बयो !!!!

खटपट्या's picture
खटपट्या in जनातलं, मनातलं
14 Oct 2014 - 5:56 am

(हि कथा संपूर्ण काल्पनिक आहे. काळ - १९९८-९९)

बयो !!!!

बऱ्याच तात्पुरत्या नोकऱ्या झाल्या होत्या. कोणत्याच नोकरीत राम वाटत नव्हता. आणि पगारातपण म्हणावी तशी वाढ होत नव्हती. काय करावे काळत नव्हते. स्वतः चा व्यवसाय करायचे डोक्यात होते पण आपल्याला जमेल का ?, भांडवल कुठून आणायचे?, तोटा झाला तर काय ?, असे असंख्य प्रश्न भंडावत होते.
घरी सर्वांना माझी अस्वस्थता जाणवत होती. आईला माहित होते कि याचे काही ठीक चालले नाहीये. तिने सरळच विचारले,
"काय रे काही प्रोब्लेम आहे का?"
"नाही, काही नाही".
"मग असा का घुम्यासारखा बसून असतोस? कसला विचार करतोस एवढा?"
"काही नाही, हे असंच चालू राहिलं तर कठीण आहे. काहीतरी स्वतःच हवं."
"म्हणजे"
"जाऊ दे ना"
आईला माझी घालमेल बघवेना
"किती पैसे लागणार आहेत?"
"माहित नाही" मी

तेव्हा माहित नाही म्हणालो पण मनात जुळवाजुळव सुरु झाली. करून करून करणार काय. छोटंसं कॉम्पुटर शॉप सुरु करायचा विचार होता. भाड्याचा गाळा., सामानसुमान, कमीतकमी दोन माणसांचा पहिल्या ६ महिन्याचा पगार असे सर्व मिळून ६०/८० हजार तरी लागणार होते.
एक दिवस घाबरत घाबरत आईला आकडा सांगितला. वर हेही सांगितले कि पैसे परत मिळतील याची खात्री नाही. तिने शांतपणे ऐकून घेतले आणि सांगते म्हणाली.

अचानक एके सकाळी आईने पैसे हातावर ठेवले आणे म्हणाली "काय करतोयस ते मन लावून कर"
मला काय बोलावे कळेना. माझे डोळे पाणावले. मग म्हणाली "जास्त विचार करू नकोस"

मी कामाला लागलो, मस्त मोक्यावरचा गाळा बघितला, शोसाठी कि बोर्ड, माउस, कॅबिनेट असे सामन उधारीवर आणून लावले. सामान संपले नाहीतर परत देणार हे सुद्धा सांगून ठेवले. आधीचे फर्निचर होतेच. मनासारखा सेटअप झाल्यावर चांगला दिवस बघून नारळ फोडून सुरवात केली. एक डेस्कटोप इंजिनिअर विलास आणि स्वागतिका कोमल असे आम्ही तिघे दुकान कम ऑफिस मध्ये बसू लागलो. सुरवातीला अतिशय थंड प्रतिसाद होता. घाबरगुंडी उडाली होती. पण स्थानिक पेपरविक्रेत्याकडे हैण्ड्बिले वाटायला दिल्यावर चांगला प्रतिसाद मिळू लागला.

कोमल - दिसायला सुंदर, स्वत:ला टापटीप ठेवणारी व मला हवी होती तशीच मुलगी होती. थोड्याच दिवसात तिला व्यवसायातील खाचाखोचा समजल्या. कोण कशासाठी फोन करतंय, पेमेंटसाठी येणारा फोन कोणता, क्लायण्ट चा फोन कोणता आणि त्यांना कसे प्रतिसाद द्यायचे वगैरे. कोमलला एक लहान बहिण होती,जी कोलेजला होती. या दोघीच होत्या.

पहिल्या सहा महिन्यामध्ये दोघांचा पगार आणि भाडे जाउन आईचे पैसे परत करू शकलो. आणि डोक्यावरचा भार बराच कमी झाला.

