मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भाषांतर

हॉप फ्रॉग २

शा वि कु ·
लेखनप्रकार
एका बारीक पण धारदार आवाजाने शांतता भंग पावली.तो आवाज घर्षणाने तयार झाल्यासारखा वाटत होता.कुठल्या तरी टणक वस्तुंच्या घर्षणाने.      उदाहरणार्थ दातांच्या. जणू कुणीतरी अमानवी त्वेषाने दातओठ खात होतं. तो आवाज ऐकून राजाच्या मानेवरचे केस उभे राहीले. “ तू-तू तो आवाज का काढतोयस? " राजा हॉप फ्रॉग वर खेकसला.     बुटका आता बराच सावरल्यासारखा दिसत होता . “ मी ? मी का बरं ? मी कसा..." तो राजाकडे स्थिरपणे पाहत म्हणाला. “तो आवाज बाहेरुन आल्यासारखा वाटतं होता. " एका मंत्र्याने आपले निरीक्षण नोंदवले.

हॉप फ्रॉग १

शा वि कु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
राजाइतका विनोद आवडणारा माणूस सापडणे कठीण.राजा जणू जगतच विनोदासाठी होता. एखादा विनोद रंगवून सांगणे म्हणजे राजाच्या मर्जीत येण्याचा हमखास उपाय होता. म्हणूनचकी काय त्याचे सातही मंत्री गमत्ये म्हणून प्रसिद्ध होते.ते मंत्रीपण राजासारखेच गलेलठ्ठ होते.त्यांच्याकडे पाहणार्याला हमखास वाटायचेच की विनोदी असणे आणि लठ्ठ असणे यात नक्कीच परस्परसंबंध असणार !   राजा दरबाराच्या कामांचा क्वचितच स्वतःला त्रास करून घेई.राजाला गमत्या आणि विदूषकांच्या विविध प्रकारात खूप रस होता.अति शिष्ठाचार त्याला कंटाळा आणत आणि शाब्दिक विनोद त्याला लवकर समजत नसत .

मूठभर खजूर [उत्तरार्ध]

शिव कन्या ·
मूठभर खजूर [पूर्वार्ध] http://www.misalpav.com/node/33374 मूठभर खजूर [उत्तरार्ध] मी आजोबांना विचारले, “मसूदने त्याची जमीन का विकली?” “बायका!” हा शब्द आजोबांनी असा काही उच्चारला कि, बाई म्हणजे काहीतरी भयानक प्रकार आहे, असे वाटू लागले! “मसूदने अनेक निकाह लावले! प्रत्येकवेळी त्याने दोनतीन एक्कर जमीन मला विकून टाकली!” मी मनातल्या मनात चटकन हिशोब घातला. त्या हिशोबाने त्याने सुमारे नव्वदेक बायकांशी निकाह लावायला हवा होता. पण मला तर त्याच्या तीनच बेगमा दिसायच्या.

मूठभर खजूर [पूर्वार्ध]

शिव कन्या ·
मूठभर खजूर [पूर्वार्ध] (El Tayeb Salih यांच्या 'A Handful of Dates' या कथेचा स्वैर अनुवाद. ही कथा मूळ अरेबिक मध्ये लिहिली गेली, नंतर तिचे इंग्रजीत भाषांतर झाले.) नेमके वय नाही आठवत आता, पण खूप लहान होतो. आजोबांबरोबर बाहेर पडलो, कि गावातले लोक प्रेमाने माझे गालगुच्चे घ्यायचे, डोक्यावर हळूच टपली मारायचे.... आता हे असलं काही, ते माझ्या आजोबांबरोबर करायचे नाहीत! वडील कधीच नाही, पण आजोबा मात्र मला नेहमी त्यांच्या बरोबर बाहेर घेऊन जात. दररोज भल्या सकाळी मी कुराणपठनासाठी मशिदीत जाई. ती मशीद, ती शेते, ती नदी.....आमच्या जगण्याचे आधार! माझ्या वयाची इतर मुले मात्र मशिदीत जायला,कुराणपठन करायला कुरकुरत.

कुशीवर वळू नका, रात्र भुताची आहे!!!!!!!!!!!!!! (स्वैर अनुवाद)

अजिंक्य विश्वास ·
लेखनविषय:
हे मी खूप आधी अनुवाद केलेले आहेत. ते फेसबुकवर पोस्ट केले होते. आता इथे शेअर करत आहे. घाबरा किंवा हसा. .. पण एन्जॉय जरूर करा !!! कुशीवर वळू नका, रात्र भुताची आहे!!!!!!!!!!!!!! १. मी काचेवरच्या टकटकीमुळे जागा झालो. पहिल्यांदा मला वाटले, खिडकीचा आवाज येत आहे, पण मग कळले की आवाज माझ्या आरश्याच्या आतून येत आहे! २. शेवटचे मला आठवते, तेव्हा माझे घड्याळ रात्रीची १२:०७ वेळ दाखवत होते, त्या आधी तिची सडत चाललेली, नख्या वाढलेली बोटं माझी छाती कुरवाळत होती आणि दुसरा हात मला येणारी किंचाळी दाबून धरत होता. मी झटक्यात ताठ उठून बसलो, आणि माझ्या लक्षात आले की, हे फक्त एक स्वप्न होते.

