सगळं कस साधं सोप्प
सगळं कस साधं सोप्प
एक घर, एक गाडी
आई बाबा आहेत ना फ्रेम मध्ये
एक मुलगी पण मुलगा पाहिजेच
आणि बायको अन मी...
सगळं कस साधं सोप्प
बॉस तिरका असला तरी
आपलं डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर
मग काय प्रमोशन आपलच
सगळं कस साधं सोप्प
गाडीतून भुर्र जाव
गाडीतला AC खाऊन गार व्हावं
भिकाऱ्याने काचेवर टुक - टुक केलं का
तोंड वाकड करून १ रु फेकावा
सगळं कस साधं सोप्प
च्याआईला असं का होतंय
आतून आतून काहीतरी खाताय
असं कस होतंय, जीव का घुसमतोय
दोन दिवसाची सुट्टी घ्यावी
सगळं कस साधं सोप्प