Skip to main content

सल्ला

सल्ला – एक अगत्याचे घेणेदेणे

लेखक सस्नेह यांनी शनिवार, 22/02/2014 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
मला याची जाणीव नव्हती, पण माझ्या आसपासचा आसमंत अतिशय कनवाळू, विद्वत्तापूर्ण, अभ्यासपूर्ण अन सदैव पर-मदतीस तत्पर अशा सज्जन सल्लागारांनी प्रथमपासून परिपूर्ण असत आला आहे. ‘पर-मदत’ अशासाठी, की यांना स्वत:ला अनादी अनंत काळापासून कोणत्याच मदतीची कधी गरज पडली नसावी, अशी शंका येण्याइतपत स्वयंसिद्ध स्वयंपूर्ण असे हे महाभाग होत. पुन्हा, हे विद्वान लोक सर्वव्यापी होत. याचा पुरावा म्हणजे वर्तमानपत्रे अन मासिके यातून झालेला ‘ताईचा सल्ला ’, ‘माईचा सल्ला’, ‘काकांचा सल्ला’, इत्यादिंचा झालेला बोलबाला ! तसे तर आयुष्यात असंख्य प्रसंगी या सल्लावंतांनी मला तारून नेले आहे.

फायदा घ्या बजेटचा

लेखक आयुर्हित यांनी मंगळवार, 18/02/2014 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी २०१४-१५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला असून फ्रीज, टीव्ही, देशी बनावटीचे मोबाईल, छोट्या कार स्वस्त होणार आहेत. या अर्थसंकल्पात चिदंबरम यांनी अबकारी दर १२ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणण्याची घोषणा केली तसेच छोट्या वाहनांसाठीचा अबकारी कर १२ टक्क्यांवरून ८ टक्क्यांवर आणणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सण म्हटलं की निसर्गाला त्रास द्यायलाच हवा का?

लेखक वडापाव यांनी मंगळवार, 14/01/2014 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
याविषयावर खूप आधीपासून लिहायची इच्छा होती, पण आज मकर संक्रांतीचं निमित्त मिळालं. आपण वर्षभरात एवढे छोटे-मोठे सण साजरे करतो, पण त्यातल्या देशाभरात मोठ्या प्रमाणावर साज-या होणा-या जवळ जवळ प्रत्येक सणामध्ये आपण कोणत्या न कोणत्या स्वरूपात निसर्गाचं नुकसान करत असतो. लेखनामागचा आशय शीर्षकावरून स्पष्ट होत नसेल तर - 'आक्षेप सण साजरे करण्याला नसून साजरे करण्याच्या पद्धतीला आहे.' असा आहे. सुरुवात मकर संक्रातीपासून करूया. हल्ली चायनीज नायलॉनचा मांजा मिळतो जो धारदार आणि सहजासहजी न तुटणारा असतो. आकाशात खेळल्या जाणा-या चढाओढीमध्ये आपला पतंग काटला जाऊ नये म्हणून हल्ली बरेच जण हा नायलॉनचा मांजा वापरतात.

नरु (नरेन्द्र मोदी) वील बी द विनर: बेजान दारूवाला

लेखक आयुर्हित यांनी सोमवार, 06/01/2014 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, बेजान दारूवाला यांचे प्रेडीक्षण: १)नरु (नरेन्द्र मोदी) वील बी द विनर २)INR(रुपी) विल बी इन बिटवीन ५९ तो ५५ पर डॉलर मिपाकर ज्योतिषतज्ञ व FINANCIAL ANALYST हो, आपले काय मत आहे? कळावे, लोभ असावा आपला लाडका: आयुर्हीत

रेजोल्यूशन

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 27/12/2013 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
२०१३ आता संपेल. आपण हॅप्पी न्यू इयर म्हणत सगळ्यांना शुभेच्छा देऊ, पार्ट्या होतील, दारूचे पाट वाहतील, टीव्ही वर अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम प्रसारित होतील, त्याच धुंदीत जमल्यास गेल्या वर्षीचा जमाखर्च मांडत आपण पुढच्या वर्षाला आलिंगन देऊ. व्हॉट्सॅप्प, फ़ेसबुक, इत्यादी माध्यमातून जगाला विश केलं जाईल, विविध ‘रेजोल्यूशन्स’ केली जातील, जगाशी शेअर केली जातील.

