हॉप फ्रॉग २
लेखनप्रकार
- Read more about हॉप फ्रॉग २
- 16 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
एका बारीक पण धारदार आवाजाने शांतता भंग पावली.तो आवाज घर्षणाने तयार झाल्यासारखा वाटत होता.कुठल्या तरी टणक वस्तुंच्या घर्षणाने.
उदाहरणार्थ दातांच्या.
जणू कुणीतरी अमानवी त्वेषाने दातओठ खात होतं.
तो आवाज ऐकून राजाच्या मानेवरचे केस उभे राहीले. “ तू-तू तो आवाज का काढतोयस? " राजा हॉप फ्रॉग वर खेकसला.
बुटका आता बराच सावरल्यासारखा दिसत होता .
“ मी ? मी का बरं ? मी कसा..." तो राजाकडे स्थिरपणे पाहत म्हणाला.
“तो आवाज बाहेरुन आल्यासारखा वाटतं होता. " एका मंत्र्याने आपले निरीक्षण नोंदवले.