मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रवास

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

कॅप्टन जॅक स्पॅरो ·
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

पानिपत

बिपिन कार्यकर्ते ·
लेखनप्रकार
प्रिय अमोल, काही क्षण हे काही विशिष्ट व्यक्तींबरोबरच उपभोगायचे असतात. अन्यथा एक तर ते पूर्ण उत्कटतेने भोगता येत नाहीत किंवा त्यांची थेट माती तरी होते. माझ्याही मनात असे काही क्षण आहेत जे कधी माझ्या वाट्याला आलेच तर त्या वेळी तू बरोबर हवा आहेस. मी रायगडावर महाराजांच्या समाधीसमोर उभा राहीन तर तेव्हा तू तिथे असावास. कधी तोरण्याच्या बिनी दरवाजातून आत शिरेन तर तेव्हा तू बरोबर असावास. एखाद्या माळरानावर किंवा जंगलात नदीच्या किनारी टेंटमध्ये रात्रभर गप्पा मारायचा योग आला तर तो तुझ्याच बरोबर यावा.

रडू

बिपिन कार्यकर्ते ·
लेखनप्रकार
शनिवार भारतातील आपल्या क्षेत्रात एक मोठे ब्रॅंडनेम असलेल्या एका मोठ्या कंपनीच्या लंचरूममध्ये हा जेवायला बसलाय. टेबलवर समोरच्या खुर्चीत त्या कंपनीचा एक उच्चपदस्थ बसलाय. गप्पा चालू आहेत. उशिर झालाय. दोघेच उरलेत. त्याची सुबत्ता याच्या सुबत्तेपेक्षा कमीत कमी दसपट तरी असेल. जास्तच पण कमी नाही. माणुस तसा भला. पण सतत काळजीच्या छटा घेऊन वावरत असतो. ओळख होऊन दहा एक दिवस झालेत. त्यामुळे आता हळू हळू गाडी व्यक्तिगत आयुष्य, आवडीनिवडी वगैरेंवर येत आहे. गप्पा चालू आहेतच. गाडी डाएट, फ़िटनेस, हार्ट वगैरे रूळांवर धावतीये आता.

एक "टवाळ" संध्याकाळ

कॅप्टन जॅक स्पॅरो ·
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.

पोपट....

ज्ञानोबाचे पैजार ·
माझ्यासाठी ठेवलेल्या पिंडाकडे पहात, मी हटवाद्या सारखा बसलो होतो, जाताजाता तिला अडकवल्या शिवाय, मी पिंडाला मुळी शिवणारच नव्हतो, तिच्या एका निर्दय नकारा मूळे, मी हे जग सोडले, हे सर्वांना ठाउक होते, तेव्हा मी अगतिक होतो, आता तिलाही तसेच झालेले मला पहायचे होते, बर्‍याच शपथा घेतल्या आणि घालल्या गेल्या, मी कशालाही बधलो नाही, आजूबाजूचे कावळेही प्रचंड दबाव टाकत होते, पण मी जागचा हललो नाही, मला खात्री वाटत होती, अजुन थोडेसे ताणले, की ती नक्की येईल, या जन्मी जरी नाही जमले, तरी पुढच्या जन्मीचे वचन नक्की देईल, मग दिमाखात पिंडाला चोच मारुन, तिच्या समोरुन मला उडून जायचे होते त्या आधि, एकदातरी माझ्यास

अ‍ॅलीना रोमरः मराठी विषयाची विद्यार्थिनी

पाषाणभेद ·
लेखनप्रकार
नमस्ते, माझे नाव अ‍ॅलीना रोमर आहे. मी नॉर्वेची नागरीक आहे. मी पुन्यात शिकते. मी पुने युनिवर्ससिटी मदे मराठी सब्जेक्टमदे बीए करते आहे. मला मराठी खुप खुप आवडते. मी रोज युनिवर्ससिटी मदे जाते. मला माझे कॉलेज खुप आवडते. मी माझ्या घरमालकांकडे पेईंगगेस्ट आहे. मी कोथरूडला राहते. मी दररोज पायी चालत कॉलेजला जाते. चालत जातांना मला नागरीक दिसतात. दुकानदार दिसतात. रिक्षा दिसतात. म्हणून मी चालत कॉलेजला जाते. यामुळे मला दररोज नविन गोष्टी समजतात. म्हणून मी चालत कॉलेजला जाते. यावेळी मला भारतातले नागरीक दिसतात.

महिला दिन’: मोझाम्बिकचा: भाग २

आतिवास ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाग १ वाचून, ऐकून, पाहून स्त्रियांच्या स्थितीबाबत माझं जे मत तयार होतंय, ते तपासून घ्यायची एक उत्तम संधी अशा दृष्टिकोनातून मग मी ७ एप्रिलची वाट पाहायला लागले…. प्रत्येक शहरात सार्वजनिक समारंभाच्या जागा ठरलेल्या असतात, तशीच इथली जागा म्हणजे एक बाग आहे. मानिका प्रांताची राजधानी असलेल्या चिमोयो शहरात ’२५ सप्टेंबर’ हा खड्डा नसलेला एकमेव रस्ता आहे. या रस्त्यावर विधानसभा आहे, राज्यपाल निवास आणि बरीच मंत्रालयं आहेत. त्यामुळे हा रस्ता चांगल्या स्थितीत आहे. त्याच्या एका टोकाला असलेली ही बाग. बाग हे आपलं उगाच दिलेलं नाव आहे खरं तर.

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

कॅप्टन जॅक स्पॅरो ·
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन. (काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच) तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र. आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो. १. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा.

गनिमी कावा

विदेश ·
विचारत इकडे तिकडे आले आज पाहुणे घरात आले अहाहा सदन धन्य झाले .. निवांत खुर्चीवर ते बसले मान डोलवत जरासे हसले रुमालाने तोंडही पुसले .. 'कसे काय तुम्ही वाट चुकला आठव आमचा कसा जाहला ?' - गूळपाणी देत प्रश्न विचारला .. ओशाळवाणे पाहुणे हसले हळूच इकडे तिकडे पाहिले प्रश्नाचे उत्तर देणे टाळले .. पिशवीतून मोबाईल काढला रुमालाने स्वच्छही पुसला माझ्या हाती तो सोपवला .. "गनिमी कावा" त्याचा ध्यानी आला माझ्या त्याच क्षणी मुकाट उठलो हाती धरुनी .. जर्जर जीव त्या पाहुण्याचा "चार्जर" विसरला मोबाईलचा शोधला पत्ता माझ्या घरचा .. ! .