शांतरस

एकलव्य..

vaibhav deshmukh's picture
vaibhav deshmukh in जे न देखे रवी...
26 Jun 2014 - 10:35 am

एकलव्य....
कित्येक शतके उलटली
युगांतरे झाली
सत्तांतर घडले
मी माञ स्थिर आहे
त्याच सहानुभूतींच्या बंदिस्त नजरेत..
कोणी नाकारले म्हणूनच
शांत निश्चिल मूर्तीच्या साक्षीनेच
मी लक्ष्यावर असंख्य बाण सोडले
मी धर्नुधर झालो
रक्ताळलेल्या चार बोटांचा
श्रेष्ठ शिष्यही झालो
तेव्हाच;
त्या हाताकडे पाहताना
दु: खाचा लवलेशही नव्हता मुद्रेवर
पण;
मी डगमगलो ढासळलो
तुमच्या अनुत्तरीत प्रश्नात?
तुमच्या सहानुभूतीच्या नजरात?
तुमच्या पाणावलेल्या इतिहासात?
तुमच्या या पराजित युगात...!

करुणवीररसशांतरसकविता

उंबरठा नसलेले घर -- १

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
24 Jun 2014 - 3:46 pm

काय झालं कुणास ठाऊक पण
काल रात्री पावसात या घराचा
उंबरठाच वाहून गेलाय
तेव्हापासून घरातल्या सगळ्या वस्तू
जणू स्वतंत्र झाल्या आहेत
----
बैठकीच्या खोलीत
कोपर्‍यातल्या मेजावर
एक फुलदाणी होती
..
काल रात्रीपर्यंत होती
सकाळी अंगणात सापडली
पहाटेच्या वर्षावात एखादं फुलं
पदरात पडेल
या आशेने अंगणात आली असावी बहुदा
----
देवघरासमोरील समईची मंद ज्योत
आजकाल बाळकृष्णाच्या चेहर्‍याशी
पोहचेनाशी झालीये
त्या वाहलेल्या उंबरठ्याच्या
दिशेने झुकत राहते
थरथरत
----

करुणशांतरसहे ठिकाण

शोधयात्रा (भावानुवाद)

मूकवाचक's picture
मूकवाचक in जे न देखे रवी...
21 Jun 2014 - 9:03 pm

आम्ही ही अनोखी शोधयात्रा अधुरी कदापी सोडणार नाही
मात्र जिथून श्रीगणेशा केला त्या आरंभस्थानी डेरेदाखल होणे
अन त्या गंगोत्रीची पहिल्याप्रथम खरी ओळख करून घेणे
हीच आमच्या सार्‍या वाटचालीची अंतिम फलश्रुती असेल

मूळ काव्यः
We shall not cease from exploration
And the end of all our exploring
Will be to arrive where we started
And know the place for the first time.
-T.S. Eliot

शांतरसमुक्तक

उत्तर सापडेना आज?

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
21 Jun 2014 - 8:51 am

(अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि त्यांची निर्घुण हत्या होते. अश्या घटना देशात घटत आहेत. मग दिल्ली असो किंवा बदायूँ. प्रश्न अनेक आहेत पण उत्तर सापडत नाही. कुठे चूक झाली आमच्या पिढीच्या हातून कि आजची तरुण पिढी वासनेच्या आहारी जात आहे)

कुणी पायदळी तुटवली
एक नाजूक कळी आज?
मध्यान्हन उन्हाळी पसरली
का स्मशान शांतता आज?

ममतेचा कोखात निपजली
का रक्त पिशाचे आज?
माय बहिण भार्या नाती
का निरर्थक झाली आज?

वासनेच्या डोहात तरंगती
का नव तरुणाई आज?
काय जाहली चूक आमची
उत्तर सापडेना आज?

शांतरसकविता

आठवणीनो………….

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
14 Jun 2014 - 6:55 pm

नाही म्हटले तरी तुम्ही सतत येत राहता ……

मी अलिप्तपणे दूर व्हायचा प्रयत्न करतो ….

तरी बघता बघता कळत नाही …

कधी आणि कसा तुमच्या ओढीने खेचला जातो ….

एक आली की दुसरीही येते …

शृंखला अव्याहत सुरू असते

आजूबाजूच्यांना काय माहीत …

मन कुठल्या गाळात रुतून बसते

आपणच अडकायचं नी धडपडत बसायचं….

हा जुनाच नकोस खेळ रोज खेळणं…

तुम्हाला दूर लोटायच आहे हे ठरवूनही

तुमच्याच कुशीत नकळत शिरणं …

नेहमीच्या ह्या ओढाताणीत जीवाची किती घालमेल….

