आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १
मानवाने ज्या दिवसापासून सागरसंचाराला सुरवात केली आहे, त्या दिवसापासून पंचमहाभूतांपैकी एक असलेल्या जलतत्वाच्या या सर्वात रौद्र अविष्काराशी त्याचं अनोखं नातं निर्माण झालेलं आहे. सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये आणि ग्रंथांमध्ये मानवाच्या सागराशी असलेल्या बंधाचे उल्लेख आढळतात. इजिप्शीयन आणि ग्रीक संस्कृती बहरल्या त्या भूमध्य समुद्राच्या सान्निध्यात तर द्रविडीयन संस्कृती बहरली ती हिंदी महासागर आणि त्याचे भाग असलेल्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या काठी.
पूर्णत्वास गेलेल्या संस्कृतींनी नित्यनवीन प्रदेशाची आस बाळगली होती.
मिसळपाव
