बाल संगोपनातील एक वास्तव

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
21 May 2016 - 8:59 am
गाभा: 

हल्ली नवपालकांमध्ये एक कॉमन आचार विचार दिसून येतो
लहान मुलांना काहीही करतांना, वागतांना, बोलतांना अडवायचे म्हणून नाही. फार झाले तर मुन्ना/न्नी ...नकोSSS ..इतपतच.

मुलांना वाढवतांना दिलेला मेसेज साधारणत:

सर्वसाधारणपणे वागण्याबोलण्याचे सभ्यपणे वावरण्याचे निकष धाब्यावर बसवून हवे तसे वाग, काही झाले तर आम्ही बघून घेऊ ...इथे सगळे वसूल केले तरच मिळते त्यामुळे वसूल कर, हिसकावून घे, ओरबाड अगदीच नाही तर निदान समोरच्याला मिळू देऊ नकोस ...पण काहीही करून आपले अस्तित्व जाणवून दे ...हक्क महत्वाचे, कर्तव्य जमल्यास कर नाही तर नाही

त्यातून निर्माण झालेले वागणे जसे
-मोडतोड, आदळआपट, धसमुसळेपणा ....ह्याला 'हायपर' आहे असे एक कौतुकाचे लेबल लावले जाते
-उर्मट, आगाऊ बोलण्याला ... स्मार्ट, हजरजबाबी पणाचे प्रशस्तीपत्रक
-आरडाओरडा करून कर्कश बोलणे ...उत्साही पणाची शाबासकी

अपवाद निश्चित आहेत परंतु अपवाद म्हणूनच...

ह्यातून पुढे मग आपण एक बेदरकर, बेशिस्त समाज निर्माण होऊ देऊ हि जाणीव नाही ...

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

21 May 2016 - 9:51 pm | नगरीनिरंजन

कोणालाही हे असलं काही सांगून उपयोग नाही. आपल्याला हवे ते सांगणार्‍याकडेच फक्त लक्ष देण्याचा आणि त्यालाच डोक्यावर घेण्याचाही जोरदार ट्रेंड आहे. कधी नव्हता म्हणा?

पंजाबात म्हणे एका जातीसमुहात मुलग्याने तोडफोड न करणे, साधे असणे यास वाईट समजतात. साध्या मुलास त्याने दंगेखोर बनावे यासाठी जे काही करतात ते ऐकले आहे. अशा मुलांची दया आली. सतत चिडलेले व धुमसत असणे म्हणजे मुलग्याचे लक्षण आहे. (हा प्रतिसाद पंजाब्यांवरील असलेल्या रागामुळे आलेला नाही तर खरच असं आहे. मुलींबद्दल कल्पना नाही.)

बोका-ए-आझम's picture

22 May 2016 - 11:00 am | बोका-ए-आझम

प्राचीन ग्रीसमधल्या स्पार्टा राज्यात, जिथे सैनिक बनवणं हे राज्यकर्त्यांचं एकमेव ध्येय होतं, असंच केलं जायचं हे वाचलं आहे.

