शोधयात्रा (भावानुवाद)

लेखनविषय:
काव्यरस
आम्ही ही अनोखी शोधयात्रा अधुरी कदापी सोडणार नाही मात्र जिथून श्रीगणेशा केला त्या आरंभस्थानी डेरेदाखल होणे अन त्या गंगोत्रीची पहिल्याप्रथम खरी ओळख करून घेणे हीच आमच्या सार्‍या वाटचालीची अंतिम फलश्रुती असेल मूळ काव्यः We shall not cease from exploration And the end of all our exploring Will be to arrive where we started And know the place for the first time. -T.S. Eliot

उत्तर सापडेना आज?

लेखनविषय:
काव्यरस
(अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि त्यांची निर्घुण हत्या होते. अश्या घटना देशात घटत आहेत. मग दिल्ली असो किंवा बदायूँ. प्रश्न अनेक आहेत पण उत्तर सापडत नाही. कुठे चूक झाली आमच्या पिढीच्या हातून कि आजची तरुण पिढी वासनेच्या आहारी जात आहे) कुणी पायदळी तुटवली एक नाजूक कळी आज? मध्यान्हन उन्हाळी पसरली का स्मशान शांतता आज? ममतेचा कोखात निपजली का रक्त पिशाचे आज? माय बहिण भार्या नाती का निरर्थक झाली आज? वासनेच्या डोहात तरंगती का नव तरुणाई आज? काय जाहली चूक आमची उत्तर सापडेना आज?

आठवणीनो………….

लेखनविषय:
काव्यरस
नाही म्हटले तरी तुम्ही सतत येत राहता …… मी अलिप्तपणे दूर व्हायचा प्रयत्न करतो …. तरी बघता बघता कळत नाही … कधी आणि कसा तुमच्या ओढीने खेचला जातो …. एक आली की दुसरीही येते … शृंखला अव्याहत सुरू असते आजूबाजूच्यांना काय माहीत … मन कुठल्या गाळात रुतून बसते आपणच अडकायचं नी धडपडत बसायचं…. हा जुनाच नकोस खेळ रोज खेळणं… तुम्हाला दूर लोटायच आहे हे ठरवूनही तुमच्याच कुशीत नकळत शिरणं … नेहमीच्या ह्या ओढाताणीत जीवाची किती घालमेल…. जो ह्या चक्रात एकदा तरी सापडलाय फक्त त्यालाच हे कळेल…. एक दिवस तुमच्याबरोबर मलाही क्षितिजाकडे घेऊन चला …… तेव्हाच शांतपणे मागे वळून म्हणू शकेन….

पडद्या मागची व्यथा

लेखनविषय:
काव्यरस
रंगविले मुखवटे अनेक स्वत:चा चेहरा मात्र रंगविला न कधी. तालावर नाचविल्या मंचावर कठपुतळ्या नाचायला मला मिळालच नाही. मान नटसम्राटाचा मिळतो बाहुल्यांना दंश पराजयाचा मलाच का मिळावा. पडद्या मागची व्यथा कळेल का कुणाला रंगमंचावर मिळेल का कधी मान सूत्रधाराला.

कृष्ण

लेखनविषय:
काव्यरस
रूप सावळे आतीव सुंदर भक्तिरसाचा मनात पाझर उठे शहारा अंगांगावर अंतरात वसतो मुरलीधर निळा गंध त्या निळसर देही मोहक इतुका तो निर्मोही वरवर सारे चंचल श्यामल आत गूढ अविचलसे काही चराचरांतून घुमे बासरी सप्तसूर सावळा मुरारी वाहे यमुना अमृत होवुन उठती आतुन अथांग लहरी प्राण नांदतो ह्या तीरावर त्या तीरावर मन झेपावे कृष्ण मूर्त सर्वस्व पुरे हे कृष्णातच समरसून जावे © डॉ.अदिती जोशी

पाऊस नेहेमीच असा अवेळी यावा ...!!

