राम राम गावकरीहों!
काय? कसं काय चाललंय? बैजवार हाय न्हवं? :)
आता तुम्ही म्हणाल, हा धम्या अस एकदम हाळ्या देत का आलाय बा!
तर त्याचं असंय मंडळी, पुढचा आईतवार म्हणजे २७ फेब्रुवारी; म्हणजे आपल्या लाडक्या कुसुमाग्रजांचा जन्मदिन. हाच दिवस 'जागतिक मराठी दिन' म्हणून साजरा केला जातो. तुम्ही-आम्ही मराठीच, आपलं मौजे मिपागाव पक्कं मराठमोळं! म्हणजे जगतिक मराठी दिनाचा सण आपल्या मिपावर साजरा होणारच. :)
आपण मिसळपाव.कॉमवर २७ फेब्रु.२८ फेब्रु.,आणि १ मार्च असे तीन दिवस मराठी भाषा दिन सोहळा साजरा करणार आहोत.
ह्यामध्ये आपण मराठीसंदर्भात निरनिराळे लेख, कविता लिहूया.