नाईकांचा बहिर्जी's picture

22 May 2016 - 11:26 am | नाईकांचा बहिर्जी

त्यांच्यात (स्पार्टन किंवा प्राचीन पंचनद गणतंत्रे) सेलेक्टिव ब्रीडिंग सुद्धा होत असे , जन्माला आलेले पोर जर ठराविक वजनाचे नसले तर ठार करण्यात येई. स्पार्टा बद्दल जास्त माहीती नाही पण प्राचीन पंजाब प्रांतातला मोठा भाग अन तक्षशीलेच्या दक्षिणे कडले एक बलवान गणराज्य म्हणून नावाजलेले "मालव" "कठ" "शूद्रक" ही गणराज ह्या सेलेक्टिव ब्रीडिंग करीता प्रसिद्ध होती, इतकेच काय तर स्त्रीचे गर्भाधान (वैज्ञानिक किंवा जीव शास्त्रीयदृष्ट्या तसेच वैदिक संस्कारमालेतील एक संस्कार ह्या स्वरुपात) झाल्यावर तिला राज्याच्या खर्चाने पोषण अन वैद्यकीय सोई पुरविल्या जात असत, स्पार्टा असो वा मालव ह्या लोकांना सैनिक एक प्रोडक्ट असे असे प्रोडक्ट जे विकत किंवा भाड्याने देता येईल . गंमत म्हणजे ह्या सेलेक्टिव ब्रीडिंग मुळे एक पहायला मिळेल, सरदार काटकुळा असला तर उंच असेल सुरुच्या माडा सारखा अन बुटका असेल बटला तर हाड़ापेराने डबल हड्डी असेल (माझ्या मर्यादित sampling मधे तरी मला जाणवले तसे)

बोका-ए-आझम's picture

22 May 2016 - 11:36 am | बोका-ए-आझम

Eugenics या विषयात असल्या गोष्टींचा विचार केला जातो. नाझी हे कट्टर वंशवादी होते. त्यांनी ही स्फूर्ती स्पार्टन्सवरुनच घेतली होती.

नाईकांचा बहिर्जी's picture

22 May 2016 - 12:26 pm | नाईकांचा बहिर्जी

नाझी भस्मासुराचा उदयास्त ह्या पुस्तकात लेखकांनी जेव्हा जर्मन सैनिकांनी ब्रिटिश / फ्रेंच जवान युद्धकैदी म्हणून धरले होते तेव्हाची परिस्थिती सांगणारे एक फारच चित्रदर्शी वाक्य लोहिले आहे, त्याचा आशय काहीसा असा आहे की धरलेले ब्रिटिश सैनिक हे काटकुळे किडलेल्या दातांचे वगैरे असत तेच त्यांना नेणारे जर्मन जवान हे सवासहा फूटी धड़धाकट रुंद जबड्याचे असत. दोन महायुद्धांच्या मधल्या काळात दोस्त राष्ट्रांनी आपल्या तरुण पीढ़ी कड़े केलेल्या अक्षम्य दुर्लक्षाचे ते द्योतक होते. ह्यात हिटलर ने सुरु केलेल्या शाखा अन युथ क्लब्स सोबतच ह्या सेलेक्टिव ब्रीडिंगचा भाग कितपत होता देव जाणे. बहुतेक (माइन काम्फ़मधे) तो (हिटलर) जर्मन लोकांच्या जातिवंत कुत्री (शुद्ध लाइनच्या जर्मन शेफर्ड ची पैदास) तयार करण्याच्या वेडाची खिल्ली उडवतो अन तोच वेळ शुद्ध पीढ़ी तयार करण्यात खर्च करावा असे सुचवतो असे वाचल्याचे स्मरते.

बोका-ए-आझम's picture

22 May 2016 - 1:30 pm | बोका-ए-आझम

William Shirer च्या The Rise and Fall of the Third Reich या पुस्तकात सुंदर विवेचन आहे. In fact, वि.ग. कानिटकरांनी नाझी भस्मासुराचा उदयास्त मध्ये Shirer च्या पुस्तकाचा अनुवादच केलाय जवळपास.

नाईकांचा बहिर्जी's picture

22 May 2016 - 1:44 pm | नाईकांचा बहिर्जी

शिरर बहुतेक नाझी पार्टी/ जर्मन सरकारचा आधुनिक क्रॉनिकलर होता ना?? सरकारी इतिहासकार??

