प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

लेखनविषय:
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

एक "टवाळ" संध्याकाळ

लेखनविषय:
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

लेखनविषय:
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन. (काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच) तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र. आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो. १. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा.

माहिती हवी आहे.

लेखनविषय:
लेखनप्रकार
गेल्या २ -२.५ वर्षापासून मी हाडांशी संबंधित एका व्याधीने त्रस्त आहे. ऑर्थोपेडिक (ऐलोपथी म्हणा हवे तर ) डॉक्टरांच्या कडे यावर शस्त्रक्रिया करून त्याजागी कृत्रिम भाग बसवण्याशिवाय पर्याय नसल्याचे ते सांगतात. त्यामुळे तुम्ही उद्याच रुग्णालयात भरती व्हा. आणि शस्त्रक्रिया करून टाका जर हे नाही केले तर थोड्याच दिवसात ते हाड co-laps होऊन तुम्हाला परत इथेच यावे लागेल. त्यापेक्षा आत्ताच शस्त्रक्रिया करा असे सांगतात. परंतु मी शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय घेतला कारण एक तर माझे वय अत्यंत कमी आहे आणि शत्रक्रिया केल्यानंतर माझ्या बर्याच दैनंदिन कामावर त्याचा परिणाम होणार आहे.

उचलता वजन हे - Lifting Technique

लेखनविषय:
आपल्या रोजच्या धावपळीचा कळत नकळत आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. सद्ध्या एक वारंवार ऐकू येणारी तक्रार म्हणजे 'मला बॅकचा प्रॉब्लेम आहे रे' 'लोवर बॅकचा प्रॉब्लेम आहे'. आपल्या संपूर्ण शरीराला नियंत्रित करणारा हा अतिशय महत्वाचा अवयव अनेकदा आपल्याकडून दुर्लक्षित राहतो, आणि त्याचे परिणाम या अशा दुखण्यात दिसतात. पाठीवर किंवा कण्याला अपाय करणा-या अनेक गोष्टींपैकी एक नेहमी होणारी गोष्ट इथे नमूद करू इच्छितो. आपण रोजच्या व्यवहारात अनेकदा कमी अधिक वजन उचलतो. उचलून वर ठेवतो, वरून काढून खाली ठेवतो, सरकवतो, ढकलतो इत्यादी. या सगळ्या हालचाली करताना आपल्या पाठीची कमालीची इन्व्हॉल्व्हमेंट असते.

वजन कमी करणारा आहार

वजन कमी करणारा आहार १) सकाळी १ कप चहा/ काफी/ दुध (साय काधलेले )साखर ( शुगर फ्री) कमी घालुन घेणे. २) सकाळचा नाश्ताः ९ ते ११ वाजता १ गव्हाचा फुलका, १ चहाचा चमचा, साजुक तुप, २ चहाचे चमचे कोण्तीही चटणी. ३) दुपारचे जेवण ; जेवणपुर्वी १ ते २ ग्लास वरणाचे नुसते पाणी/ कोमट पाणी प्यावे,३ गव्हाचे फुलके, १ नैवेद्याची वाटी कोणतीही भाजी (बटाटा सोडुन),१ फुलपात्र वरणाच्यावरील पाणी, डाळ अजीबात नको,काकडी ,गाजर,कोवळा मुळा, टोमटो, बीट, कांधाची पात,सॅलेड पान , कोबीची कोंशिबीर वाटेल तेवढे खाल्ले तरी चालते भात बंद करावा. ४) संध्याकाळ नाश्ताः४ वाजता १ कप चहा /कोफी /दुध (साय काडुन) कमी साखर (शुगर फ्री

