✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एका ठिपक्याची रांगोळी ह्या आगामी कादंबरीचा भाग

र
रामदास यांनी
Fri, 09/30/2016 - 10:04  ·  लेख
लेख
चाकोरीबाहेर जाऊन चाकोरी न सोडण्याचं तंत्र आज्जीला खासच जमलं होतं . आज्जी तेव्हा विठ्ठल सायन्नाला म्हणजे ठाण्याच्या सिव्हील हॉस्पीटलला दाई होती. चौथी पास झालेल्या बायांना तेव्हा मिड वायफरीला प्रवेश मिळायचा. ठाण्यात तेव्हा अडलेली बाळंतीण सोडवण्यासाठी गरीबांसाठी असं हे एकच हॉस्पीटल होतं. तेव्हा मालती बाई चिटणीसांच पण हॉस्पीटल नसावं. वैद्य किंवा देवधर तेव्हा नव्हतेच. सांगायचं ते काय की आज्जी दिवसभर बाळंतपणं करण्यात गुंतलेली. ननूमामा म्हणजे आज्जीच्या सवतीचा मुलगा.त्याला त्याच्या मामानी हट्ट करून नंदुरबारलाच ठेवून घेतला होता. माझी आई तेव्हा दुसरीत.कन्या शाळेत.तिला एकदा शाळेत रवाना केलं की आज्जी सिव्हीलला यायची.ड्युटी असो नसो दिवसभर तिथेच काम करायची. सैपाक करणं हे तिच्या आवडीचं काम नव्हतं अशातला भाग नाही पण दिवसभर सिव्हीलमध्ये असली की दोन्ही वेळचं जेवण मेस मध्येच व्हायचं . रात्री खोलीवर जाऊन सतरंज्या झटकून पडलं की दिवस संपायचा. ननूमामा नंदुरबारला असला तरी त्याच्या मामाचं अनंतचतुर्दशीला एक पोस्त कार्ड यायचं . त्यात त्याच्या बहीणीची अविधवा नवमीची तिथी आणि आजोबांची तिथी कुठल्या तारखेला आहे त्याचा तपशील देऊन वर एक टिपणी असायची. "पेन्शन तुमच्या नावावर असल्याने ही जबाबदारी तुम्हाला पार पाडायची आहे." त्यावर आज्जी पण एक पत्र लिहून टाकायची. "माझ्या पसार्‍यात मला तिथी सांभाळायचं काही जमायचं नाही पण अमावस्येला काय ते करीन." सर्वपित्री अमावस्येला ती सोबतच्या दोन दाया आणि दोन वॉर्ड बॉइजना मेस मध्ये बोलवायची. त्यांच्या थाळ्या मागवायची. एक्या-तुक्या सासरा आणि नवरा यांच्यासाठी. सरल आणि निर्मला -दोन सवती सवतींसाठी. त्यांच्या समोर थाळ्या आल्या की त्यांना नमस्कार करायची. एक्यातुक्याला विडीकाडीसाठी बारा आणे .बायांना लुगडी आणि बांगड्यांसाठी सात रुपये. झाली तिथी पार पडली. मग कधीतरी आई विचारायची "आई, अगं तुझ्या आईबाबांचं काय " त्यावर आज्जीचं उत्तर ठरलेलं असायचं "अगं माझे आईबाप पुण्यात्मे !!! .ते बसलेत अमृताच्या वाट्या पित ते कशाला येतायत मेसमध्ये जेवायला "तुझ्या बापाची गोष्ट वेगळेय. त्याचा जीव आहे ना माझ्यावर '" हे म्हण्ता म्हण्ता तिचा आवाज चिरकायचा. हा एकच दिवस असा की आज्जी रात्री जेवायची नाही. रात्री एका ऐवजी दोन सतरंज्या घालायची . एका सतरंजीवर पांढरी चादर घालायची. रंगीत धाबळी हांतरायची. उशाशी चांदीचा प्याला भरून दूध ठेवायची. ......... आणि रात्रभर जागीच असायची. (आज्जी तेव्हा जेमतेम सत्तावीस वर्षाची असेल) * एका ठिपक्याची रांगोळी ह्या आगामी कादंबरीचा भाग .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
23224 वाचन

