मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भाषा

अभिषेक, आमीर खान आणि ऐश्‍वर्या मराठी चित्रपटामध्ये !

मोगली ·
लेखनविषय:
आज सकाळी सकाळी 'सकाळ ' मधिल एका बातमी णे लक्ष वेधले ! अभिषेक बच्चन, ऐश्‍वर्या राय आणि आमीर खान एका मराठी चित्रपटामध्ये काम करणार आहेत. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नसले तरी साधारण दिवाळीच्या आसपास हा चित्रपट सेटवर जाणार आहे. त्याची निर्मिती ए. पी. कॉर्प या बॅनरखाली केली जाणार आहे. खरे तर बच्चन कुटुंबीय आणि त्यांचे मराठी प्रेम तसे काही नवीन राहिलेले नाही. अमिताभ बच्चन-जया बच्चन यांनी "अक्का' या चित्रपटामध्ये पाहुणे कलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर ए. बी. कॉर्प या बॅनरखाली अमिताभ बच्चन यांनी "विहीर' या चित्रपटाची निर्मिती केली होती.

कोचिंग क्लासेस

प्रीत-मोहर ·
3

आयज जागतिक मराठी दिन .. त्यानिमतान कांय कोकणी कवितांचो अणकार

प्रीत-मोहर ·
Taxonomy upgrade extras
पैसा ताई च्या लेखात लिहिल्याप्रमाणे कोकणी- मराठी ह्या बहिणी आहेत हे तर कळलेच असेल . तर आता आपण काही कोकणी रचना पाहुया कोकणी कविता- विश्वात , मराठी वाचकांच श्रद्धास्थान , अभिजात लेखक व कवी श्री. बा भ. बोरकर उर्फ आमचे बाकीबाब ह्यांना एक आदरणीय स्थान आहे .

संपादनेथॉन: मराठी दिनानिमित्त विकिपीडियाचा उपक्रम

मस्त कलंदर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी, औचित्य आहे दरवर्षी २७ फेब्रुवारीला जगभर पाळल्या जाणार्‍या मराठी भाषा दिवसाचं. त्या निमित्त येत्या २७ फेब्रुवारीस मराठी विकिपीडियावर संपादनांची मॅरेथॉन - अर्थात संपादनेथॉन - आयोजित केली आहे. या दिवशी अधिकाधिक संपादने करून आपला सक्रीय सहभाग नोंदवण्यासाठी विकिपीडियाकडून सर्व मराठी भाषिकांना यात सामील होण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे. विकिपीडियाच्या १०व्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणं सर्व भारतीय भाषांमध्ये मराठीतील लेखांचा तिसरा क्रमांक आहे.

जागतीक मराठी भाषा दिन -२७ फेब्रु. २०११

धमाल मुलगा ·
लेखनप्रकार
राम राम गावकरीहों! काय? कसं काय चाललंय? बैजवार हाय न्हवं? :) आता तुम्ही म्हणाल, हा धम्या अस एकदम हाळ्या देत का आलाय बा! तर त्याचं असंय मंडळी, पुढचा आईतवार म्हणजे २७ फेब्रुवारी; म्हणजे आपल्या लाडक्या कुसुमाग्रजांचा जन्मदिन. हाच दिवस 'जागतिक मराठी दिन' म्हणून साजरा केला जातो. तुम्ही-आम्ही मराठीच, आपलं मौजे मिपागाव पक्कं मराठमोळं! म्हणजे जगतिक मराठी दिनाचा सण आपल्या मिपावर साजरा होणारच. :) आपण मिसळपाव.कॉमवर २७ फेब्रु.२८ फेब्रु.,आणि १ मार्च असे तीन दिवस मराठी भाषा दिन सोहळा साजरा करणार आहोत. ह्यामध्ये आपण मराठीसंदर्भात निरनिराळे लेख, कविता लिहूया.