Don't lose out; Work out - पुस्तकाची ओळख

लेखनप्रकार
नमस्कार, नुकतंच एक पुस्तक वाचनात आलं. रुजुता दिवेकर यांचं - डोन्ट लूज आउट; वर्क आउट प्रत्येक पानागणिक एखादी ऐकलेली, बोललेली, वाटलेली, गोष्ट समोर येत गेली. 'अरे हेच.... अगदी हेच वाटलेलं...' किंवा 'ऐला मीही असंच म्हणतो...' असं मनाशी वाटल्याशिवाय पुस्तकातला एकही धडा संपला नाही. त्यामुळे हे पुस्तक वाचताना विशेष मजा आली. शीर्षकावरूनच पुस्तकाचा विषय कळतो. वर्काउट, किंवा व्यायामावर भाष्य करणारं हे पुस्तक आहे. व्यायाम महत्वाचा आहे कारण असंख्य जण तो महत्वाचा समजत नाहीत. लेखिकेची या विषयावरील पकड निर्विवाद असून त्याचा प्रत्यय पुस्तकातील मांडणीतून येत रहातो.

मदतकेंद्र: सल्ला , मार्गदर्शन, साहाय्य, समुपदेशन

लेखनप्रकार
माझ्या लग्नाला १० वर्षे झालीत मला दोन मुले आहेत माझे मि खूप दारू पितात घरात सारखे तणाव राहतात मि ग्राम प कामाला आहे मि शाळे वर कामाला जाते पार्लर टाकले पण चालत नाही ते घरात आम्हाला पैसे देत नाहीत आई वडील काही म्हणत नाहीत माझे सासरे देखील दारू पितात गांजा पितात पता खेड तात तसेच मासाहार करतात पै कमी पडले कि बहिण आई त्या दोघांना देते .कृपया मला मदत करा त्यावर उपाय सागा सेवा काय करू कि वाद होणार नाहीत माझ्या जवळ पैसे येतील . -सौ स. श. रा.

ई बे वरिल ऑनलाईन खरेदी

लेखनविषय:
लेखनप्रकार
ई बे वर नुकताच मी एक मोबाइल फोन खरेदी केला. फोन ची कंडीशन व पर्फोर्मन्स हे दोन्ही पण योग्य वाटत आहे. हा फोन इम्पोर्टेड असल्यामुळे तो बराच स्वस्त मिळाला. (२६००० रुपये ओरिजनल किंमत असलेला फोन १२००० ला मिळाला ) फोन चेक केला असता तो unsealed होता. विक्रेत्याला याबाबत विचारले असता त्याने सांगितले कि हे फोन इम्पोर्टेड असल्यामुळे त्यांचे कस्टम कडून चेकिंग होते. तसेच या फोन मधले अक्सेसरीज देखील थोडी वेगळी आहेत. याबद्दल त्याने स्पष्टीकरण दिले कि हे सर्व अक्सेसरीज भारतासाठी नसून ते इतर देशांसाठी केले जातात त्यामुळे ती वेगळी आहेत. हे सर्व त्याने त्याच्या जाहिरातीमध्येही नमूद केले होते.

गाडी मागणाऱ्यांना कसे टाळावे?

लेखनविषय:
लेखनप्रकार
मी एक सेकंडह्यांड स्पार्क.गाडी घेतली आहे. हळू हळू शिकणे चालू आहे.परंतु सध्या एक समस्या भेडसावत आहे बरेच परिचित, नातेवाईक हे गाडी मागत असतात. त्यातील काहींना आपण विश्वासाने देवू शकतो परंतु काहींना मात्र टाळायचे असते. त्यांना काहीना काही कारणे द्यावे लागतात नाहीतर शिष्टपणाचा शिक्का मारायला तयार .माझा स्वभाव हा अतिभिडस्त असल्याने सर्वांना टाळता येत नाही .पहिली गोष्ट इतरांची गाडी मागणे हे काही मला योग्य वाटत नाही. परंतु काही जन मात्र बिनदिक्कत गाडी मागतात त्यांना टाळण्यासाठी काय उपाय असतील तर सुचवावे एखाद दुसर्याचा प्रयोग करून बघावे म्हणतो .
Subscribe to सल्ला