Skip to main content

धर्म

डॉ. झाकिर नाईक - माझी प्रतिक्रिया

लेखक उगा काहितरीच यांनी शुक्रवार, 03/10/2014 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
(सदरील मुळ लेख ईंग्रजीत असुन भाषांतराच्या चुका असु शकतात) काल मित्राने डॉ. झाकिर नाईक व श्री श्री रविशंकर यांच्यात झालेल्या चर्चेचा विडीओ दिला. सदर कार्यक्रम पाहिल्यवर माझ्या मनात उठलेले विचार... कार्यक्रमाचा विषय होता: “the conecpt of god in Hinduism and Islam in the light of the sacred scriptures.” पहिली गोष्ट जी माझ्या मनात आली ती कोणत्याही व्यक्तीच्या मनात येईल ती म्हणजे डॉ. झाकिर नाईक यांची स्मरणशक्ती. कमाल आहे राव ! त्या टोपीखाली एवढा डेटा साठवन्याची. हे व्हिडीओ पहान्याच्या अगोदरच मी ठरवलं होत कि - शक्य तितकं नि:पक्षपाती राहुन व्हिडीओ पहायचे.

वर्धमान ते महावीर - भाग ३

लेखक दशानन यांनी मंगळवार, 30/09/2014 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
वृद्ध, काही न बोलता, आपली काठी टेकत, निघून, गेला. त्याने डोळे बंद केले व पुन्हा तपामध्ये लीन झाला. समोर खळखळ आवाज करत सरिता वाहत होती, त्याच्या काटावर असलेल्या एका वडाच्या झाडाखाली तप करत असलेला एक साधू उचानक उभा राहिला व याच्याकडे तेथूनच एकटक पहात राहिला, आपल्या शेंडीशी चाळा करत तो म्हणाला “ कोण आहे तरुण? उद्या भेट घ्यावी म्हणतो.” तो आपल्या तपामध्ये मग्न होता, सर्व जगाचे अस्तित्व विसरून. कुठेतरी दोन डोळे त्याच्यावर रोखलेले आहेत, याची त्याला गंधवार्ता देखील नव्हती.

......आणि आमची पितरं जेवली.

लेखक भिंगरी यांनी शुक्रवार, 19/09/2014 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
. पितृपक्षात पितरांना जेवायला घालतात. एक पिढी गेली कि पुढच्या पिढीचा नंबर...... माझे सासूसासरे असताना आमच्याकडे द्वादशीला पितरं असत. ते दोघेही गेल्यानंतर (सासरे चतुर्दशीला व सासूबाई पितृपक्षात नवमीला गेल्या.)श्राध्द कोणत्या दिवशी घालावे हा प्रश्न पडला. कारण प्रत्येकवेळी वेगवेगळे करणे सगळ्यांच्या दृष्टीने सोपे नव्हते.म्हणुन ब्राह्मणाने अष्टमीला दोघांचे एकत्र करायला सांगितले .त्याप्रमाणे १९९८ च्या पितृपक्षात अष्टमीला केले. आम्ही वेगळे राहत असलो तरी सासू-सासरे आमच्याकडे राहत असल्याने सगळी कार्ये आमच्याकडेच होतात.त्याप्रमाणे हेही कार्य झाले.

ह्ये वागनं बरं नव्हं

लेखक निराकार गाढव यांनी गुरुवार, 18/09/2014 01:33 या दिवशी प्रकाशित केले.
रतीबावर रतीब जिलुबिचा रतीब, कश्श्ये टंकती लई चरबरीत | आवं गुर्र्जेन्ला, किती वो तरास द्येता, ह्ये वागनं बरं नव्हं ||   गुर्र्जींनि मैफल गाजिवलि, किती ह्यी ब्येनं लोळिवली पिळ घालूनी दावतो मिश्श्या, घडीघडी त्या मूष्षकलीला आरं साळसूद्दा, कुठून उपाटतो अस्सा, ह्ये वागनं बरं नव्हं ||   गावच्या धणा लय शानाच हाय, याड्यांचा जनू की डाकतर हाय, गोंयची इणि नाय आणुभवी, बणून रायली मोटी कवि आरं लांबटांग्या, हाबंग लिवतोस डोंगा, ह्ये वागनं बरं नव्हं ||   समाधीयोग शिक्कीविला, डोस्क्यात तुमच्या नाय रावला अर्धाच इच्चार करतुया, नावाला प्यार दावतुया आरं वटवाघळा, पकडून ठिवतोस गळा, ह्ये वाग

नास्तिक आणि विकृती

लेखक arunjoshi123 यांनी मंगळवार, 09/09/2014 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
संकल्पना: नास्तिक म्हणजे कोण? तर मूलतः ईश्वर न मानणारे. म्हणजे हे जग निर्मिणारी, चालवणारी कोणी शक्ती नाही नि तिला अभिप्रेत असे कोणते संकेत जगात नाहीत असे मानणारे लोक. हे लोक बाकी काही मानोत न मानोत, इतके तत्त्वज्ञान तरी जरूर मानतात. आता अस्तिक म्हणजे कोण? तर देव म्हणून कोण्या शक्तीने जग निर्माण केले, ती ते चालवत आहे, ते कसे चालावे याचे तिला अभिप्रेत असे संकेत आहेत असे मानणारे लोक. हा देव नक्की काय आहे, कसा आहे आणि हे संकेत कोणते आहेत याबद्दल अस्तिकांत प्रचंड घोळ आहेत, भांडणे देखिल आहेत.