कोमल जवळच रहायची व तिच्या घरची लोक निच्यावर नजर ठेवून असायचे. वडिलांच्या सहज म्हणून समोरच्या रस्त्यावरून एक दोन फेऱ्या असायच्या.(बहुतेक लक्ष ठेवण्यासाठी) कारण दिवसाचा बहुतांश वेळ मी आणि कोमल दोघच दुकानात असायचो. आमच्या दुकानाला काचेचे पार्टिशन असल्यामुळे जाता येता दुकानात काय चालू आहे हे रस्त्यावरून सहज दिसायचे.
कोमलची कामाची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ७. साडेसात नंतरसुद्धा ती घरी पोहोचली नसल्यास तिचे बाबा दुकानात हजर होत असत. कधी कधी कोमल उशिरा थांबून आम्हाला असेम्ब्लीसाठी मदत करत असे. बाबा येवून बघायचे कितीजण आहेत. :) मला कळायचे कि ते का येतात पण मी दुर्लक्ष करीत असे. तरण्या मुलीचे वडील काळजी करणारच.

एकदा एका क्लायण्ट ने घरी बोलाऊन घेतले. ते एका सोफ़्ट्वेअर कंपनी मध्ये मोठ्या पदावर होते. त्यांच्या घरातील पीसीचे काम आम्हिच केल्यामुळे ते मला व्यक्तिश: ओळखत होते. मला म्हणाले
"२०० डेस्कटोप हवेत, १५ दिवसात देऊ शकशील?
"का नाही सर?"
"ऐड्वान्स मिळणार नाही आणि पेमेंट ३ महिन्याने मिळेल, वर तुमचा एक माणूस आमच्याकडे एक वर्ष ठेवावा लागेल"
"चालेल सर"
मी आल्यावर कोमलला हि बातमी सांगितली, तिने तर आनंदाने उडीच मारली. खरं तर तिला एवढे आनंदित होण्यासारखे काहीच नव्हते. पण खूप खुश होती.
मी म्हणालो "कोमल, काही दिवस तुला उशिरापर्यंत थांबावे लागेल"
"चालेल"
"घरी विचारून घे बाबांना"
"ते मी बघते रे"
"ठीक आहे उद्या दुपारी सर्व समान येईल, उद्यापासून सुरवात करू"
"पण मी काय म्हणते विवेक"
"काय?"
"त्या गृहस्थांवर आपण नको तेव्हढा विश्वास तर टाकत नाही ना"
"आपण?"
ती ओशाळली, हा सर्व व्यवसाय ती स्वत:चा समजत होती. एका अर्थाने ते चांगलंच होतं
"आपण म्हणजे तू रे"
"हम्म, बघू, काय होईल फार तर? पैसे उशिरा मिळतील. आपण मार्जिन पण तशीच ठेवू ना.
"हम्म"
"या डील चे पैसे आल्यावर मी तुझे पेमेंट वाढवणार आहे."
"मी माझ्या पेमेंट बद्दल तुला कधी बोललेय का?"
"ठीक आहे, उद्यापासून सुरवात करू त्याआधी एक कोटेशन टाइप कर, त्यांना आजच नेउन द्यावे लागेल."
"ओके"

काम चालू झाले. पहिल्याच दिवशी हिचे बाबा साडेसातला हजर. हलायचे नाव घेइनात. बहुतेक कोमल ला सोबतच घेऊन जाणार.
मी म्हणालो, "काय काका?"
"नाही सहजच आलो, म्हटले काय चाललय बघून जावे, कोमल म्हणाली कि खूप मोठी ओर्डर आली आहे."
"बघूया कसं जमतंय ते. चहा घेणार?"
"नको"
"घ्या हो, कोमल, आपल्या सर्वांना चहा सांगतेस प्लीज?"
"चांगलाच जम बसलाय तुमचा"
"हो सद्यातरी चांगलं चालू आहे. पण धंदा बेभरवशाचा आहे."

बाबा चहा पिउन निघून गेले.