लेखनविषय:
काव्यरस
थंड वाऱ्याची झुळूक यावी, हलक्याश्या स्पर्शान सरकलेला पदरही, लाजेची सीमा पार करायला घाबरावा ! तुझा तो स्पर्श, तुझ्या ओठांनी भिजवलेला शहारा, शहार्यावर जणू तुझ्या नजरेचाच पहारा बसावा ! मी मुग्ध व्हावी, तू धुंद व्हावा आणि मग हलकीशी पावसाची सुरुवात व्हावी .. त्या भिजलेल्या सरी, तू ओंजळीत घ्याव्यास !! नाजूक फुंकर, ओंजळीतल्या पाण्यावर मारावीस अन क्षणभर ओठांचा स्पर्श करत, ते पाणी माझ्या चेहेर्यावर उडवावस ! तो थंड स्पर्श, ती ओलाव्याची खूण सारेच माझ्य

अतृप्ती-एक जीवन संघर्ष!

लेखनविषय:
काव्यरस
त्याच काय झालं माहित आहे का??? एक होता अतृप्त ...लहानपणापासूनच... नावानिशी,नावाप्रमाणे---अतृप्त गाणं असो..खाणं असो..की गाडी मागून धावत जाणं असो अजिब्बात थांबायचं नाही. हीच त्याची खूण! अरे..अरे..अडवा या पोराला त्याची आयो..मागे ओरडत यायची पण..तो कुठला थांबतोय?

तू

लेखनविषय:
काव्यरस
तू वादळी समुद्र मी एक लाट छोटी मिटते जरी तुझ्यात येतेच नाव ओठी     तू तेज:पुंज तारा     रात्री नभात येसी     मी एक रातराणी      फुलले तुझ्याचसाठी तू सूर्य अग्निगोल मी शांत तृप्त धरती फिरते यूगे यूगे का वेडावुनी सभोती     तू मेघ पावसळी     झरसी असा तूफान     मी एक वेल रानी       गाते तुझेच् गान तू गंध पारिजात मी लाजरी पहाट येते तुझ्याचसाठी  भेदूनी काळरात  तू सावळा मुरारी   निर्जीव बासरी मी   देता तू श्वास हलके    घेते तुझ्या लकेरी चैतन्य तू जीवाचे तू श्वास अंतरीचे तू भास

विलक्षण कविता - असाध्य वीणा

लेखनविषय:
काव्यरस
"अज्ञेय" नावाच्या कवीने हिंदी भाषेत लिहीलेली एक विलक्षण कविता "असाध्य वीणा" मध्यंतरी वाचनात आली. भारदस्त अन कसदार शब्दसौंदर्याचे बावनकशी लेणे ल्यालेली ही कविता माझ्या मनाला चिंब भिजवून, अतिशय आल्हाद देउन गेली. मी तर म्हणेन सर्वाधिक आवडलेल्या काही कवितांपैकी ही एक! ___________ कवितेचा गाभा हा आहे की - गुहावासी ऋषी प्रियंवदा हे राजाकडे आलेले आहेत अन राजाने त्यांना एका वीणा छेडून , वाजवून दाखविण्याची, वीणावादन करण्याची विनंती केलेली आहे.

कचरा

लेखनविषय:
काव्यरस
कचरा आम्हाला आवडतो आमच्या घरात कचरा गल्लीत कचरा रस्त्यावर कचरा नाक्यावर कचरा अड्यावर कचरा स्टेशन वर कचरा जिथे पहा तिथे कचराच कचरा. विदेशी कचरा जास्तस आवडतो कचऱ्याची दलाली आम्ही आनंदी घेतो. पडणारी विमाने असो कि जंग लागलेली जहाजे किंवा बुडणाऱ्या डुब्या देशाची सुरक्षा सुद्धा करतो विदेशी कचरा . सडलेल्या द्राक्षांचा सुवास दरवळला झिंगून डुक्कर कचऱ्यात पहुडला परमानंदी टाळी तयासी लागली. कचऱ्याचा जयघोष आकाशी दुमदुमला.
Subscribe to शांतरस