💬 प्रतिसाद (56)

प्रतिक्रिया

अरे वाह !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 09/30/2016 - 10:07 नवीन
मस्त ! कादंबरीची वाट पाहतोय. शुभेच्छा ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

_/\_

बिपिन कार्यकर्ते
Fri, 09/30/2016 - 10:27 नवीन
(आज्जी तेव्हा जेमतेम सत्तावीस वर्षाची असेल)
मास्टरपीस... सगळं सगळं सांगून झाल्यावर जे सांगायचं असतं ते शेवटच्या वाक्यात आलं. बाकी शैली, भाषा, फ्लो वगैरेबद्दल काही बोलायसारखं उरलंच नाहीये आता. संपूर्ण वाचायची घाई होतीये आता.
  • Log in or register to post comments

सगळं सगळं सांगून झाल्यावर जे

यशोधरा
Fri, 09/30/2016 - 10:35 नवीन
सगळं सगळं सांगून झाल्यावर जे सांगायचं असतं ते शेवटच्या वाक्यात आलं.
हेच म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+१

नीलमोहर
Fri, 09/30/2016 - 10:39 नवीन
उत्कट लेखन, बोलण्यासारखं काही नाही, उत्सुकता आहे फक्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+१

अमृत
Fri, 09/30/2016 - 10:44 नवीन
कादंबरीच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+१११११

नावातकायआहे
Fri, 09/30/2016 - 11:07 नवीन
कादंबरीच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृत

तंतोतंत

नंदन
Fri, 09/30/2016 - 11:10 नवीन
अगदी असेच म्हणतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+१ >>> मास्टरपीस!!

तुषार काळभोर
Fri, 09/30/2016 - 12:49 नवीन
बाकी आम्ही काय बोलावे... कादंबरीच्या प्रतिक्षेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

कधी?

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 09/30/2016 - 10:29 नवीन
कादंबरी कधी येतेय? हे असं उगाचं त्रास नका देउ.
  • Log in or register to post comments

अप्रतिम.

रातराणी
Fri, 09/30/2016 - 10:39 नवीन
अप्रतिम.
  • Log in or register to post comments

वा छान

सुधांशुनूलकर
Fri, 09/30/2016 - 10:42 नवीन
खास रामदासकाका शैली. कादंबरी मस्तच असणार याबद्दल कोणतीही शंका नाही. काका, मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

तंतोतंत

नाखु
Fri, 09/30/2016 - 11:04 नवीन
सहमत. सर्वपित्रीचा योग असाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधांशुनूलकर

तेच म्हणलं अजून कसं नाही तर अडकलाच,

चतुरंग
Fri, 09/30/2016 - 10:50 नवीन
शेवटल्या वाक्याला घशात आवंढा अडकला! आता सगळं वाचेपर्यंत येताजाता आज्जी आठवत राहणार...__/\__
  • Log in or register to post comments

सुंदर!

रुपी
Fri, 09/30/2016 - 10:52 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments

किती मोजक्या शब्दात किती काय काय कवेत घेतात

मारवा
Fri, 09/30/2016 - 11:00 नवीन
रामदास जी किती मोजक्या शब्दांत तुम्ही थेट ह्र्द्याला भिडणारं लिहुन जातात. किती मिनीमम स्ट्रोक्स मध्ये आजीचं चित्रं डोळ्यासमोर उभ केलतं आज सर्वपित्री अमावस्येचा योग साधलात का ? पण अमावस्येचा योग कोणी साधत नाही सहसा. भावुक करुन टाकतात तुम्ही आमच्यासारख्या दगडांना.
  • Log in or register to post comments

आज सर्वपित्री अमावस्येचा योग

सूड
Fri, 09/28/2018 - 19:26 नवीन
आज सर्वपित्री अमावस्येचा योग साधलात का ?
सर्वपित्री ७ तारखेला आहे, पितृपंधरवड्याचं औचित्य म्हणू शकू फार तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

सुंदर.

