माझ्या लग्नाला १० वर्षे झालीत मला दोन मुले आहेत माझे मि खूप दारू पितात घरात सारखे तणाव राहतात मि ग्राम प कामाला आहे मि शाळे वर कामाला जाते पार्लर टाकले पण चालत नाही ते घरात आम्हाला पैसे देत नाहीत आई वडील काही म्हणत नाहीत माझे सासरे देखील दारू पितात गांजा पितात पता खेड तात तसेच मासाहार करतात पै कमी पडले कि बहिण आई त्या दोघांना देते .कृपया मला मदत करा त्यावर उपाय सागा सेवा काय करू कि वाद होणार नाहीत माझ्या जवळ पैसे येतील . -सौ स. श. रा. ( मराठी विकिपीडियातील संदेशात पूर्ण नाव होते पण येथे ते संक्षीप्त केले आहे.)मराठी विकिपीडियावर संपादन करण्याच्या अडचणी पुरतेच एक मदतकेंद्र नावाचे पान आहे ज्यावर व्यक्तीगत अडी अडचणींच्या संदर्भाने कोणतीच मदत सल्ला मार्गदर्शन उपलब्ध नसते. सर्वसामान्य वाचकाला हे लक्षात न येता ते बर्याचदा व्यक्तीगत अडीअडचणी मोठ्या प्रमाणावर तिथे मांडण्याचा प्रयत्न करत असतात पण त्या मराठी विकिपीडियाच्या परिघाबाहेरच्या विषयांबद्दल संपादन गाळणी लावून थांबवणे अथवा नित्याने वगळणे या पलिकडे काहीच करु शकत नाही. मराठी विकिपीडियाच्या मदतकेंद्रावर आलेला असाच एक संदेश वर नोंदवला आहे. बर्याचदा अत्यंत निराश परिस्थितीतील संदेशांचाही त्यात समावेश असतो पण मराठी विकिपीडिया ऐवजी मिपासारखी मराठी संकेतस्थळे अधिक साहाय्यकारी असू शकतील असे वाटते. या धाग्याचा उद्देश मिपावर मदतकेंद्र नावाचा धागा असावा. ज्या मिपाकरांचे ब्लॉग्स आहेत त्यांनी जमल्यास या धाग्यास त्यांच्या ब्लॉगवरून दुवा द्यावा जेणे करुन हा धागा गूगलसर्चात बर्यापैकी हा धागा येऊ शकेल आणि मिपा अधिक प्रमाणात सामान्य जनतेशी जोडलाही जाईल आणि सर्वसामान्य जनतेस आपापसात चांगले मार्गदर्शनही देता घेता येऊ शकेल. एकदा हा धागा परस्पर चांगला चालू लागला की या धागा लेखातून मराठी विकिपीडियाचा उल्लेखाचा वरील परीच्छेद संपादकांनी काढून टाकावा हि विनंती.
वाचने
2778
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्वागतार्ह सूचना
५०-५०
In reply to स्वागतार्ह सूचना by बहुगुणी
वैयक्तिक समुपदेशनासाठी किंवा
In reply to ५०-५० by एस
अशा तक्रारी खऱ्या असतात असं