ऊपनिषदे-३
===================================================================
===================================================================
आजकाल काय चालल आहे तेच कळत नाहीए . काय तर म्हणे परांजपे सर need your help . छे मलापण वाटल करावी मदत पण मदत म्हणजे काय त्यांना आज अर्जंट काही माहिती हवी आहे आणि ते फक्त त्यांना जाऊन एक्सप्लेन करायच नव्हत तर ती डॉक्यूमेंट त्यांच्या ऑफिसमध्ये मलाच घेऊन जायची होती . छे आता एवढचं बाकी राहील होत . तरीही गेलो तर तिकडे वेगळाच प्रकार , माझ्याकडून डॉक्यूमेंट घेऊन मला चक्क ऑफिसच्या बाहेर थांबायला सांगण्यात आल व जाऊ नये अशी गळही घालण्यात आली . आता काय बोलाव हे समजत नव्हत .
आज जेल मध्ये पोचल्या पोचल्या एक वेगळीच केस हाताळावी लागली. एक चाळीशी उलटून गेलेला माणूस समोर अपराधी म्हणून बसला होता. त्याचा अपराध म्हणजे चोरी आणि लबाडी.
विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीपासून अंदाजे १०/१२ कि.मी अंतरावर सातगांव आणि साकेगांव ही दोन अप्रतिम प्राचीन मंदिरे असलेली गावे आहेत. आज आपण त्यातल्या साकेगांवचे साकेश्वर मंदिर बघु.
जेव्हा माझ्या कर्जांना उधळी मुजोर माल्ल्या
माझा न राहतो मी हरवून हा 'सहारा'
काँग्रेस भाळ होते, होती प्रफुल्ल दक्षी
ओढून कर्ज घेते, हे राष्ट्रवादी पक्षी
शरदास सिंचनाच्या नाही मुळी फवारा | जेव्हा माझ्या कर्जांना...
डोळे मिटून घेतो, पण व्याजही फिटेना
हे कर्ज कोट्यावधींचे, लाखांतही चुकेना
देऊन थकलो मी सारखा तुला इशारा | जेव्हा माझ्या कर्जांना...
नोटांस हा बिअरचा, का सांग वास येतो
जिवंत कॅलेंडराचा, नुसताच भास होतो
केव्हा किंगफिशरचा उगवेल सांग तारा | जेव्हा माझ्या कर्जांना...
आमचे एक मिपाकर परममित्र आणी त्यांच्या हिरवीनीला समर्पित! :)
______________________________________________
अरे हटाव बाजू, हिमालया
आन फेअर ॲन्ड लवलीच्या
कापूसभरल्या भावल्यांना
तूच माझी खरी हिरवीन ग!
एकच बावनकशी ब्युटी ग!
झालो तर्राट आन लैच्च सैराट
खुळा झालोय, सकाळ संध्याकाळ
लोकं बघणार कायबाय बोलणार,
तरीबी, तुझच ध्यान काढीत बसणार ग!
आता ही येवढीच माझी ड्युटी ग!
शनिवारचा दिवस.
संध्याकाळी मी नुकताच बाहेरुन आलो होतो. इतक्यात आईने- ताईचा फोन आल्याची बातमी दिली आणि त्याचबरोबर भाईंदरला जाऊन दोघा मुलांचा रिझल्ट आणण्याची आठवण पुन्हा करुन दिली. ऐकून जरा आनंद वाटला पण त्याचबरोबर थोडासा मुडही ऑफ झाला. आनंद यासाठी कि दोघांचा रिझल्ट एकाच दिवशी नव्हता. दोन वेगवेगळ्या दिवशी होता. म्हणजे अठ्ठावीस आणि एकोणतीसला. कारण भाचा सिनिअरला होता, तर भाची ज्युनिअरला! साहजिकच मला दोन दिवस भाईंदरमध्ये राहावं लागणार होतं. थोडक्यात- पुर्ण दोन दिवस भाईंदरमध्ये फक्त आपलंच राज्य, बिनधास्त!
(अत्रन्गि पाउस यांच्या बाल संगोपनातील एक वास्तव या लेखावरून हे पूर्वी लिहिलेलं काही आठवलं. )
‘बोला परळकर, तुमचा कशानं सत्कार करायचा ? नुसती नोटीस चालेल का चार्जशीट पायजे ?’
‘नाही साहेब,...’
‘असं कसं, कायतरी घ्यावंच लागेल की !’
‘साहेब या महिन्यात टार्गेट जरा कमी झालं.’
‘जरा ? बारा लाख म्हणजे जरा ? कुठली गाडी वापरता ?’
‘आं ? हां हां, आय टेन साहेब..’
‘विकली तर येतील का बारा लाख ? नाय म्हणजे ‘जरा’ नुकसान होईल तुमचं ! चालतंय की ! काय ?’
‘....’
आपल्याकडे नग्नता या शब्दाकडे आणि विषयाकडे अशा काही नजरेने पाहिले जाते कि अगदी काही गुन्हा किंवा पाप केलेले आहे . बाकी प्रत्येक जणच जन्माला येताना बिना कपड्यांचाच जन्माला येतो पण काही लोकांचा आक्षेप असू शकतो कि जन्माला येताना तर कुणाला बोलायला आणि चालायला आणि इतरही अनेक गोष्टी येत नाहीत पण त्या पुढे तो शिकतो ना मग या बाबतीतही तस का नाही .