काल मयश्या, दाद्या आणि सम्या आलेले. जबड्याला, पाठीला, कढलेली आंबेहळद लावलेली बघून बेक्कार हसले! :(
हरामखोर, शितलीचा भाऊ पंधराएक बाईक, डस्टर घेऊन आलेला, तेव्हा त्याच्या ग्रूपमध्ये थांबलेले!
शितलीच्या भावाने मारलेलं चालल असत राव. बापाला कुणी सांगितलं? :(
बापाने मार्च एंडिंगवानी हिशोब संपवला! मागचं 'घोडा' प्रकरणही काढल. मुळात चिडण्यासारखं काय होत कळेना!
म्हणजे, त्या दिवशी आतेभावाच लग्न ठरल्याचं कळाल. तर आता 'घोडा' लागणार अस म्हटलेलो! आता, वरातीला घोडा नको? बापाने परवा मारताना सारख, घोडा, घोडा म्हणतच मारल! :( ते खडूतून धूर काढल्याचा राग, आता हे शितलीच प्रकरण! च्याआयला, परीक्षेत मागनं ढोसंल की, बघतोच तिला!
मघाशी नेटपॅक संपलाय म्हटलो तर बाप खेकसलाच!!
- संदीप चांदणे
वाचने
3922
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
आरारा आणि मी पयला :)
(No subject)
ते गैरोमें कहाँ दम था वगैरे
वहां क्यु _ _ ने गया. जहां
In reply to ते गैरोमें कहाँ दम था वगैरे by रातराणी
ई अभ्या तू पण :( ;)
In reply to वहां क्यु _ _ ने गया. जहां by अभ्या..
=))
हे धमाल ^=^