पुन्हा एकवार, मॅन्चेस्टर युनायटेड फॅन या नात्याने गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतोय, ही ईपीएल जिंकण्यासाठी.
गणपती बाप्पा काय काय सांगू
आलोय आम्ही मागायला
ते ते सगळं, जे जे लागतं,
प्रिमियर लीग मारायला ||धॄ||
कोच आहे विद्वान खरा
आहे जरा निराळी त-हा
मात्र सगळ्या प्लेयर्सना
शिकवा त्याचं ऐकायला ||१||
संघ टाकतोय कात जरी
नेहमीचीच ही बात जरी
नव्या जुन्याची सांगड तेवढी
मदत करा घालायला ||२||
बुद्धी पास द्यायला आणि
ताकद किक मारायला
जोर थोडा पायांमध्ये
बॉक्स टू बॉक्स धावायला ||३||
संघ जरासा गळपटलाय
विश्वास थोडा डळमळलाय
एकच तगडा विजय हवाय
ती आग पुन्हा लागायला ||४||
हार जीत होतेच नेहमी
जाणतो जरी सारे आम्ही
विजयाचीच वेसण हवी
बोलणा-यांना थांबवायला ||५||
गणपती बाप्पा काय काय सांगू
आलोय आम्ही मागायला
ते ते सगळं, जे जे लागतं,
प्रिमियर लीग मारायला ||धॄ||
प्रतिक्रिया
1 Sep 2014 - 4:23 pm | पैसा
:D
नव्या युगातली नवी प्रार्थना!
1 Sep 2014 - 10:54 pm | माम्लेदारचा पन्खा
"येऊ कशी तशी मी नांदायला हो"ची चाल मस्त आहे ह्याला !!
2 Sep 2014 - 6:44 am | वेल्लाभट
आय्ल्ल्ला हो !!!! हे माझ्या लक्षात्त्तच नाही आलं की राव ! वा वा ! काय शोधलंयत !
18 Sep 2014 - 8:16 pm | अजय जोशी
मस्त..