Skip to main content

धर्म

सन २५१३ मधला मिसळपाववरील ऐक लेख…

लेखक पगला गजोधर यांनी बुधवार, 08/04/2015 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
टीप १ : *** अत्यंत अत्यंत अत्यंत काल्पनिक ……! टीप २ : (लेखाची पार्श्वभूमी, २१ व्या शतकातल्या वाचकांसाठी :: १६ मार्च २२८० रोजी, ३ मैल व्यास असलेली १९५०-डीए नावाची उल्का पृथ्वीवर ताशी ३८ हजार मैलांच्या वेगाने आदळली. अर्थातच ती पृथ्वीच्या जवळ येण्यापूर्वी तिच्या ठिकऱ्या करण्याचे किंवा मार्ग बदलण्यासाठी, पृथ्वीवासियांनी, तिच्यावर अण्वस्त्रांचा मारा केला होता.

चांगदेवपासष्टी (मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे)

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शनिवार, 28/02/2015 01:08 या दिवशी प्रकाशित केले.
२७ फेब्रुवारी - मराठी भाषा दिनाच्या सर्व मराठी बांधवांना अनेकानेक शुभेच्छा ! माझा मराठाचिये काय बोलु कौतुके ! अमृता तेही पैजा जिंके ! ऐसी अक्षरे रसिके ! मेळवीन !! मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे/ समृध्दीस्थळे म्हणल्यावर मनात पहिला विचार आला तो माऊलींचाच . संत ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद्भगवदगीतेवर मराठी भाषेतील टीका जी की भावार्थदीपीका अर्थात ज्ञानेश्वरी लिहुन सर्वसामान्य जनांवर जे उपकार केले आहेत त्याचे वर्णन करावे तरी कसे ? जशी जशी ज्ञानेश्वरी वाचत जातो आणि जशी जशी ती उमगत जाते तसे तसे संत ज्ञानेश्वरांना पुरुष असुनही "माऊली" असे का म्हणतात ते कळायला लागते .

हर्षयुक्त उमापती

लेखक देवदत्त परुळेकर यांनी मंगळवार, 17/02/2015 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज महाशिवरात्री शिवाचे वर्णन करणारा संत नरहरी सोनार महाराजांचा हा लोकप्रिय अभंग आहे - भस्म उटी रुंडमाळा । हातीं त्रिशुळ नेत्रीं ज्वाळा ॥ १ ॥ गज चर्म व्याघ्रांबर । कंठीं शोभे वासुकी हार ॥ २ ॥ भूतें वेताळ नाचती । हर्षयुक्त उमापती ॥ ३ ॥ सर्व सुखाचें आगर । म्हणे नरहरी सोनार ॥ ४ ॥ या अभंगात महाराज शिवाच्या रुपाचे तसेच स्वरुपाचेही वर्णन करतात. कसा आहे तो महादेव ? नरहरी सोनार महाराज वर्णन करतात - भस्म उटी रुंडमाळा । हातीं त्रिशुळ नेत्रीं ज्वाळा ॥ १ ॥ शिवाने भस्माची उटी अंगाला फासली आहे.

नरहरी सोनार हरीचा दास

लेखक देवदत्त परुळेकर यांनी शनिवार, 07/02/2015 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज संत नरहरी सोनार महाराज यांची पुण्यतिथी (माघ वद्य तृतिया). त्यांना भावपूर्ण आदरांजली. वारकरी संत मंडळात विविध जातीजमातीचे संत आहेत. विविध व्यवसाय करणारेही संत आहेत. बहुतेक संत प्रपंच करीत परमार्थ साधनाही करीत होते. गोरा कुंभार, सावता माळी, सेना न्हावी यांच्या नावातच त्यांचा व्यवसायही दडला आहे. नरहरी महाराज हे सुवर्णकार जातीतले होते. वाड्‌.मयेतिहासात त्यांचा ’नरहरी सोनार’ असा उल्लेख केला जातो. यादवकालात शिवाचे उपासक ’शैव’ आणि विष्णूचे उपासक ’वैष्णव’ या दोन्ही संप्रदायांचा विशेष प्रभाव होता.

