Skip to main content

क्रीडा

आमचेही क्रिकेट

लेखक हरिप्रिया_ यांनी शुक्रवार, 25/02/2011 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेटचे सुरु झालेले महासंग्राम आणि त्या निमित्ताने मिपाने दिलेल व्यासपीठ..त्या निमित्ताने माझ्याकडून हा प्रयत्न... आम्ही BE ला असतानाची ही गोष्ट. आमच्या D.Y.Patil College Of Engg,कोल्हापूरला २५ वर्ष पूर्ण झाली होती. त्या निमित्ताने कॉलेज मध्ये अनेक नवीन गोष्टी सुरु होत्या. २५ वर्षातील सर्व विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन वगैरे दणक्यात साजरा करून झाल होत.