जो ह्या चक्रात एकदा तरी सापडलाय फक्त त्यालाच हे कळेल….

शांतरसमुक्तक

पडद्या मागची व्यथा

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
9 Jun 2014 - 8:02 pm

रंगविले मुखवटे अनेक
स्वत:चा चेहरा मात्र
रंगविला न कधी.

तालावर नाचविल्या
मंचावर कठपुतळ्या
नाचायला मला
मिळालच नाही.

मान नटसम्राटाचा
मिळतो बाहुल्यांना
दंश पराजयाचा
मलाच का मिळावा.

पडद्या मागची व्यथा
कळेल का कुणाला
रंगमंचावर मिळेल का
कधी मान सूत्रधाराला.

शांतरसकविता

कृष्ण

आनंदमयी's picture
आनंदमयी in जे न देखे रवी...
7 Jun 2014 - 12:17 am

रूप सावळे आतीव सुंदर
भक्तिरसाचा मनात पाझर
उठे शहारा अंगांगावर
अंतरात वसतो मुरलीधर

निळा गंध त्या निळसर देही
मोहक इतुका तो निर्मोही
वरवर सारे चंचल श्यामल
आत गूढ अविचलसे काही

चराचरांतून घुमे बासरी
सप्तसूर सावळा मुरारी
वाहे यमुना अमृत होवुन
उठती आतुन अथांग लहरी

प्राण नांदतो ह्या तीरावर
त्या तीरावर मन झेपावे
कृष्ण मूर्त सर्वस्व पुरे हे
कृष्णातच समरसून जावे

© डॉ.अदिती जोशी

शांतरसकविता

पाऊस नेहेमीच असा अवेळी यावा ...!!

जेनी...'s picture
जेनी... in जे न देखे रवी...
8 May 2014 - 8:22 pm

थंड वाऱ्याची झुळूक यावी,
हलक्याश्या स्पर्शान सरकलेला पदरही,
लाजेची सीमा पार करायला घाबरावा !

तुझा तो स्पर्श,
तुझ्या ओठांनी भिजवलेला शहारा,
शहार्यावर जणू तुझ्या नजरेचाच पहारा बसावा !

मी मुग्ध व्हावी, तू धुंद व्हावा
आणि मग हलकीशी पावसाची सुरुवात व्हावी ..
त्या भिजलेल्या सरी, तू ओंजळीत घ्याव्यास !!

नाजूक फुंकर, ओंजळीतल्या पाण्यावर मारावीस
अन क्षणभर ओठांचा स्पर्श करत,
ते पाणी माझ्या चेहेर्यावर उडवावस !

शांतरसमुक्तक

अतृप्ती-एक जीवन संघर्ष!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
30 Apr 2014 - 12:47 am

त्याच काय झालं माहित आहे का???
एक होता अतृप्त ...लहानपणापासूनच...
नावानिशी,नावाप्रमाणे---अतृप्त

गाणं असो..खाणं असो..की गाडी मागून धावत जाणं असो
अजिब्बात थांबायचं नाही. हीच त्याची खूण!

अरे..अरे..अडवा या पोराला
त्याची आयो..मागे ओरडत यायची
पण..तो कुठला थांबतोय? तो त्याच्याच प्रवासात.......दंग!!!

बाळा...हरवशील रे एकटाच कुठेतरी
आयो ओरडायची...
पण अतृप्ता'ला मुळीच ऐकू जायचं नाही
जणू कानच नव्हते त्याला.

शांतरसमुक्तक

तू

पद्मश्री चित्रे's picture
पद्मश्री चित्रे in जे न देखे रवी...
27 Apr 2014 - 12:02 am

तू वादळी समुद्र
मी एक लाट छोटी
मिटते जरी तुझ्यात
येतेच नाव ओठी
    तू तेज:पुंज तारा
    रात्री नभात येसी
    मी एक रातराणी
     फुलले तुझ्याचसाठी
तू सूर्य अग्निगोल
मी शांत तृप्त धरती
फिरते यूगे यूगे का
वेडावुनी सभोती
    तू मेघ पावसळी
    झरसी असा तूफान
    मी एक वेल रानी 
     गाते तुझेच् गान
तू गंध पारिजात
मी लाजरी पहाट
येते तुझ्याचसाठी 
भेदूनी काळरात
 तू सावळा मुरारी
  निर्जीव बासरी मी
  देता तू श्वास हलके
   घेते तुझ्या लकेरी

शांतरसकविता