एस
Fri, 09/30/2016 - 11:02 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments

मस्तं! वाट पहात आहे कादंबरीची

अनुप ढेरे
Fri, 09/30/2016 - 11:03 नवीन
मस्तं! वाट पहात आहे कादंबरीची.
  • Log in or register to post comments

_/\_

अजया
Fri, 09/30/2016 - 11:14 नवीन
कादंबरी कधी येणार?
  • Log in or register to post comments

रामदासकाका, काय लिहायचं आम्ही

अभ्या..
Fri, 09/30/2016 - 11:52 नवीन
रामदासकाका, काय लिहायचं आम्ही अन काय बोलायचं? आता फक्त तुमच्या कादंबरीची वाट पाहायाची. येऊद्या लवकर.
  • Log in or register to post comments

+१ असेच म्हणतो.

राजाभाउ
Fri, 09/30/2016 - 12:13 नवीन
+१ असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मस्त

मित्रहो
Fri, 09/30/2016 - 11:53 नवीन
कादंबरीची वाट बघतोय
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणे खास रामदासकाका टच ..

वरुण मोहिते
Fri, 09/30/2016 - 12:06 नवीन
कादंबरीच्या प्रतीक्षेत
  • Log in or register to post comments

वावा..

स्वाती दिनेश
Fri, 09/30/2016 - 12:07 नवीन
तुमचं नवीन काही लेखन येतय म्हटल्यावर ते अधाशासारखं वाचून काढलं जातंच.. कादंबरीची वाट अर्थातच पाहत आहे. (अति अति अवांतर- बरेच, बरेच दिवस झाले हो भेटून.. हेच त्या केसु, बिका आणि नंदूलाही लागू आहे..) स्वाती
  • Log in or register to post comments

कोण स्वातीताई?

बिपिन कार्यकर्ते
Fri, 09/30/2016 - 12:56 नवीन
कोण स्वातीताई? कोण केसु? कोण नंदू? ;) ;) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

चला, पुन्हा लिहीते झालात तर..

संजय पाटिल
Fri, 09/30/2016 - 12:11 नवीन
चला, पुन्हा लिहीते झालात तर.. कादंबरीची वाट पाहतोय..
  • Log in or register to post comments

_/\_

लॉरी टांगटूंगकर
Fri, 09/30/2016 - 12:12 नवीन
रामदासकाकांना बोर्डावर बघून अचानक जर आज द्रविड खेळायला उतरल्यावर होईल तसा आनंद झाला. प्रकाशनपुर्व नोंदणी कुठे आणि कशी करायची हे कळवणे.
  • Log in or register to post comments

+१ सहमत

माणदेशी
Fri, 09/30/2016 - 16:50 नवीन
बऱ्याच दिवसांनी रामदासकाकांचं लेखन वाचलं. आता फक्त वाट पहात आहे कादंबरीची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

+१ सहमत

माणदेशी
Fri, 09/30/2016 - 16:50 नवीन
बऱ्याच दिवसांनी रामदासकाकांचं लेखन वाचलं. आता फक्त वाट पहात आहे कादंबरीची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

शुभेच्छा!

पैसा
Fri, 09/30/2016 - 12:19 नवीन
कादंबरीला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

अप्रतिम

भीडस्त
Fri, 09/30/2016 - 13:28 नवीन
टिपिकली रामदास'
  • Log in or register to post comments

लवकर पुढचे भाग येऊद्या.

गौतमी
Fri, 09/30/2016 - 13:29 नवीन
लवकर पुढचे भाग येऊद्या. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

सुंदर

विचित्रा
Fri, 09/30/2016 - 13:57 नवीन
नेहमीप्रमाणेच
  • Log in or register to post comments

शुभेच्छा. पुभाप्र .

सिरुसेरि
Fri, 09/30/2016 - 14:26 नवीन
शुभेच्छा. पुभाप्र .
  • Log in or register to post comments

कब है कादंबरी?

आदूबाळ
Fri, 09/30/2016 - 15:37 नवीन
कब है कादंबरी?
  • Log in or register to post comments

वाह क्या बात है...

