कारखान्याची गोष्ट
नव्याने स्किम मध्ये उभ्या राहिलेल्या त्या अनेक इमारती असलेल्या सोसायटीची ती पहिलीच दिवाळी होती. शहरे भरली, मग उपनगरे ,आता त्याच्याही आत आत जाऊन निसर्गाच्या सानिध्यातल्या जाहिराती करुन नागर वस्ती उभी राहायला लागली. मुळची जंगले, शेते, पाणठळ जागा, मसणवाट, नुसत्याच्या रिकाम्या ओसाड जागा सगळे साफ झाले, उत्तुंग टाॅवर उभे राहीले, दुकाने, हाॅटेल्स,माॅल्स
सगळीकडे झगमगाट आला, मूळच्या बुऱ्या वाईट निर्यास करणाऱ्या शक्तीच्या वरची ही दुनिया. लांबून राहायला आलेले लोकं, त्यांना इथे २०-२५ वर्षांपूर्वी काय असावे याची काय कल्पना?
घरबसल्या यू-ट्यूबवर संगीत दिवाळी पहाट २०२५
बर्याच रसिकांना दिवाळी पहाट संगीत मैफिलीने साजरी करणे आवडते. जर कोणत्याही कारणाने अशा रसिकांना मैफिलीला जाणे शक्य झाले नसेल अशांसाठी काही दुवे खाली देतो आहे. शास्त्रीय संगीतासाठी एक दुवा तर सुगम संगीतासाठी काही दुवे देतो अहे. रसिकांना यातून काहीतरी नवे सुंदर असे अवसेल अशी आशा आहे.
शास्त्रीय संगीत
गायन जुगलबंदी : डॉ. विलिना पात्रा नटभैरव आणि साईप्रसाद पंचाल : मधुवंती: सुमारे १ (एक) तास ४२ (बेचाळीस) मिनिटे, https://www.youtube.com/watch?v=OHg0hfsPr_4
सुगम संगीत
सणासुदीची सफाई
"नास्तिकांनी खायला कोंडा,
उशाला धोंडाचं गाणं!"
कितीही म्हटलं, तरी
आपल्या देशाची पक्की जमीन
धर्माच्या खाटेचीच सोय!
पंथाच्या गादीची उब,
सांस्कृतिक उशीसंगे अल्हाददायक झोप —
आपलेसेपणा देणारी ही सोय
बहुतेकांना हवीच असते, नाही का?
सणांच्या आधी, माळ्यावरची
समृद्ध अडगळ खाली उतरते,
तेव्हा माळ्याचीही सफाई होते.
तसंच काहीसं —
मऊ मुलायम गादीसुद्धा,
खूप दिवसांनी कडक होते.
मग ती कारखान्यात जाऊन
सासुफ-करून, पुन्हा
मुलायम होते, स्वच्छ होते,
दिवाळी अंकांनी वैचारीक
कल्हई दिल्या सारखी.
रोबोटीक आय०व्ही०एफ० - प्रजननातील क्रांती?

AURA, Conceivable Life Sciences द्वारे विकसित केलेली AI-चालित IVF रोबोटिक प्रणाली, थेट मानवी हस्तक्षेपाशिवाय गर्भ तयार करून एक ऐतिहासिक मैलाचा दगड गाठला आहे. आतापर्यंत जवळपास २० बाळे, मेक्सिको सिटीमधील स्वयंचलित फलन (फर्टिलायझेशन) चाचण्यांमधून जन्मला आली. या यशामुळे IVF तंत्रज्ञान अधिक वेगवान, अधिक परवडणारे आणि जागतिक स्तरावर अधिक सुलभ बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चालु घडामोडी- ऑक्टोबर/ नोव्हेंबर -२५
नमस्कार, पाऊस पडून गेला आहे. निसर्गाने हिरवा शालू नेसला आहे. सगळीकडे हिरेवेगार डोळ्याला सुखावणारे चित्र वाटावे असा निसर्ग नटला आहे. नद्या, आपला तीव्र आवेग आवरुन हळुहळु संथ गतीने रमत गमत वाहात आहेत. 'नदीला पुर आलेला, कशी येऊ कशी येऊ ?' असा प्रेमभावनेचा काळ आता सरला आहे. जीवन वास्तवावर आलं आहे, जगण्याची धावळपळ सुरु आहे. शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागणार आहेत. मिपावर दिवाळी अंकाची लगबग सुरु आहे. मिपावर पाऊस-पाण्यामुळे ऑक्टोबरच्या चालू घडामोडीचा धागा दिसेना तेव्हा, कोणीच पुढाकार घेत नाही म्हटल्यावर गप्प राहील तो मिपाकर कसला म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबरच्या चालू घडामोडीचा धागा.
दहा अंगुळे उरला
अभंगाची मूळाक्षरे
ध्यानी मनी घोटताना
"वि"ठ्ठलाच्या "वेलांटीत"
"का"न्हा रेखाटतो "काना"
वेचुनिया मूळाक्षरे
घडवितो शब्द तुका
गहनाचा अंतर्नाद
झंकारतो त्यात, ऐका
शब्द चोखट, रोकडे
जोडे तुका, रचे ओळ
ओळी ओळीत गर्जती
वीणा, मृदंग नि टाळ
एका एका अभंगाचा
शब्द शब्द जो जगला
तुका आभाळ व्यापून
दहा अंगुळे उरला
तिकोना-फोटोवारी
नमस्कार मंडळी
विशेष व्यक्तींची लैंगिकता ह्यावर डॉ. सचिन नगरकर सरांचं व्याख्यान
विशेष व्यक्तींची लैंगिकता ह्यावर डॉ. सचिन नगरकर सरांचं व्याख्यान
अतिशय आवश्यक विषयावर मोलाचं मार्गदर्शन
✪ लैंगिकता- आईच्या पोटात असल्यापासून ते मृत्युपर्यंत
✪ वी.स. पा. गे. समूहाची गोष्ट
✪ "सा. सू. आणि सू. न.!”
✪ “हम कुत्ते के लिए इतना करते हैं, बच्चे के लिए नही?”
✪ कार्यशाळेत रडणारा बाबा
✪ गरज स्वीकाराची व अप्रोप्रिएशनची
✪ ६५% इंटरनेट पॉर्नसाठी वापरलं जातं
✪ पाळी अडचण नाही, ती आली नाही तर अडचण
✪ संवेदनशीलता, सोबत आणि सपोर्ट सिस्टीम हवी
✪ प्रश्नांवर उपायही आहेत!
धूमकेतू C/2025 A6 (Lemmon) बघण्याचा रोमांच
अंजनवेलमधील निसर्गाचे नयनरम्य अविष्कार!
✪ दोन धूमकेतू सध्या छोट्या टेलिस्कोपने बघता येतात
✪ धूमकेतू C/2025 A6 (Lemmon)- १३९६ वर्षांनी भेटायला आलेला पाहुणा!
✪ सब्र का फल मिठा- अखेर झाले मोकळे आकाश!
✪ अंजनवेलमधला निसर्ग- ढग, पाऊस आणि दवाचा पाऊस
✪ निरव शांततेत ओढ्याची कोसळधार, नितळ आकाश आणि तारेच तारे
✪ सितारों की महफील में कर के इशारा
✪ धुक्याच्या दुलईत पहुडलेले पर्वत
✪ विविधरंगी फुलांचा बहर आणि सह्याद्रीची श्रीमंती
✪ अंजनवेलमध्ये धूमकेतू निरीक्षण सत्र आणि मुलांसाठी हिवाळी शिबिर