शांतरस

समज..!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
2 Jan 2015 - 6:10 pm

एक..,दोन.. फुल्ल.. :- एक हाफ..
===========================
ट.क्यानी नेला तांब्या
अन्,कुंथुनं जिलबी-केली.
विडंबन जमले- नाही
आणि बोंबाबोंबंही झाली.

ना तालं नसे ना छंद
ना रचने'चा सं-बंध.
शब्दातं गंडला सांधा
पिशविचा तुटला बंद

भाषेसं अशी-ठेवावी?
रचनेची कशीहि-व्हावी!
वैतागून स्व'रचनेची
मगं कचकून हो मारावी!

शांतरसविडंबनमौजमजा

अगा पांडुरंगा ..

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
2 Jan 2015 - 12:07 pm

ज्योताय, तुझ्या हुकूमावरून खूप दिवसानंतर मिपावर परत लिहायला सुरूवात करतोय.
गोड मानून घ्या मंडळी ... _/\_

**************************************************

किती आळवावे स्मरावे तुला मी पुन्हा चित्त बेभान व्हावे अता
भुलावे जगाचे किती पांडुरंगा मनाचे मला भान व्हावे अता

नसे शुद्ध गंगा न पावन किनारे नको मोक्ष आता नको स्वर्ग ते
तुझ्या उंबर्‍याचा मिळो कोपरा ’मात्र’ जगणेच आख्यान व्हावे अता

पुन्हा देहकोशी धुमारे फुटावे किती पापणीने लवावे पुन्हा
तुला मी पहावे भजावे पुजावे, जळो दंभ हा, ज्ञान व्हावे अता

विठ्ठलशांतरसकविता

कसं जमतं तुला

सुचेता's picture
सुचेता in जे न देखे रवी...
29 Dec 2014 - 8:30 pm

कसं जमतं तुला, मनाला आवरणं?
किती सहज, हे तुझ असं विचारणं?
उत्तर द्यायला माझं पुरत भांबावणं
कितीएक क्षण नुसतचं गप्प राहण

गप्प राहण्याचा का हा अर्थ तू घेतला?
की सगळचं हे सहज शक्य होतय मला?
थोपवताना भावना घामाघूम जीव आपला
तुझ्यालेखी थट्टेचा, का विषय ठरला?

फुरंगटुन मी आणखीच व्हावं अबोल
समजवण्याच्या मिषानं तू यावं जवळ
लपवताना थरथर, मन उघडं पडावं
जे हवच होतं तुला, तुझं तु समजून घ्यावं

शांतरसकविता

टेक्श्चर

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
4 Dec 2014 - 5:24 pm

कापडाच्या दुकानात
एक कापड आवडलं
पण घेतलं नाही
दुकानदाराला सांगितलं
धागा छान आहे
रंग उत्तम आहे
नक्षीही सुरेख आहे
फक्त 'टेक्श्चर' चांगलं नाही
नंतर विचार केला, तेंव्हा
काही माणसं डोळ्यासमोर तरळली;
त्यांचही असंच आहे....

शांतरसकवितामुक्तक

आम्ही अस्पृश्याची पोरे

देवदत्त परुळेकर's picture
देवदत्त परुळेकर in जे न देखे रवी...
20 Nov 2014 - 11:30 am

विठ्ठलाचा पुत्र
रुक्मिणीचा बाळ
संन्याशाचे पोर
म्हणूनी अस्पृश्य
 
नका दे‌ऊ अन्न
नका दे‌ऊ पाणी
नका दे‌ऊ थारा
पहा हा अस्पृश्य
 
सावली पडता
दूर हो म्हणती
शिव्या शाप देती
म्हणती अस्पृश्य
 
दुषणे ठेविली
भिक्षा नाही दिली
मुंज नाही केली
ठेविले अस्पृश्य
 
ज्ञानराज श्रेष्ठ
भक्तराज श्रेष्ठ
योगीराज श्रेष्ठ
परि तो अस्पृश्य?
 
गीता उपदेशी
बोले ज्ञानदेवी
ज्ञान करी मुक्त
परि तो अस्पृश्य?
 
विठोबाचा प्राण
विसोबाचा गुरू

शांतरससंस्कृतीधर्मकवितामुक्तकसमाज

कधी कधी

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
17 Nov 2014 - 11:19 am

हसी तो फसी या हिंदी सिनेमातलं 'ज़हनसीब' हे अत्यंत आवडतं गाणं ऐकत असताना सुचत गेलेल्या ओळी. विडंबन नाही, पण ज़हनसीब च्या चालीवर बसणारी ही कविता.

कधी कधी
कधी कधी
मी गातो एकट्याने
कधी कधी

अजूनही
अजूनही
आठवते एक गाणे
कधी कधी धृ

कधी काळी त्या ओळी माझ्या मला वाटल्या
मनाच्या गोष्टीही त्या शब्दांमध्ये दाटल्या
धूळीच्या राशी त्या दिवसांवर आता साठल्या
तरी पुन्हा
तरी पुन्हा
उलगडतो तीच पाने
कधी कधी १

शांतरसकविताविडंबन

अजुनी बसून आहे

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
7 Nov 2014 - 11:55 pm

(चाल- अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना )

अजुनी बसून आहे
गुंता मुळी सुटेना
उघडे तसेच फेस्बुक
लॉगौट.. मन धजेना ..

मी फेस्बुकासमोरी
फेस्बुक-अॅडिक्ट आहे ..
मी हेच सांगताना
रुसुनी कधी बसावे
मी का इथून उठावे
समजूत का पटेना
धरसी अजब अबोला
तुज मौन सोडवेना ..

का पोस्ट मी लिहावी
चर्चाहि होत आहे
मेजवानी वाचका त्या
जाणून उत्सुकाहे
काही अटीतटीने
कुढता अढी सुटेना
कॉमेंट ये स्टेटसला
ऐसी स्थिती इथे ना ..

शांतरसकविताविडंबनमौजमजा

दर्शनता!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
5 Nov 2014 - 10:54 pm

दर्शनतेचा प्रत्यय यावा अशी लेखणी चालावी,
सहजाच्या अलगद वार्‍याने रूपातुनं ती बोलावी.

सांगायाचे जे जे असते शब्दातुनं ते समजावे,
काव्य जरी ते ना ठरले तरी अर्थातुन ते तोलावे.

विषय शब्द तो साचा साधा प्रतिमांची बळंजोरी नको,
माळेची गुंफण असू दे ती करं-कचलेली दोरी नको.

कुणी म्हणो तिज काव्य/मुक्तिका कुणी म्हणो तिज रचना ही,
कुणी म्हणो तिज शेरं-शायरी कुणी म्हणो तिज काहिही!

काव्याचे हे मर्म असे की भिडल्या वाचुन मुक्ति नव्हे!
भिडण्यास्तव ते करता यावे अशी कोणती युक्ति नव्हे!!!

शांतरसकविता

दिवाळी - वैचारिक क्षणिका

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
26 Oct 2014 - 5:40 pm

चाईनीज बॉम्ब
जोरात फुटला
कानाचा परदा
कुणाचा हो फाटला.

फटाक्यांचा धूर
आकाशी दाटला
खोखलत-खोखलत
कुणाचा प्राण गेला.

आधी केली साफ -सफाई
मग पसरविला कचरा
दिवाळीचा सण मोठा
असा साजरा केला.

शांतरसचारोळ्या