पुणे कट्टा वृत्तांत- ४ ऑक्टोबर २०१५

कॅप्टन जॅक स्पॅरो ·
आमचे पेर्णास्त्रोतः भव्य आवाहन ~ दिव्य आवाहन ~ दो सोनार की इक लोहार की २४ सप्टेंबर २०१५ (ख्रिस्तपुर्व लिहायचा मोह आवरला) मिपावरचं एक भव्य (?) दिव्य (नमस्कार माझा तया दिव्यश्रीला) वॅक्टीमॅट्व श्री.स्त्री.दी.भव्यश्री ह्यांनी युरोपखंडे जर्मनदेशे नामक भुभागावरुन भारतामधल्या पुण्यभुमीमधे एक समस्तं मिपाकरांचा एक कट्टा व्हावा असा डाव्या पायातला बुट काढला.

जागे राहा, रात्र भुताची आहे.... रिलोडेड..... (स्वैर अनुवाद)

अजिंक्य विश्वास ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
लहान मुलांनी सांगितलेल्या विचित्र गोष्टी.... १. मी माझ्या मुलाला- झोप आता. तुझ्या बेडखाली काहीच नाहीये. माझा मुलगा- पण पप्पा , तुमच्या मागे ’तो’ उभा आहे ना! २. माझी ३ वर्षाची मुलगी घरात लाईटस्‌ गेले असताना अचानक म्हणाली,’ बाबा वर पाहा ना. आपल्या पंख्याला कोणीतरी माणूस लोंबकळून झोके घेतोय्‌.’ ३. मी माझ्या ४ वर्षाच्या मुलीला गोष्ट सांगत होतो, तेवढ्यात तिने माझ्या हातातील पुस्तक झटकन्‌ बंद केले आणी उघड्या दाराकडे बोट करत म्हणाली, तू निघून जा इथून लगेच. तू आधीच कितीतरी लोकांना मारले आहेस. हे माझे पप्पा आहेत. ४. माझा मुलगा स्वत:शीच हातवारे करत बोलत बसला होता.

पुणे कट्टा- ४ ऑक्टोबर २०१५,

कॅप्टन जॅक स्पॅरो ·
दिव्यश्रींच्या धाग्यावर जरा जास्तचं मारामारी झाली. असो. कट्टा फायनालाईझ झालेला आहे. कट्टा खालीलप्रमाणे होईल. तारिख पे तारिखः ४ ऑक्टोबर २०१५ वेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता स्थळः पुण्यनगरीमधली पाताळेश्वर ही पावन जागा कार्यक्रम: भेटणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे आणि टवाळक्या करणे फायनान्स डिटेल्सः टी.टी.एम.एम. कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. दुर्वांकुरला जायचं का? (संपादकांना विनंती-४ तारखेनंतर धाग्यास हेवनवासी करावे. धाग्याकर्त्याला नको) धन्यवाद.

द स्केअरक्रो - भाग ३०

बोका-ए-आझम ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
द स्केअरक्रो भाग २९ द स्केअरक्रो भाग ३० (अंतिम भाग) (मूळ लेखक मायकेल कॉनेली) कार्व्हर तिथे असेल असा मला संशयसुद्धा आला नव्हता पण आता तो माझ्या मागे उभा होता. “तू रिपोर्टर आहेस त्यावरूनच मला समजायला हवं होतं. एक नंबरचे सिनिकल असता तुम्ही लोक. मी आत्महत्या करीन यावर तुझा विश्वास न बसणं साहजिक आहे.” बोलता बोलता त्याने माझ्या हातातली गन काढून घेतली आणि माझ्या शर्टाची कॉलर धरून माझा चेहरा भिंतीवर दाबला. तो माझी झडती घेत असल्याचं माझ्या लक्षात आलं. “ही गन एजंट वॉलिंगने दिली वाटतं तुला?

द स्केअरक्रो - भाग २९

बोका-ए-आझम ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
द स्केअरक्रो भाग २८ द स्केअरक्रो भाग २९ (मूळ लेखक मायकेल कॉनेली) अजून पाच मिनिटांनी मी हायटॉवर ग्राऊंडमध्ये बसलो होतो. अजिबात गर्दी नव्हती. तिघे-चौघे कॉलेज विद्यार्थी वाटावेत असे तरुण-तरुणी समोर लॅपटॉप ठेवून बसले होते. मी रॅशेलसाठी आणि माझ्यासाठी कॉफी घेतली आणि इतर लोकांपासून जरा दूरच्या टेबलवर बसलो. इथे वायफाय फुकट होतं. मी माझा लॅपटॉप चालू केला आणि रॅशेलची वाट पाहायला सुरुवात केली. अशीच पंधरा-वीस मिनिटं निघून गेली. मला आता थोडी काळजी वाटायला लागली. तिचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसला नसला तर?