वै. विष्णुबुवा जोग महाराज

लेखक देवदत्त परुळेकर यांनी बुधवार, 04/02/2015 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
विष्णुबुवा जोग महाराज यांची आज पुण्यतिथी (गुरुप्रतिपदा) त्यांना भावपूर्ण आदरांजली. ते नाशिकला रामकुंडावर स्नानासाठी गोदावरीमध्ये उभे राहिले. तीरावरील तीर्थोपाध्याय संकल्प सांगू लागला - " पापोहं पापकर्माहं पापात्मा पापसंभव: ॥ बुवा एकदम त्याच्यावर खेकसले. "मी पापीही नाही, पापकर्मीही नाही ! दुसरे काय म्हणायचे असेल ते म्हणा, एवढा हा संकल्प उच्चाराल, तर खबरदार !" कोण होते हे बुवा ? या दुर्लभ संत पुरुषाला विष्णुबुवा जोग या नावाने ओळखतात.

तुमच्या घराण्यातील अथवा परिचयातील कतृत्ववान अथवा दखल घेण्याजोग्या व्यक्तींची माहिती द्या

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 15/01/2015 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आपल्या (तुमच्या) चालू अथवा मागच्या पिढीमध्ये अथवा परिचयात कतृत्ववान अथवा दखल घेण्या जोग्या व्यक्ती असू शकतात पण काही ना काही कारणाने त्यांच्या बद्दल लिहावयाचे, दखल घ्यावयाचे राहून जाऊ शकते. तर दुसर्‍या बाजूस अगदी प्रसिद्ध व्यक्तीबद्दलसुद्धा प्रत्यक्षात पुरेशा माहितीचा अभाव आढळून येतो अथवा माहितीत गॅप्स राहून जातात. या धाग्याच्या निमीत्ताने अशा आपल्या परिचयातील व्यक्तींबद्दल लिहिते करण्याचा हा छोटासा प्रयत्न. लगेच वेळ नसेल तर भविष्यात तरी लेखन करू इच्छित असाल अशी आपल्या परिचयातील नावे किमान नोंदवून ठेवावीत.

वेदाध्ययनातील- संथा देणे... अर्थात वेदाभ्यास शिक्षण/पाठांतर पद्धती

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 15/01/2015 04:02 या दिवशी प्रकाशित केले.
....................................................................................................................................... खुलासा:- वेदपाठशाळांमधे प्राचीन काळापासून अध्ययन/अध्यापनाची एकच एक अशी, परंपरागत पद्धती रहात आलेली आहे. ही पद्धती फक्त पाठ करून ठेवण्याच्या विषयाकरिताच निर्माण झालेली आहे. हिला सामन्यतः मौखिकी अध्यापन पद्धती असे म्हटले जाते. ह्या पद्धती विषयी खूप जणांच्या मनात कुतुहल,आस्था,चिकित्साभाव इत्यादी असते. आंम्हा पुरोहित मंडळीना काम करत असताना,पाठांतर पाहुन ह्या अनुषंगानी काहि प्रश्नंही विचारले जात असतात.

देव तिळीं आला

लेखक देवदत्त परुळेकर यांनी बुधवार, 14/01/2015 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सण साजरे करतो ते केव्हा? सण विशीष्ठ दिवशी साजरे केले जातात. त्याचा संबंध कालगणनेशी आहे. वर्षाची सुरवात चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी गुढी पाडवा, फाल्गुन पौर्णिमेला होळी, आश्विन शुद्ध दशमीला दसरा, आश्विन अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. पण संतांच्या घरचे सण काही वेगळेच आहेत. तुकाराम महाराज म्हणतात दसरा दिवाळी तोचि माझा सण । सखे हरिजन भेटतील ॥ सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होते तो पर्वकाळ म्हणजे मकर संक्रमण अर्थात मकर संक्रांत हा सण.