बोका-ए-आझम's picture

22 May 2016 - 2:00 pm | बोका-ए-आझम

तो Washington Post चा बर्लिन प्रतिनिधी होता. १९४१ मध्ये पर्ल हार्बरनंतर अमेरिका युद्धात उतरली आणि त्यानंतर जर्मनीनेही अमेरिकेबरोबर युद्ध पुकारलं. तेव्हा शिररला जर्मनी सोडून जावं लागलं. नंतर युद्ध संपल्यावर तो न्यूरेंबर्ग खटला cover करण्यासाठी जर्मनीला परत आला. तेव्हा हिटलरचा chief of staff फ्रांझ हाल्डरच्या डाय-या आणि इतर कागदपत्रे अमेरिकन सरकारने खुला दस्तऐवज म्हणून पत्रकारांना वापरु दिला होता. त्याचा ऋणनिर्देश शिररच्या पुस्तकात आहे.

गामा पैलवान's picture

22 May 2016 - 12:39 pm | गामा पैलवान

नाईकांचा बहिर्जी,

एकदम चोख निरीक्षण. योधेय हे अजून एक असंच गणराज्य होतं. नावातून काय ते कळतंच. मालव आणि योधेय दोन्ही राज्यांत स्त्रियादेखील युद्धावर जात असंत. त्यांनी आपसांतील वैर विसरून एकत्र येऊन ग्रीक राजा अलेक्झांडरला खूप त्रास दिला होता.

आ.न.,
-गा.पै.

नाईकांचा बहिर्जी's picture

22 May 2016 - 12:55 pm | नाईकांचा बहिर्जी

माझ्या माहीती नुसार वैर मालव यौद्धेय कठ ह्यांच्यात नसुन त्यांचे अन पीढ़ीजात राजेशाही असणाऱ्या तक्षशीलेच्या राज्यात होतं, तक्षशीलेचा राजपुत्र अंभीकुमार हा एलेग्जेंडरचं स्वागत करायच्या पक्षात होता अन गणराज्य त्याला पौरस सोबत झालेल्या युद्धामुळे चिडून धूळ चारु इच्छित होती, एलेग्जेंडर ज्या सैनिकाचा बाण बरगडी मधे लागून जीवघेणा जखमी झाला होता तो सैनिक सुद्धा मालव सैनिक होता हे वाचल्याचे स्मरते! हा बाण लागल्यावरच तो माघारी वळून इकडे सेल्युकस निकेटरला ठेऊन गेला अन परतताना बेबीलोन मधे मेला

चु भू दे घे

बोका-ए-आझम's picture

22 May 2016 - 1:12 pm | बोका-ए-आझम

विरोध हा पोरसाला होता आणि त्याचा शत्रू म्हणून त्याचा अलेक्झांडरला पाठिंबा होता. लोक त्याला देशद्रोही वगैरे म्हणतात पण त्याच्या काळात एक भारत देश/राष्ट्र ही संकल्पना नसल्यामुळे त्याला देशद्रोही म्हणणं हे थोडं चुकीचं वाटतं. (संदर्भ - सिकंदर-ए-आझम चित्रपट आणि सीमेवरुन परत जा नाटक).

नाईकांचा बहिर्जी's picture

22 May 2016 - 1:46 pm | नाईकांचा बहिर्जी

बरोबर! मी सुद्धा देशद्रोही ह्या अर्थाने नव्हतो म्हणलो! असो :) राष्ट्र संकल्पनेचा मुद्दा सुद्धा खासच!

अंतरा आनंद's picture

22 May 2016 - 7:56 am | अंतरा आनंद

मनापासून सहमती. हल्ली संयम, समजूतदारपणा, शिस्त हे दुर्गुण आहेत, हे शिकवून आपल्या मुलीला आपण या जगात रहायला नालायक बनवतो आहोत की काय अशी शंका येण्याजोगे अनुभव येतात.

आईवडिलांमधला संवाद जर आरडाओरडीच्या स्वरूपात असेल तर मुलंही त्याचं अनुकरण करणार. आपल्याला वाटतं की त्यांना काय कळतंय पण मुलं प्रचंड हुशार आणि संवेदनशील असतात. जर आजूबाजूचं वातावरण hostile असेल तर तेही त्याचं अनुकरण करणार. शिवाय आईवडिलांची smart, हजरजबाबी, hyper वगैरेची संकल्पना पूर्ण चुकीची असू शकते. पण त्याबद्दल त्यांना (आईवडिलांना) सांगणार कोण?
बाकी शहरांत खेळण्याच्या जागा कमी होत आहेत हे याचं एक महत्त्वाचं कारण आहे. खेळ ही मुलांमधली ऊर्जा विधायक दृष्टीने कामाला लावण्याचं एक छान साधन आहे. पण त्याकडे दुर्लक्ष होतंय ही चिंतेची गोष्ट आहे.