दुसऱ्या दिवशी साडेसातला बाबा परत हजर.
मी म्हणालो, "काय काका?"
"नाही सहजच. तरी किती दिवस काम चालेल?"
"माहित नाही. अजून कमीतकमी १५ दिवस तरी लागतील" (आयला म्हणजे हे रोज येणार कि काय? एवढाही विश्वास नाही? आमच्या दोघांबरोबर संध्याकाळी विलासहि असायचा दुकानात)
"ओके निघतो मी" इति बाबा
"अहो चहा घेऊन जा ना"
"नको"
"ठीक आहे, येत जा कधी कधी" (कधी कधीच येत जा,)

ती ओर्डर व्यवस्थित पार पडली. पैसेही वेळेवर मिळाले. ठरल्याप्रमाणे मी कोमलचे पेमेंट वाढवले. तीसुद्धा खुश होती. एकदा दुकानात दोघेच असताना मी म्हणालो, "कोमल, तुला एक विचारायचे आहे"
तिने चमकून माझ्याकडे पहिले आणि विचारले "काय?"
"एवढे दचकायला काय झाले?"
"नाही विचार ना"
"मी विचार करत होतो कि आपण आपला स्वतःचा ब्रांड काढला तर?"
"ओह, हे विचारायचे होते?"
"मग, तुला काय वाटले?"
"काही नाही जाउदे" (आयला हिपण तोच विचार करतेय का जो मी करतोय?)

हल्ली कोमलचे माझ्यावर बारीक लक्ष असायचे. मला कोणते फोन येतात, त्यात मुलींचे फोन कोणते, कधी कधी तर सरळ विचारायची,
"अरे सोनल म्हणून फोन आला होता तुझ्यासाठी, कोण आहेत ती?"
"हा ती मार्केटिंग डिपार्ट्मेण्ट ला आहे त्या साहेबांच्या कंपनी मध्ये"
"ओके"
"का ग?"
"नाही सहजच"

नेहमीप्रमाणे एकदा बाबा साडेसातला हजर. मी म्हणालो, "काका कोमल तर आत्ताच निघाली"
"हो मी पाहिली, मला तुमच्याशी बोलायचे आहे."
"बोलाना"
"तुम्ही पाटील म्हणजे नक्की कोण?"
"………. ?" (काय विचारायचे आहे नक्की यांना? जात?) मी गप्प
"म्हणजे कुठले पाटील?"
"आम्ही सौन्दळ चे पाटील. का हो?"
"नाही सहजच"
"चहा घेणार?"
"नको पुन्हा कधीतरी"

मी विचार करत होतो, यांचा विचार तरी काय आहे? मला कोमलच्या वागण्याबोलण्यातून संकेत मिळत होते. एखाद्या महिलेचा फोन असले तर तर तिचे कान टवकारलेले असत. मी जरा जास्त वेळ फोन वर बोलतोय असे वाटले कि ती अस्वस्थ होत असे. आजकाल तिचा टापटीपपणा कमालीचा वाढला होता. एक वेगळेच अत्तर वापरू लागली होती. अगदी धुंद करणारे.
एकदा विचारले, "काय ग, कोणता सेंट वापरतेस?"
"कारे तुला आवडला?"
"हम्म"
"देईन तुला आणून"
"माझ्यासाठी नको आणूस पण तू मात्र रोज हाच सेंट मारून येत जा"
यावर ती गोड गालातल्या गालात हसली

एकदा नेहमीप्रमाणे कोमल ऑफिस मध्ये नसताना तिचे बाबा आले.
मी म्हणालो, "काय काका?"
"काही नाही सहजच. मी काय म्हणत होतो…"
"काय?"
"आमची बयो ग्रजुएट झालेली आहे" (बहुतेक कोमलला घरी बयो म्हणत असावेत)
"हो माहित आहे मला"
"दिसायला हि सुंदर आहे"
"…………" (आता हे नवीन काहीतरी सान्गीतल्यासारखे काय सान्गताय? काय ते विचारा)
"तर मी म्हणत होतो कि…… "
"काय?" (मला आता धडकी भरली. एखाद्या गोष्ट बऱ्याच दिवसापासून मनात असेल आणि आता ती मिळण्याची वेळ जवळ आल्यावर जसा माणूस नर्वस होतो तसे झाले. अजून किती वेळ घेणार आहेत हे?)
"आम्ही परब, कणकवलीजवळ आमचे गाव आहे"
"ओके(????)"
"मी बयोसाठी स्थळ शोधत होतो"
"ओके" (अहो विचारा काय ते लवकर)
"तुम्ही एकदा बयोला घरी येउन बघून गेलात तर बरे होईल."
"अहो रोजच तर बघतो मी तिला इथे"
"अहो बयो, कोमलची धाकटी बहिण"

"काय??????"

