मिपासार

(मिपावर) जे झालं ते चांगलंच झालं….(रोज नवीन गोंधळ हो !) जे चाललय त्यातही आनंदच आहे……. ( डूआयडी म्हणू नका , कट्टे म्हणू नका , लेख रतीब म्हणू नका, धुळवड म्हणू नका …) जे पुढे होईल तेही चांगलंच होईल (अशी आशा करूया…जय भोलेनाथ ! ) तुमचा असा कोणता आयडी होता, की जो तुम्ही घेणार होतात आणि तो आधीच मिपावर आला म्हणून तुम्ही रडताय ? तुम्ही मिपावर अशी कोणती लेखमाला लिहिलीत जी कोणीतरी दुसर्याने त्याच्या नावावर इतरत्र खपवली ? तुमचा असा कोणता आयडी होता जो सं मं कडून उडवण्यात आलाय ? तुम्ही जे काही वाङ्ग्मयचौर्य केलंत ते इथूनच केलंत…( पण कुणालाही न कळू देता….

व्यायामी ओव्या

ब्लॉग दुवा हा अवघ्या जगाला नको त्याची हाव आरोग्याचा ठाव घेतो कोण ठेविले अनंते तैसे न रहावे नेटके ठेवावे शरीरासी पायात सामर्थ्य हातामधे बळ स्नायूंना हो पीळ असावाच असो जिम किंवा असो खोली छोटी असावी सचोटी व्यायामात कुणी उचलती वजने ही फार संसाराचा भार पुरे कुणा वेल्ला म्हणे जेथे सहा बिस्किटे पहा असे तेथे पहिलवान करावेच अॅब्स भले प्लँक बिंक नेहमीच थिंक पॅाझिटिव्ह करावी न व्यर्थ जनाचिया पर्वा पहा आणि ठरवा आरशात आरोग्यचि एक उद्दिष्ट असावे आपण झटावे त्याच्यासाठी जरी देव पूर्ण करेल कामना संकटी सामना स्वतःचा

मनमोर ...

लेखनविषय:
काव्यरस
खिडकीच्या गजांवर येऊन थांबलेले, लाघवी मेघदूत, खिडकीबाहेर रंगलेला..... बेधुंद जलधारांचा विलक्षण नर्तनसोहळा...! नेमक्या त्याच वेळी, तुझ्या निद्रीस्त चेहर्‍याला व्यापून राहिलेल्या लडिवाळ बटा....! ..... ..... हे सगळं अनुभवण्यासाठी... अवघे दोनच डोळे .... ? अं ह... आता ते दोन्ही डोळेसुद्धा मिटले आणि... आणि फुलवला पिसारा मनमोराचा....! .... ... सगळ्या अंगांगाला फुटलेत लक्ष लक्ष डोळे ... आणि सुरू जाहला, एक अलौकिक सोहळा........! विशाल पूर्वप्रकाशित :मनमोर...

संध्याकाळ

लेखनविषय:
काव्यरस
ती आणि ही, दोघीही एकाच वयाच्या...जवळपास. तेच नेहमीचं पाहून न पाहणं, नजरेला नजर देऊनही अनोळखीपण जपणं. तिची नेहमीची लगबग, ही निवांत बसलेली. आजचा दिवस? जरा वेगळा, ती नेहमीपेक्षा थोडी टापटीप, हीच्या नजरेतून ते सुटलं नाहीच!! पुन्हा तेच नेहमीचं पाहून न पाहणं, नजरेला नजर देऊनही अनोळखीपण जपणं. ती आज थोडी जास्त लगबगीत ही मात्र नेहमीसारखीच निवांत, ढिम्म बसलेली. ती पुढे गेलेली मागे आली, कनवटीची दहाची नोट काढून हिच्या थाळीत टाकली... पुन्हा लगबगीत निघाली.. नातवाच्या वाढदिवसाला काय करावं, हा विचार तिच्या डोक्यात, ही तिने दिलेल्या दहात पोट कसं भरेल या विचारात गढून गेली दुसर्‍या दिवशी तेच नेहमीचं पाहून

.....पाऊस गात आहे .....

लेखनविषय:
काव्यरस
विस्तीर्णशा नभाला सोडून जात आहे पाऊस भोवताली, पाऊस आत आहे ... ठरले कधीच होते, नयनी पुन्हा न पाणी मी कोरडा तरीही पाऊस न्हात आहे ... शब्दात लपविलेली दु:खे क्षणात कळती शब्दाविना सूरांनी , पाऊस गात आहे ... राजांस वाचवाया, खिंडीत झुंजलेला, रक्तात पेटलेला पाऊस ज्ञात आहे ... कर्जात बुडलेला, गळफास लावताहे आई जमीन त्याची, पाऊस तात आहे ...