आणि रजनीकांत रडला - धूम ३

लेखक मृत्युन्जय यांनी रविवार, 22/12/2013 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
१८ मे १९७४ भारतीय इतिहासात एक अतिशय क्रांतिकारक घटना घडली. पोखरण मध्ये पहिली अण्वस्त्र चाचणी घेण्यात आली आणि भाभा अणुसंशोधन केंद्राच्या प्रमुखांनी डॉ. होमी सेठनांनी पंतप्रधानांच्या सचिवांना दूरध्वनीवरुन ही रोमांचकारक बातमी देताना सांकेतिक भाषेत सांगितले "आ़णि बुद्ध हसला. काही लोकांच्या मते "आणि बुद्ध हसला" वगैरे असे काही सांगितले गेले नाही. ही नंतर बुद्धजयंतीचे निमित्त साधुन काही लोकांच्या डोक्यातुन निघालेली सुपीक कल्पना असेल. डिसेंबर २०१३ मध्ये एक अशीच अजुन एक क्रांतिकारक घटना घडली. धूम ३ प्रदर्शित झाला.

माझे सल्ले

लेखक सदासुखि यांनी शुक्रवार, 13/12/2013 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
काहि दिवसांपासुन मला (उगाचच) असे वाटत आहे कि मी सल्ले (प्रवचन?) छान देऊ शकते.उदा. ऑफीस चा ताण कमी कसा करावा, बॉसचा त्रास कसा टाळावा,मुलांबद्द्ल जास्त काळजी वाटल्यास काय करावे,आई रागवल्यास काय करावे? इ. पण कसे आहे आपण दिलेला सल्ला लिखित रुपात राहिला तर्?असे मला वाटले म्हणुन इथे लिहित आहे.(खरं तर तसे मी सल्ले(मुलाच्या शब्दात प्रवचन ) खूप देत असते नवरोजींना.पण ते तुळ राशीचे असल्याने प्रतिक्रिया देत नाहीत.कदाचित त्यांना बॉस खूप त्रास देतो म्हणून माझे सल्ले काम करत नसतील.असो म्हणूनच इथे प्रतिकिया काय मिळतात ते पहायचे आहे!) सल्ला १- काहि बॉस उगाचच रागवत असतात(आणि रोजच) .

लिवैनरिलेशनितेचे आईस पत्र

लेखक खटासि खट यांनी मंगळवार, 03/12/2013 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय आई, प्रत्येक मुलिप्रमाणे मी ही लिवइनरिलेशनशिप (लिइरि) बद्द्ल कोर्टाचा निर्नय आल्यापासुण खुप उत्सुक होते. माझ्या राजकुमारांची स्वप्ने रंगवत होते. पण आज मला जाणिव होते आहे की लिइरि म्ह्णजे फक्त गुलाबी स्वप्ने. लिइरि म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत राहाणे . तर लग्न म्ह्णजे जबाबदार्या, त्याग, कटकटी आणि तडजोडी यांवर अवलंबुन असलेली एक संस्था आहे. मी मला हव्या तितका वेळ झोपु शकते. मला सर्वांच्या आधी उठायची काही एक गरज नाही इन मिन दोघंच घरात. त्याला काही पाहीजे असेल तर तो करून खातो. नाहीतर आम्ही दोघे मिळून हाटेलात जातो.

पॅरलल पार्किंग

लेखक वेल्लाभट यांनी शनिवार, 30/11/2013 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
गाडी चालवणा-या समस्त लोकांपैकी फार कमी लोकांना पॅरलल पार्किंग व्यवस्थित जमतं. माझ्या सोसायटीतल्या काही महाभागांना तर पार्किंग नावाचं काही असतं हेच माहित नाही; ते येतात आणि जिथे भिंत समोर येईल तिथे गाडी थांबवून उतरून घरी जातात. असो. पॅरलल पार्किंग हे खूप महत्वाचं स्किल आहे स्किल, माझ्या मते. आणि ते यायला हवं. ते वाटतं तितकं कठीण नव्हे. जराशी भूमिती, जरासं गणित, आणि जरासा अंदाज आला, की झालं. मी, मला कळलेलं पॅरलल पार्किंग इथे तुम्हाला सांगावं म्हणतो..

मदत....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 29/11/2013 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
मला माझ्या काही पुस्तकांचे ई-बुक विक्रीस उपलब्द्ध करायचे आहे. मी काही कंपन्यांची सॉफ्टवेअर बघितली व त्यांच्या साईटही पाहिल्या. काहीजण म्हणतात डी एम आर वापरु नका तर काही म्हणतात त्याला पर्याय नाही. मला पायरसी होणार नाही असे काहीतरी पाहिजे. अर्थात मला कल्पना आहे ते १०० % होउ शकत नाही पण ८० % झाले तरी खूप आहे..... आपल्या मिपावर अनेक सॉफ्टवेअर तज्ञ आहेत त्यांनी जर थोडा वेळ काढून अभ्यास करुन काय वापरणे ठीक राहील याचा सल्ला दिला तर मला चांगली मदत होईल..... ती विनंती करण्यासाठी हा धागा...अर्थातच इतरांनाही त्याचा उपयोग होईल... जयंत कुलकर्णी