डॉक्टर आणि समीक्षक

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
24 Jul 2014 - 7:39 am

एकाच्या हातात कात्री
दुसऱ्याच्या हातात लेखणी
डॉक्टर आणि समीक्षक
करतात सदा चीरफाड.

डॉक्टरची कात्री
चालते शरीरावर
बहुतेक रोग्यांचे
वाचविते प्राण.

समीक्षकाची लेखणी
चालते कवितेवर
बहुतांश कवींचे
*हरते ती प्राण.

*टीप: समीक्षकांच्या, समीक्षेला घाबरून बहुतांश कवी कविता करणे सोडून देतात.

शांतरसवाङ्मय

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

24 Jul 2014 - 9:11 am | खटपट्या

आवडली !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jul 2014 - 9:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान !

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

24 Jul 2014 - 9:26 am | माईसाहेब कुरसूंदीकर

छान रे विवेक.
टीप-डॉक्टरांच्या फसवेपणाला कंटाळून घाबरून बहुतांश ज्येष्ठ नागरिक सकाळी योगासने करतात.

संजय क्षीरसागर's picture

25 Jul 2014 - 10:08 am | संजय क्षीरसागर

`सिनीअर सिटिझन' ही नवी कॅटेगरी आल्यापासनं ज्येष्ठ नागरिक, तरुणाईपेक्षा जास्त धमाल करतात असं निरिक्षण आहे.

सुबोध खरे's picture

25 Jul 2014 - 10:22 am | सुबोध खरे

माई साहेब,
कुणाच्या कोंबड्या ने का होईना उजाडल्याशी कारण.
जी गोष्ट तरुण वयातच करायला हवी होती ती उशिरा का होईन करतात ना मग झाले.
नाही तरी वेळ घालवायला काही तरी साधन तर हवेच ना ?