(क्रमशः)

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

14 Oct 2014 - 6:12 am | स्पंदना

अंम्म्म!
असा कसा असतो ह्या वडिल माणसांचा विचका करायचा स्वभाव?

कविता१९७८'s picture

14 Oct 2014 - 7:03 am | कविता१९७८

छान, पुढचा भाग लवकर येउ द्या.

रेवती's picture

14 Oct 2014 - 7:07 am | रेवती

आईग्ग! बिचारा कथानायक!

स्वप्नज's picture

14 Oct 2014 - 7:16 am | स्वप्नज

एखाद्या मालिकेमध्ये तो तिची वाट पाहतोय.. दारघंटा वाजते....तो आनंदाने दार उघडतो...पण ती व्यक्ती दिसल्यावर त्याच्या चेहर्यावरचे भाव पटकन बदलतात आणि नेमके तिथेच तो भाग संपतो....असे काहीसे.....असो ....... पुभाप्र.....

किसन शिंदे's picture

14 Oct 2014 - 7:19 am | किसन शिंदे

पुढचा भाग येऊद्या पटकन. आणि हो त्या बयोला होकार देवू नका लग्नाला

हे नक्की का ??? *LO**

हो संपुर्ण काल्पनिकच आहे हो.. !!
तुम्हाला खरी वाटतेय हे बघुन बरं वाट्लं :)

हरे राम !त्या कोमलला बयो करुन लग्न करुन टाकायचं ना त्याचं,उगा पुढच्या भागाची वाट बघणं अालं.आता लवकर टाका तो भाग!!

कलाटणी ?
सुखद शेवट होईल का?

बहुगुणी's picture

14 Oct 2014 - 8:43 am | बहुगुणी

येऊ द्या पुढचा भाग लवकर.

अत्रुप्त आत्मा's picture

14 Oct 2014 - 8:52 am | अत्रुप्त आत्मा

हम्म्म्म्म्म!

मदनबाण's picture

14 Oct 2014 - 9:23 am | मदनबाण

वाचतोय ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्क

प्रचेतस's picture

14 Oct 2014 - 10:04 am | प्रचेतस

मस्त सुरुवात.

मृत्युन्जय's picture

14 Oct 2014 - 10:47 am | मृत्युन्जय

कथा ओघवत्या भाषेत साकारते आहे. पुढचा भाग वाचायची उत्कंठा आहे.

सौंदाळा's picture

14 Oct 2014 - 2:09 pm | सौंदाळा

+१

एस's picture

14 Oct 2014 - 10:54 am | एस

हहपुवा! पुभाप्र!

उमा @ मिपा's picture

14 Oct 2014 - 1:09 pm | उमा @ मिपा

नायकाची व्यवसायात प्रगती होतेय हे वाचताना खूप बरं वाटत होतं. पण शेवटी बयो मुळे धक्काच बसला. पुढील भाग वाचण्यासाठी उत्सुक आहे. छान लिहिलंय!

संचित's picture

14 Oct 2014 - 1:25 pm | संचित

मस्त जमलय...

शिद's picture

14 Oct 2014 - 2:29 pm | शिद

+१.

पुढचा भाग टाका लवकर.

अवांतरः बयोला बाय करा आणि कोमलला हाय करा. ;)

पैसा's picture

14 Oct 2014 - 2:21 pm | पैसा

पुढे काय झालं असावं?

दिपक.कुवेत's picture

14 Oct 2014 - 2:29 pm | दिपक.कुवेत

मस्त जमलय. पुढे वाचण्यास उत्सुक

वैदेही बेलवलकर's picture

14 Oct 2014 - 4:41 pm | वैदेही बेलवलकर

तुम्ही खरंच सौंदळ चे का ? माझं गाव सौंदळ आहे म्हणून विचारलं कि फक्त योगायोग.

खटपट्या's picture

14 Oct 2014 - 7:36 pm | खटपट्या

मी सौन्दळचा नाही. माझ्या मित्राचे गाव सौन्दळ. सहज सुचले म्हणून कथेत आले. तुम्ही सौन्दळ च्या आहात हे वाचून आनंद झाला.

कुठेतरी वाचल्यासारखे वाटतय !!