आईवडिलांमधला संवाद जर आरडाओरडीच्या स्वरूपात असेल तर मुलंही त्याचं अनुकरण करणार. आपल्याला वाटतं की त्यांना काय कळतंय पण मुलं प्रचंड हुशार आणि संवेदनशील असतात. जर आजूबाजूचं वातावरण hostile असेल तर तेही त्याचं अनुकरण करणार. शिवाय आईवडिलांची smart, हजरजबाबी, hyper वगैरेची संकल्पना पूर्ण चुकीची असू शकते. पण त्याबद्दल त्यांना (आईवडिलांना) सांगणार कोण?
बाकी शहरांत खेळण्याच्या जागा कमी होत आहेत हे याचं एक महत्त्वाचं कारण आहे. खेळ ही मुलांमधली ऊर्जा विधायक दृष्टीने कामाला लावण्याचं एक छान साधन आहे. पण त्याकडे दुर्लक्ष होतंय ही चिंतेची गोष्ट आहे.

नाईकांचा बहिर्जी's picture

22 May 2016 - 11:15 am | नाईकांचा बहिर्जी

हल्ली नवपालकांमध्ये एक कॉमन आचार विचार दिसून येतो
लहान मुलांना काहीही करतांना, वागतांना, बोलतांना अडवायचे म्हणून नाही. फार झाले तर मुन्ना/न्नी ...नकोSSS ..इतपतच.
मुलांना वाढवतांना दिलेला मेसेज साधारणत:
सर्वसाधारणपणे वागण्याबोलण्याचे सभ्यपणे वावरण्याचे निकष धाब्यावर बसवून हवे तसे वाग, काही झाले तर आम्ही बघून घेऊ ...इथे सगळे वसूल केले तरच मिळते त्यामुळे वसूल कर, हिसकावून घे, ओरबाड अगदीच नाही तर निदान समोरच्याला मिळू देऊ नकोस ...पण काहीही करून आपले अस्तित्व जाणवून दे ...हक्क महत्वाचे, कर्तव्य जमल्यास कर नाही तर नाही

हे इंटरप्रिटेशन चुक वाटले

अत्रन्गि पाउस's picture

22 May 2016 - 11:21 pm | अत्रन्गि पाउस

अपवाद असतातच हे मी म्हटलंय पण सर्वसाधारण पणे बेशिस्त वर्तन हे फारसे गैर नाही असे काहीसे चित्र दिसत नाही का ?

बोकोबांनी म्हटले तसे खेळ - उर्जा हा मुद्दा बरोबर आहे ( एक रूट cause ) म्हणून .

गामा पैलवान's picture

22 May 2016 - 9:08 pm | गामा पैलवान

अवांतर :

अत्रन्गि पाउस,

तुम्ही वर्णिलेल्या पालकांच्या वर्तणुकीचं दुसरं टोक म्हणजे सायकोपाथ बाप. इथे एक इंग्रजी दुवा आहे. स्वत:च्या जबाबदारीवर उघडणे : https://www.quora.com/What-is-it-like-to-be-a-child-of-a-psychopath/answ...

एखादं मूल अतिलाडाने बिघडून सायकोपाथ होऊ शकतं का?

आ.न.,
-गा.पै.

अत्रन्गि पाउस's picture

22 May 2016 - 11:15 pm | अत्रन्गि पाउस

दुवा नंतर वाचतो ...पण साय्कोपाथ बाप एवढे पुरेसे आहेच ...