काळरात्र आयझँक असिमोव्ह

विचित्रा's picture
विचित्रा in जनातलं, मनातलं
29 Sep 2016 - 12:23 pm

सारो युनिव्हर्सिटीचा संचालक, अँटन ७७ भडकला होता. समोरच्या तरुण पत्रकाराकडे तो रोखून बघत होता.पण थरमॉन ७६२ ला त्याच्या रागाने काहीच फरक पडला नव्हता.आपल्या उमेदवारीच्या
काळात त्याने अशा अनेक अशक्य मुलाखती घेतल्या होत्या आणि बदल्यात शरीरावर जखमा,मोडलेली हाडे नि सुजलेल्या डोळ्याची कमाई केली होती.अर्थात त्यामुळे त्याचा आत्मविश्वास कमालीचा वाढला होता. आता तो फक्त
संचालकाचा पारा उतरण्याची वाट बघत होता. त्याच्या मते आधीच हे सगळे अवकाशसंशोधक विक्षिप्त होते,नि हा वृद्ध संचालक त्यांचा शिरोमणी.
संचालक रागावर ताबा ठेवत कसाबसा बोलू लागला," तुझ्या धाडसाचं कौतुकच करायला पाहिजे. सतत दोन महिने आमच्यावर टीका केल्यावर..." "सर, पण," संस्थेचा टेलिफोटोग्राफर बिनी २५ , भितभित मध्ये बोलायचा प्रयत्न करत होता. " आता तू मध्ये बोलू नकोस." अँटन त्याच्याकडे वळून म्हणाला."तू त्याला चांगल्या हेतूने इथे आणलं असशील कदाचित,पण त्याला काय सांगायचं ते मी बघतो"
आता थरमॉन मध्ये पडला. " पण संचालक साहेब, माझं म्हणणं तरी ऐकून घ्या." " त्याने काय फरक पडणार आहे आता? " अँटन परत बरसला. " गेले दोन महिने, तू तुझ्या स्तंभातून आमच्याविरुद्ध मोहिम उघडलीयेस. मी आणि माझे सहकारी ज्या आपत्तीविषयी समाजात जागृती करण्याचा प्रयत्न करतोय, त्या आमच्या कष्टांची तू चेष्टा करतोयस., आणि आजच्या महत्वपूर्ण दिवशी तुला आमच्या संस्थेतून वृत्तांकन करायचयं?" अँटन ने दै. सारो शहर वार्ता नावाचं ते वृत्तपत्र रागाने मेजावर आपटलं, नि हात पाठीशी बांधून तो येरझार्या घालू लागला.

" तू जाऊ शकतोस आता." अँटन खिडकीशी उभा राहून आकाशाकडे पाहात होता. त्या ग्रहाच्या सहा सुर्यांपैकी ,'गँमा' हा सर्वात तेजस्वी तारा आता मावळत होता. अँटन ला वाटलं ," पून्हा हे दृश्य बघायला मी देहबुद्धीने जागृत असेन का?" मग अचानक तो मागे वळला. " थांब. मी देतो तुला बातमी." पण पत्रकाराने जाण्याचा विचार केलाच नव्हता.
तो सावकाश खिडकीपाशी आला. " आपल्या सहा सूर्यांपैकी फक्त 'बीटा' शिल्लक आहे आकाशात. दिसतंय तुला? " हा प्रश्न अनावश्यक होता. बीटा सूर्य आता माथ्यावर होता. हा सर्वात दूरचा सूर्य थरमॉनला आज जास्तच लहान वाटला. पण त्याच्या केशरी किरणांमध्ये शहर न्हाऊन निघालं होतं. लगाश ग्रह ज्या तार्याभोवती फिरतो, तो अल्फा तारा आणि इतर दोन तार्यांच्या जोड्या आत्ता विरुद्ध गोलार्धात होत्या. फक्त अल्फाचा जोडीदार लाल बटू तारा आता आकाशात राहिला होता.

कथा

प्रतिक्रिया

पैसा's picture

29 Sep 2016 - 2:36 pm | पैसा

छान रूपांतर केलंय. जरा मोठेमोठे भाग टाका. आणि शब्दशः भाषांतर करू नका. कारण कॉपीराईटचा प्रश्न येतो.

विचित्रा's picture

29 Sep 2016 - 8:22 pm | विचित्रा

धन्यवाद पैसाताई

सिरुसेरि's picture

30 Sep 2016 - 2:29 pm | सिरुसेरि

छान लेख . नोलनचा "इंटर स्टेलर" आठवला.