोस्टरायटरकडे आपलं आयुष्य सोपवायची सुतराम शक्यता नाही.

अजया 17/10/2014 - 08:01
महादेव शास्त्री जोशींचं अात्मपुराण कंटाळवाणं वाटलेलं आत्मचरित्र.स्नेहांकिता हे जुन्या अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान यांचं अात्मचरित्र वाचताना हे खोटं लिहिलंय बरंच काही झाकुन असं वाटत राहातं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रसाद१९७१ 17/10/2014 - 17:49
वाईट दिवस काढले हे कबूल आहे पण ते ज्या प्रकारे लिहीले आहे ते त्यांना केविलवाणे करुन टाकतय. मी कसा बापुडा आणि दुसरे माझ्याशी कसे वाईट वागले हेच पुन्हा पुन्हा आहे.