अनंतचतुर्दशी

लेखक प्रसाद गोडबोले यांनी सोमवार, 08/09/2014 19:11 या दिवशी प्रकाशित केले.

"इट्स डन "

****************************************************************************** साधारण १४ -१५ वर्षांपुर्वीची गोष्ट . अनंतचतुर्दशीचा दिवस ! महादरे तळ्याच्या काठावर विसर्जनासाठी तुडुंब गर्दी ओसंडली होती. तळ्याकाठच्या घाटावर लोक गणेशमुर्तींची आरती करत होते. पायर्‍यांवर उदबत्त्यांचा , निर्माल्याचा , चिरमुरे बत्ताशे फुटाणे वगैरे नैवेद्याच्या गोष्टींचा खच जमु लागला होता . छोट्या मोठ्या मंडळांच्या ढोलताशांच्या आवाजात सगळा परिसर दुमदुमुन निघत होता. तळ्याकडेच्या गणेशमंदीराच्या कळसावर सुरेख रोषणाई करण्यात आलेली होती.

पेरू : भाग ११ : लोकजीवन

लेखक समर्पक यांनी सोमवार, 08/09/2014 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
या भागात पेरूच्या समाजाचे जवळून दर्शन. कुठल्याही प्रदेशात नुसतं 'बघायला' न जाता अनुभवायला जायचं असेल तर स्वत:च्या 'फॉरेनर टॅग' चा उपरेपणाचा रंग उतरवून उत्सुक, जिज्ञासू रंगाचा उपयोग करून घेता आला पाहिजे. आजुबाजूच्या लोकांशी शक्य तितका संवाद साधत आपला अनुभव अधिकाधिक गडद व सखोल करता आला तर अभ्यास व आनंद दोन्ही वृद्धिंगत होतात. प्रत्येक समाजाची एक वैशिष्ट्यपूर्ण वीण असते, पोत असतो, त्याविषयी जाणण्याचा, ज्या ज्या लोकांना भेटण्याचा योग आला त्यातून या समाजाविषयी जाणण्याचा केलेला हा प्रयत्न, व बरोबरच काही साधी चित्रे.

सुतक

लेखक स्वतन्त्र यांनी शुक्रवार, 29/08/2014 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
गणपती विद्येची देवता.विघ्न दूर करणारा.त्याचा आज पासून १० दिवस उत्साहात सर्वत्र साजरा होणारा उत्सव. आमच्या घरात दिवाळी इतक्या उत्साहाने नाही होत जितका दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतो. गणपती आज बसणार तोच आमची ऑस्ट्रेलिया ला असलेल्या चुलत चुलत आज्जी वारल्या . चुलत आज्जी म्हणजे आजोबांची चुलत भावजय. त्याच दहा दिवस सुटक पाळायच असा आदेश घरातल्या मोठ्यांकडून आले. सुटक पाळायच म्हणजे गणपती मूर्ती च्या जवळ जायचा नाही . गणपती दुसर्याकडून बसवून घ्यायचाय़. य़ा निमित्तानं बर्याच गुरुजी लोकांची मते घेतली.

वर्धमान ते महावीर - भाग 2

लेखक दशानन यांनी गुरुवार, 28/08/2014 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
तो काही न बोलता डोळे बंद करून पुन्हा ध्यानमग्न झाला. वृद्ध उठला, बाजूला असलेली आपली फांदीचा आधार घेत. नंतर फक्त सुक्या पाचोळ्याचा आवाज येत येत.. नाहीसा झाला आणि पुन्हा एकदा जंगलात निरव शांतता पसरली होती, ह्याच्या चेहऱ्यावर आता आधीपेक्षा जास्त नसले तरी, थोडे अधिक तेज आले होते.

सप्ताहिक सकाळ-२ लेख!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 26/08/2014 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
साप्ताहिक सकाळमधे मध्यंतरीच १ लेख प्रकाशित झाला होता.तो मि इथे शेअर केलेला आहे. आता त्याच्यापुढील प्रवास.. गेल्या दोन अंकात अजून २ लेख आलेत. हे दोन्ही लेख तसे गणेशोत्सवाशी संबंधीत आहेत. माझे मित्र आणि सा.सकाळचे उपसंपादक :- अभिजीत सोनावणे यानी मला श्रावणाच्या पहिल्या अठवड्यात सदर दोन्ही विषयावर लेख हवेत,म्हणून सांगितले होते.