शोधयात्रा (भावानुवाद)

मूकवाचक's picture
मूकवाचक in जे न देखे रवी...
21 Jun 2014 - 9:03 pm

आम्ही ही अनोखी शोधयात्रा अधुरी कदापी सोडणार नाही
मात्र जिथून श्रीगणेशा केला त्या आरंभस्थानी डेरेदाखल होणे
अन त्या गंगोत्रीची पहिल्याप्रथम खरी ओळख करून घेणे
हीच आमच्या सार्‍या वाटचालीची अंतिम फलश्रुती असेल

मूळ काव्यः
We shall not cease from exploration
And the end of all our exploring
Will be to arrive where we started
And know the place for the first time.
-T.S. Eliot

शांतरसमुक्तक

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

21 Jun 2014 - 11:21 pm | कवितानागेश

The Journey Home. :)

यशोधरा's picture

22 Jun 2014 - 11:14 am | यशोधरा

+१

एस's picture

22 Jun 2014 - 11:14 am | एस

छान प्रयत्न. भावानुवाद तितका तरल झाला नाही. शब्दानुवाद जास्त वाटला. अजून भावपूर्ण करता आले असते का, प्रयत्न करून पहा. अजून थोडे स्वैर व्हा. फलश्रुती नक्की होईल.

प्यारे१'s picture

22 Jun 2014 - 3:26 pm | प्यारे१

'तुझे आहे तुजपाशी' असं काही आहे काय?

कवितानागेश's picture

22 Jun 2014 - 11:58 pm | कवितानागेश

नाही थांबवू शकत आपण शोध घेत रहाणं,
कधी चालणं, कधी बुडणं,
अन पुन्हा मागे फिरणं,
मला माहितीये,
आपल्या या अथक शोधयात्रेचं फलित
तिथेच प्रकटेल,
जिथून आपण वाहात आलोय दूरवर,
मग नव्यानीच जाणून घेउ ती गंगोत्री,
अन नव्यानीच ओळखू,
तुलाही,
मलाही...

- (द्वैतात रमणारी) माउ

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Jun 2014 - 1:00 pm | llपुण्याचे पेशवेll

हे अधिक तरल वाटले.

@ मूवा, प्रयत्न छान.

इनिगोय's picture

23 Jun 2014 - 1:46 pm | इनिगोय

+१
असेच..

सुधीर's picture

24 Jun 2014 - 8:50 am | सुधीर

T.S. Eliot यांचे हे वाक्य स्टिव्हन कव्हींच्या सेव्हन हॅबिट्स मध्ये वाचले होते. त्या पुस्तकाचा शेवट या वाक्याने आहे. लिमाउंची रचनाही आवडली.

पैसा's picture

26 Jun 2014 - 10:52 pm | पैसा

माऊने केलेला भावानुवादही आवडला!