नोकरीसाठी गेल्यावर सायकोमेट्रिक परीक्षा घेतात त्यात असे प्रश्न असतात – लाल रंगाची वस्तू सांगा म्हटल्यावर तुमच्या मनात खालील चारपैकी कुठली वस्तु आधी येते?
लाल गुलाब, ट्रॅफिक सिग्नल, रक्त, आगीचा बंब.
यात बरोबर/चूक असं उत्तर नसतंच. पण तुमच्या उत्तरावरून तुमच्या विचारधारेची कल्पना येते (असं म्हणतात तरी).
तसं ‘बोट’ म्हटलं की भूवासियांच्या मनात लगेच ‘वादळ’ हे येतंच. आणि त्यात चूक काहीच नाही. वादळाबद्दल उत्सुकता आणि भीती सगळ्यांना असतेच. आपल्या वाचण्यात येतं की आन्ध्र प्रदेशला किंवा बांगलादेशला चक्री वादळाचा तडाखा बसला. समुद्रकिनार्यापासून दीडशे कि.मी. पर्यंत हानी झाली. दीडशेच्या पुढे का नाही?