Skip to main content

भाषा

'ओपनहायमर' पुस्तक प्रकाशन

लेखक चिंतातुर जंतू यांनी मंगळवार, 30/08/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आण्विक शस्त्रास्त्रांविषयीच्या मतांमुळे अमेरिकन सरकारच्या रोषाचा धनी ठरलेला सुप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ ओपनहायमर याच्या जीवनावर आधारित चरित्रात्मक पुस्तकाचं आज संध्याकाळी पुण्यात प्रकाशन होणार आहे. लेखिका: माणिक कोतवाल (यांनी पूर्वी गॅलिलिओवरही चरित्रात्मक पुस्तक लिहिलेलं आहे.) प्रकाशकः राजहंस प्रकाशन, पुणे स्थळः एस. एम. जोशी सभागृह, गांजवे चौक वेळः सं. ५:३० वा. अध्यक्षः अच्युत गोडबोले उपस्थिती: डॉ. शंकरराव गोवारीकर कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. ओपनहायमरविषयी अधिक माहिती इथे मिळेल.

आमची बी एक

लेखक मुक्तसुनीत यांनी गुरुवार, 18/08/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा : ही भयभीषण कविता कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर विसर षंढ-गंध आता , जाळुनीया राख कर वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर.. कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे चिंधड्या तव "कव्वितेच्या" फ़ाडती शेंबडी मुले ना कुणी तुज तारीफेला , तू अपेक्षा लाख कर!! कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर कोण झोपे, काय झाले, ना इथे पडले कुणा "भीक नाही , काव्य आवर" बाकी कुणी काही म्हणा "जळ्ळीं मेली लक्षणे ती, हे रसीका तूच मर!"

जलेबी बाई...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शुक्रवार, 12/08/2011 या दिवशी प्रकाशित केले.
जलेबीबाई... आम्ही स्वप्नातून दचकून उठलो आणि क्षणात बरळलो— “आम्ही जिलब्या पाडतो, तुम्ही भजी सोडा...” तसं जिलब्या पाडणं फार काही मोठं काम नाहीये बरं का. अगदी सोप्पंय... बेसन हटायचं, एकजीव करायचं, कढईतलं तूप उकळू लागलं की कॉटनच्या जाडसर फडक्यात पिठाचा गोळा भरून घेऊन मधोमध किंचित छिद्र पाडून मोठ्या नजाकतीने वेटोळे काढले की झालं. त्या जिलेब्यांना डालडा चांगला आतपर्यंत पिऊ द्यायचा. झाऱ्या कडेला ठेऊन त्या लालबुंद होईतोवर तळायच्या. मग व्यवस्थित निथळून घेतल्या की एकतारी पाकात डुबू द्यायच्या. त्यांनी पाक यथोचित शोषला की झाली खाण्यायोग्य जिलेबी तय्यार! तर अशी ही जिलेब्यांची पाककृती.

ब्राऊ..६

लेखक गवि यांनी मंगळवार, 02/08/2011 या दिवशी प्रकाशित केले.
3

लोकशाहि

लेखक अजातशत्रु यांनी शनिवार, 30/07/2011 या दिवशी प्रकाशित केले.
!! लोकशाहित या सगळेच भाडखाऊ !! लोकशाहि मुळेच मिळते-लिहिणे,बोलणे,विरोध,मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य, त्याचा मनसोक्त उपभोग घेणारे भाडखाऊ लोकशाहि म्हणजे काय?
काव्यरस

अन्याय झाल्याची भावना आणि न्यूनगंड

लेखक सुशान्त यांनी रविवार, 24/07/2011 या दिवशी प्रकाशित केले.
'गुगलवर मराठी यावी म्हणून मागणी' ह्या निनाद ह्यांनी काढलेल्या धाग्यावरील चर्चेत न्यूनगंडाचा मुद्दा उपस्थित झालेला दिसला. गूगलसारख्या व्यावसायिक कंपनीने मराठी भाषेसाठी एखादी सोय देणे किंवा न देणे ह्यामुळे मराठीवर अन्याय होतो ही समजूत न्यूनगंडापोटी आलेली असावी असे मत तिथे व्यक्त झाले आहे.

ब्राऊ...४

लेखक गवि यांनी गुरुवार, 21/07/2011 या दिवशी प्रकाशित केले.
3

ब्राऊ...३

लेखक गवि यांनी बुधवार, 20/07/2011 या दिवशी प्रकाशित केले.
3

सारं लुगड्यात गमावलं...!

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 03/07/2011 या दिवशी प्रकाशित केले.
सारं लुगड्यात गमावलं... हे एक भन्नाट गाणं पूर्वी येऊन गेलं. ‘काय राव तुम्ही?’ या प्रश्नानंतर येणारी गंमत या गाण्यात आहे. संबंधित इसमाने धोतर विकण्याचा व्यवसाय (नमनालाच ‘धंदा’ हा शब्द मी वापरणार नाही!) सुरु केलेला असतो. त्यात त्याला खूप यश लाभलेले असते. मात्र एक देखण्या स्त्रीच्या म्हणण्यावरून तो लुगडी विकू लागतो आणि सर्व काही गमावून बसतो असा साधा, सरळ, सोपा आशय या शब्दांत आहे.