मनाचा एकांत - काळे पाणी

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
30 Sep 2016 - 7:55 am

अंदमानातले काळे पाणी,
कोलूबेड्याहंटरकदान्न
सोबत तीव्र अपमानाचा overtime !
साम्राज्याचा उग्र दर्प अन
देशाने केलेली प्रेमळ उपेक्षा.......
असे सगळे, अन वरती थोडी
जयहिंदची जाळी !

या जीवघेण्या विषाणूजिवाणूंमध्येही,
काही काही रक्तांचे
malnourishment कि काय ते झालेच नाही!
उलट,
तुरुंगाच्या अजस्त्र काळभिंतीही
त्यांच्या जहालहळव्या लेखणीने
cultured झाल्या!
मातृभूमीच्या मृत्युंजय विरोत्तमांसाठी,
.
.
.
दुसरं काय होता
एकांत म्हणजे तरी!

- शिवकन्या

अविश्वसनीयकविता माझीकालगंगाभावकवितामुक्त कविताविराणीवीररसधोरणमांडणीवावरसंस्कृतीधर्मइतिहासवाङ्मयकवितामुक्तकसाहित्यिकसमाजराजकारण

प्रतिक्रिया

फार सुरेख! वेगळी कल्पना आवडली!

रुपी's picture

30 Sep 2016 - 9:36 am | रुपी

सहमत

यशोधरा's picture

30 Sep 2016 - 10:43 am | यशोधरा

सहमत!

अनुप ढेरे's picture

30 Sep 2016 - 10:19 am | अनुप ढेरे

फार सुंदर.

नीलमोहर's picture

30 Sep 2016 - 10:42 am | नीलमोहर

या मालेतील सर्वच कविता सुंदर आहेत,

पद्मावति's picture

30 Sep 2016 - 11:54 am | पद्मावति

या मालेतील सर्वच कविता सुंदर आहेत, सहमत आहे.