प्रभाकर पेठकर's picture

14 Oct 2014 - 7:00 pm | प्रभाकर पेठकर

मोठ्या मुलीच्या आधी धाकट्या मुलीचे लग्न? कांही पटलं नाही. धाकट्या बहीणीत कांही खोट आहे का? तिचे कुठे, घरच्यांना पसंद नसलेले, प्रेमसंबंध वगैरे आहेत की काय ज्यामुळे तिला लवकरात लवकर आपल्याला मान्य असलेल्या 'स्थळा'शी उजवून टाकायची घाई आहे? असो.

ह्यात नाउमेद होण्यापेक्षा मला तरी सकारात्मक संकेत दिसत आहेत. जावई म्हणून ते तुम्हाला पसंद करीत आहेत. आता, तुम्हाला धाकटीशी नाही मोठीशी लग्न करायचे आहे हे त्यांच्या गळी उतरविणे कठीण नाही. (कारण मोठी मुलगीही तुमच्यात इच्छुक आहे).

खटपट्या's picture

14 Oct 2014 - 7:34 pm | खटपट्या

काका, हि गोष्ट माझी नाही. संपूर्ण काल्पनिक आहे.
बाकी तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे पुढील भागात येतीलच.

पहाटवारा's picture

15 Oct 2014 - 4:34 am | पहाटवारा

अहो असे प्रतीसाद हि तुमच्या लेखनाच्या यशस्वीतेची पावतीच आहे :)
छोटेखानी , मस्त कथानक.. येउ द्या पुढचा भाग लवकर..
-पहाटवारा

मोठ्या मुलीच्या आधी धाकट्या मुलीचे लग्न? कांही पटलं नाही.

कथा काल्पनिक आहे असे लेखक म्हणताहेतच. परंतु काल्पनिक असो वा नसो, मोठ्या मुलीच्या आधी धाकटीचे लग्न करण्यात चूक काय आहे ते कळालं नाही. हेच भावाभावांबद्दल, तसेच लहान भाऊ- मोठी बहीण आणि मोठा भाऊ-लहान बहीण या जोड्यांबद्दलही म्हणता यावे. कैक कुटुंबांत असे काही झाले की जणू महापाप केल्यागत चेहरा करतात. इतकं भयंकर काय आहे यात?

प्रभाकर पेठकर's picture

14 Oct 2014 - 7:53 pm | प्रभाकर पेठकर

मोठ्या मुलीच्या आधी धाकटीचे लग्न करण्यात चूक काय आहे ते कळालं नाही.

आता काळ बदलला आहे किंवा बदलतो आहे. पण पूर्वीच्या काळी धाकटीचे लग्न आधी केले तर तिची लग्नाआधी बाहेर कुठे 'भानगड' वगैरे असावी की काय (म्हणून घाईघाईने आणि आपल्याला अंधारात ठेवून लग्न 'उरकताहेत') असा प्रश्न मुलाकडच्या वरिष्ठांना पडायचा. किंवा 'मोठ्या मुलीत कांही खोट असणार' असा विचार करून तिला 'स्थळं' सांगून यायची बंद होतात. शिवाय मोठीच्या मनांत न्यूनगंड निर्माण होण्याचीही शक्यता असते. हा सर्व विचार करून धाकट्या मुलीला स्थळ आधी सांगून आलं तरी त्यांना रोखून धरायची आणि मोठीचे लग्न आधी करण्याची प्रथा होती.
भाऊ-बहिणीत लहान बहिणीचं आधी आणि मोठ्या भावाचं नंतर अशी लग्न व्हायची. तरीपण 'मोठ्या भावाचं लग्न अजून का झालं नाही' ह्याची आडून आडून चौकशी व्हायचीच. पण ते तितकेसे गंभीर नसायचे.

ह्यात भयंकर कांहीच नाही हा व्यवहार आहे जो पूर्वी कटाक्षाने पाळला जायचा.

आतिवास's picture

14 Oct 2014 - 8:31 pm | आतिवास

कथा आवडली. पुढं काय होतंय याबद्दल उत्सुकता आहे :-)

आदूबाळ's picture

15 Oct 2014 - 2:48 am | आदूबाळ

आवडली. पुभाप्र!

श्रीरंग_जोशी's picture

15 Oct 2014 - 5:31 am | श्रीरंग_जोशी

कथा छान रंगली आहे.

खूप आवडली. काल्पनिक आहे असे लिहिले नसते तर खरीच वाटली असती.

पुभाप्र.