वाटतं असं... की!

काव्यरस
वाटतं असं... की तुझ्या हातात मोगरा भरभरून ठेवावा.. आणि सुगंधाशी सुगंधाला स्पर्धा करू द्यावी.. नक्की मला वेडं करणारा त्यातला कोणता आहे? ते शोधण्यासाठी! वाटतं असं... की पावसाने शांत झालेल्या मऊशार हिरवळीत तुझ्यासवे एकरूप व्हावं.. खऱ्या मीलनाचा मृद्गंध कळण्यासाठी! वाटतं असं... की तुझ्या हातांशी एकरूप झालेली मेहेंदी , मी नेहमी आठवावी.. हव्यास आणि सहजतेची ओढ यातला फरक.. मला समजण्यासाठी. वाटतं असं...

थोड्ड्स्स्स्स्सं खोटं...

लेखनविषय:
काव्यरस
थोड्ड्स्स्स्स्सं खोटं लागतच मला तंबाखुतल्या चुन्या इतकं त्याच्याशिवाय मेली खर्‍याला कीकच येत नाही,हवी तशी.! मी लै चांगला आहे, हे जनात. आणि मनात??? मायला..., कुठंतरी थोडा वाइटंहि आहे की! हे उत्तर ठरलेलं! भरपूर खय्रा बरोबर खोट्याचा सूड काढायला येणारं. देव? धर्म?? आध्यात्म??? छ्या! छ्या! आपुन येकदम विज्ञाननिष्ठ! हो का?????? मग मन दमून गेल्यावर ,अजूनही "अरे रामा...पांडुरंगा तूच आहेस रे बाबा!" हे कसं येतय बरं अजुन तोंडातून ! ( मनात काहीही असलं तरी! ) शाळेतले जुने मित्र भेटतात. काही जुने चष्मे असलेले! काही नवे धारण केलेले!

जंगल पूर्वीचे आज महानगर झाले

लेखनविषय:
काव्यरस
जंगल पूर्वीचे आज महानगर झाले पहिल्या पेक्षा जास्त खतरनाक झाले. भरल्या पोटी वाघ करत नव्हता शिकार. बेधुंध कार आज कधीही घेते प्राण. तेंव्हा दरवळत होता सुगंध मलयज गिरीचा. पेट्रोलच्या वासाने आज कासावीस होतो प्राण. कांव कांव कावळ्यांचे घरटे उंच मीनारांवर अंगणातली चिवताई कुठे हरवली आज.

'कविता' म्हणजे काय वेगळे

लेखनविषय:
खोल दरीतले वाहते पाणी उंच डोंगरावर पक्षी प्राणी कानावर घोंघावणारे वादळ नितळ दिसणारा सागरतळ फांदीवर हळूच फूल डुलणारे वाऱ्यावरून पान तरंगणारे नभात चांदणी चमचमणारी सागरात बोट हेलकावणारी झाडावरून खार तुरुतरुणारी रोपट्यावर कळी मोहावणारी सशाचा डोळा लुकलुकणारा वाळूतला शिंपला चमकणारा कोपऱ्यातले कोळ्याचे जाळे एका झुरळाचे सहस्र डोळे शब्दात रंगवणे हेच सगळे "कविता" म्हणजे काय वेगळे ..! .

मनात माझ्या

लेखनविषय:
काव्यरस
सखे घेतला हात तुझा हाती जेव्हा माझ्या वाटुन गेले जग मी जिंकले मनात माझ्या .. फुटू लागला प्रीतीचा अंकुर हृदयामधुनी होता पहिली नजरानजर वाटे मनात माझ्या .. आकाशाचे मीलन धरतीवर होई जेथे क्षितिजावर मी रंग उधळले मनात माझ्या .. फिरू लागलो जोडीने त्या उद्यानामधुनी उमलु लागली डोलु लागली फुले मनात माझ्या .. झाडाखाली विश्व विसरलो उन्हात जेव्हा सखये किती बरसला अवचित पाऊस मनात माझ्या .. आपण दोघे चांदण्यात त्या निवांत न्हात होतो चंद्रालाही खूप खिजवले दुरुनी मनात माझ्या .. जन्म हा केवळ दोघांचा सातही जन्म असावा मिळुनी घ्यावी शपथ दोघांनी आले मनात माझ्या .. .
Subscribe to शांतरस