अभिरुप
Fri, 09/30/2016 - 15:46 नवीन
तुमचे लेखन वाचल्यावर असं वाटतं की मिपावर फक्त वाचक म्हणूनच रहावे. आजही जेव्हा दूध पिण्याची वेळ येते तेव्हा "काटेकोरांटीची फुलं" आठवल्याशिवाय रहात नाही. जबरदस्त ताकद आहे तुमच्या लेखणीत. तीच आम्हा वाचकांसाठी आणि समस्त मिपाकरांसाठी मेजवानी आहे.लिहिते रहा.
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

समीरसूर
Fri, 09/30/2016 - 16:31 नवीन
अप्रतिम! अतिशय हृदयस्पर्शी लेखन! कादंबरीसाठी शुभेच्छा! कधी येईल बाजारात?
  • Log in or register to post comments

कादंबरीसाठी शुभेच्छा, ़

धनावडे
Fri, 09/30/2016 - 17:37 नवीन
कादंबरीसाठी शुभेच्छा, ़
  • Log in or register to post comments

वाह ! कधी येणार कादंबरी?

स्रुजा
Fri, 09/30/2016 - 17:50 नवीन
वाह ! कधी येणार कादंबरी?
  • Log in or register to post comments

+1

सखी
Mon, 10/03/2016 - 09:27 नवीन
कधी येणार कादंबरी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

शब्दप्रभू

धर्मराजमुटके
Fri, 09/30/2016 - 17:52 नवीन
शब्दप्रभू नमस्कार. आता ह्या रामदासी संप्रदायात सहभागी व्हायलाच हवं.
  • Log in or register to post comments

ग्रेट लिहिलयत.

रेवती
Fri, 09/30/2016 - 18:37 नवीन
ग्रेट लिहिलयत.
  • Log in or register to post comments

आज्जी डोळ्यासमोर उभी राहीली.

खटपट्या
Sat, 10/01/2016 - 00:53 नवीन
आज्जी डोळ्यासमोर उभी राहीली. जुने ठाणेही डोळ्यासमोर उभे केलेत. माझा जन्म मालतीबाइ चिटणीसांच्या हातचा. त्यामुळे उगाच मन भूतकाळात गेले...
  • Log in or register to post comments

मस्त!कधी मिळेल पूर्ण कादंबरी

इशा१२३
Sat, 10/01/2016 - 08:01 नवीन
मस्त!कधी मिळेल पूर्ण कादंबरी वाचायला?
  • Log in or register to post comments

अर्थातच आवडलं!!!

पिलीयन रायडर
Sat, 10/01/2016 - 08:59 नवीन
अर्थातच आवडलं!!!
  • Log in or register to post comments

जेवायला बोलवायचं न नुसतं पण

नूतन सावंत
Sun, 10/02/2016 - 08:42 नवीन
जेवायला बोलवायचं न नुसतं पण दाखवायचं असं झालाय मला.प्रकाशनाची तारीख काय आहे.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

सौन्दर्य
Sun, 10/02/2016 - 08:59 नवीन
अतिशय मोजक्या शब्दांत आजीची व्यक्तिरेखा रंगवलीत. शेवटचे वाक्य काळजात घर करून गेले, कारण आजी म्हंटली म्हणजे कमीत कमी साठीच्या पुढची स्त्री डोळ्यासमोर आली. पुढील वाचनाची उत्सुकता लागली आहे.
  • Log in or register to post comments

क्या बात है!

बोका-ए-आझम
Sun, 10/02/2016 - 14:35 नवीन
म्हणजे आता रामदासकाका आॅफलाईन जगातही तलवार गाजवणार तर! कादंबरी घेणारच!
  • Log in or register to post comments

"अगं माझे आईबाप पुण्यात्मे !!

शिव कन्या
Mon, 10/03/2016 - 22:01 नवीन
"अगं माझे आईबाप पुण्यात्मे !!! .ते बसलेत अमृताच्या वाट्या पित ते कशाला येतायत मेसमध्ये जेवायला "तुझ्या बापाची गोष्ट वेगळेय. त्याचा जीव आहे ना माझ्यावर '" हे म्हण्ता म्हण्ता तिचा आवाज चिरकायचा. भिडलं एकदमच!
  • Log in or register to post comments

काका

सविता००१
Tue, 10/04/2016 - 14:09 नवीन
अप्रतिम. वाट पहातेय कादम्बरीची. कधी होणार प्रकाशित?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा