क्रीडा
दुसर्या कुत्र्याच्या प्रतिक्षेत ( तिचा कुत्रा -१)
तिचा कुत्रा - १
एक प्रयत्न.
(विवेकरावांची क्षमा मागून)
लहानपणापासुन ओळख होती आमची
भेटत होते तसे रोजच.
“मित्रच माझा” म्हणाली.
'हुषार आहे अगदी'
हसले मी.
'कुत्रे असतातच हुषार'
म्हणाले.
'नाही, पण हा. म्हणजे....' ती म्हणाली
'हुशार हो अगदी
सकाळी बाहेर जातो न चुकता
घरावर तर लक्ष फार
सगळे दारूडे, चोर, अगदी “यांच्यावर” सुद्धा.
माझ्याकडं बघताय ना? वाटते का तिशीची?
याच्याशी खेळणे अगदी रोजच्या रोज
रेग्युलर आहे तसा तो सगळ्यातच
आणि पर्टिक्युलरही.
अनिल कुंबळे - एक जंबो गोलंदाज
अनिल कुंबळे संडास तुंबले हा वाक्प्रचार आम्ही शाळेत असताना लै म्हणजे लै च फेमस होता. वास्तविक अनिल कुंबळेचा आणि संडास तुंबण्याचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. पण कुंबळे आणि तुंबले याचे यमक जुळते म्हणून बिचार्या कुंबळेवर विनोद व्हायचे. असाच एक इथे विषद न करतायेण्याजोगा विनोद त्याच्या फिरकी गोलंदाज असण्यावर पण व्हायचा. तो ही होण्यासारखे काही पाप के एन कृष्णास्वामी कुंबळ्यांच्या या पोराने केलेले नाही पण भारतीय इतिहासातला सर्वात यशस्वी गोलंदाज होउनदेखील त्याचे योग्य ते श्रेय कधीच न मिळणे ही कदाचित अनिल कुंबळेच्या आयुष्यातली सर्वात मोठी शोकांतिका असावी.
७) एका खेळियाने - "युनायटेड" वुई स्टॅन्ड
परवाच आमच्या पराचं "भन्नाट" वाचत होतो... सु.शि. म्हणजे आधीच आपला वीक पॉईंट. त्यात पराच्या कन्सेप्टनीच डोक्याला शॉट दिला. दारा, मंदार, फिरोज आणि अमर विश्वास एकत्र?? एकेकाच्या "परा"क्रमाच्या कथा वाचताना सुद्धा भान हरपायला होतं. आणि हिथंतर पराभाऊ काय सांगून राहिले? दाराची अमानवी ताकद, अमरचं अफाट डोकं, मंदारचा स्मार्टनेस आणि फिरोजचं बैदुल एकत्र?? "अब्ब आयेगा मजा"। हे म्हणजे एका बाजूनी मॅक्ग्रा, दुसर्या बाजूनी वॉर्न, मागे गिलख्रिस्ट आणि स्लिप्समध्ये पाँटिंग झालं की राव ! च्यायला....
निस्तीच पोकापोकी!
एकानं दुसऱ्याला पोक केलं की दुसऱ्यानं पहिल्याला पोक करायचं, कोणी ‘हे’ शेअर केलं की कोणी ‘ते’ शेअर करणार, कोणी ‘ह्याची’ इमेज पेष्ट केली की कोणी ‘तिच्या’ इमेजा पेष्ट करीत सुटणार... सोशल नेटवर्किंग साईटा म्हणजे निस्ती पोकापोकी झालीय बघा. काय मनाला वाट्टेल ते गरळ बाहेर टाकून ओकाओकी करीत जायचं. भिंतीवर चढून पाहिजे ते खरडीत निघायचं, वाट्टेल ते डकवित चालायचं, नक्को नक्को त्या लिंका पेष्टवित जायचं. मग त्या कोण उघडून पाहतो तर कोणी न उघडताच छान, मस्त, उत्तम असं लिहून पुढे पळतो.
सकाळ झाली रे झाली की सुप्रभात, जीएम म्हणत कोण काय प्रतिक्रिया देतो ते चाळीत जायचं. दुपारीही तेच.
'सायलेन्स प्लीज'...थँक यू...
गेल्यावर्षी लेबर डे च्या सुट्टीला यु एस ओपन बघायला गेलो होतो. यावर्षी लेबर डे चा दिवस गुर्जी घासकडवी आणी लंबूटांग यांच्यासोबत साजरा केला होता.
मी गेल्या शनीवारी(१० सप्टेंबर रोजी) परत एकदा गुर्जी आणी लंबूटांग सोबत त्यांच्या गावची गणपती विसर्जन मिरवणूक बघायला जायचा प्लान केलेला होता पण, गुर्जी आणी लंबूटांग या दोघांनीही टांग दिल्याने ;) ऐन वेळेस यु एस ओपनचे तिकीट काढायचे ठरवले.
फ्रायडे टाईमपास
कधीकधी माझ्यातच पाहतो मी
एक बेहद्द नाममात्र घोडा
पाठीवरती जीन मखमली
पायी रुपेरी तोडा
म्हणे कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर
इमानाने जन्मभर रेटायचा ऐसा गाडा ?
कधीकधी माझ्यातच पाहतो मी
भव्य हिमालय तुमचा अमुचा
ज्याच्या छातीचा फोडुनिया कोट ,
गुलाम केले गेले जयाने लोक तीस कोट.
बोलेना तो खळ मैंद म्हणती बळकट धश्चोट
कर्मठ जो प्राणी तो पोंचट.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी
गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा जो नुसतिच काडी
नाही खर्चिली कवडी दमडी
नाहि वेचिला दाम
श्रीराम जयराम जयजय राम.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी
षंढ सारी लेकरे
लेकरे उदंड जाली
अरुण उगवला पहाट झाली
झाले मोकळे आकाश
आकाश झाले थेन्गने अन
चानदन्या झ
होड्या सोडणे
आमची बी एक
आमची प्रेरणा : ही भयभीषण कविता
कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर
विसर षंढ-गंध आता , जाळुनीया राख कर
वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला
वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला
यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर..
कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर
टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे
चिंधड्या तव "कव्वितेच्या" फ़ाडती शेंबडी मुले
ना कुणी तुज तारीफेला , तू अपेक्षा लाख कर!!
कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर
कोण झोपे, काय झाले, ना इथे पडले कुणा
"भीक नाही , काव्य आवर" बाकी कुणी काही म्हणा
"जळ्ळीं मेली लक्षणे ती, हे रसीका तूच मर!"
मिसळपाव