शरीरशुद्धी, सपाट पोट, योग्य वजन आणि संपूर्ण आरोग्य मी कसे मिळवले ?

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
19 Oct 2015 - 8:26 am

मित्रहो, नुक्ताच वयाच्या पासष्ठाव्या वर्षात प्रवेश करता झालो. खूप पूर्वी होतो, तसा पुन्हा आता मी एकदम फिट आणि उत्साही झालेलो आहे. गेली पंधरा-वीस वर्षे मात्र मी असा नव्हतो. यासाठी मी कोणताही औषधोपचार वा खास व्यायाम केलेला नाही. फक्त आहारात बदल केल्याने हे सर्व कसे घडून आले, हे मी या लेखात सांगतो आहे.

१. आरोग्यातून अनारोग्याकडे वाटचाल :
पंचविशी - तिशीत सडपातळ आणि उत्साह- ऊर्जेने भरलेला मी पुढे चाळीशी-पन्नाशीत हळूहळू स्थूल, आळशी, निरुत्साही कसा होत गेलो, हे कळलेही नाही. अपचन, सुटलेले पोट, वाढलेले वजन, प्रमाणाबाहेर कोलेस्टरोल, यातून आता आपली सुटका नाही या विचाराने आणखीनच नैराश्य येऊ लागले. 'क्रॉनिक फटिग सिंड्रोम' ची लक्षणे माझ्यात दिसत होती, आणि वर्षानुवर्षे 'फिस्टुला' च्या वेदना मी भोगत होतो. फिस्टुलावर शस्त्रक्रिया हाच उपाय असल्याचे सर्जनने सांगितले, परंतु जालावर हुडकता शस्त्रक्रिया करून सुद्धा पुन्हा फिस्टुला उद्भवतो असे समजले. अ‍ॅलोपाथीची औषधे घेणे मला कधीच भावत नसल्याने आता करावे तरी काय, हेच कळेनासे झाले. पूर्वी नियमित व्यायाम करायचो, तोही आळस आणि निरुत्साहामुळे बंद झाला. गोड, तळकट खाणे सोडवले जात नव्हते. अतिशय निराशाजनक परिस्थिती निर्माण झाली होती.
रेक्झीन च्या खुर्चीवर बसल्याने, सिंथेटिक कापडाची विजार घातल्याने, कॉफी प्यायल्याने लगेच फ़िस्टुला होतो हे लक्षात आल्यावर कॉफी पूर्ण बंद केली, सुती पटलूण घालू लागलो, आणि सिनेमाला जातानासुद्धा बुडाखाली ठेवायला सुती बस्कुर नेऊ लागलो. या उपायांनी फिस्टुला होण्याचे प्रमाण जरा कमी झाले खरे, परंतु पुढे मूळव्याधीने पण मला ग्रासले. --- आता मात्र माझी पाचावर धारण बसली. जाहिरातीत दाखवतात त्याप्रमाणे "मै अपनी जिंदगीसे तंग आ चुका था… मेरी बीवी मुझसे नफरत करने लगे थी " --- असे झालेले होते, पण ... " फिर एक दिन मुझे पिंटो मिला, उसने मुझे xxxxx के बारे मे बताया" ... असे मात्र काही घडून येत नव्हते.

२. आशेचा किरण :
अश्या परिस्थितीत २०१४ च्या जुलै महिन्यात अमेरिकेत येऊन पहुचलो. मुलाचे घर पहिल्या मजल्यावर होते, तो एक जिना चढायलाही मला जड जात होते. आलो, त्याच दिवशी मुलाने ' Fat, Sick and Nearly Dead' हा सिनेमा दाखवला आणि त्यात दाखवल्याप्रमाणे आपण सर्वजण एक आठवडा फक्त भाज्या-फ़ळांचा रस घेऊन राहूया, असा प्रस्ताव मांडला. मला आणि पत्नीला ही कल्पना अशक्य कोटीतील वाटली. नुसत्या रसाने पोट कसे भरणार ? प्रोटीन्स, कार्बोहायड्रेटे, दूध-तूप वगैरेंशिवाय शक्ती कशी राहणार ? एक दिवस सुद्धा जेवणात पोळी नसेल तर आपण त्रस्त होतो, सात दिवस कसे काढणार ? वगैरे शंका होत्या, पण मुलगा एवढे म्हणतो आहे तर करून बघू, झाला तर फायदाच होईल, अगदी रहावले गेले नाही तर खाऊया काहीतरी, असा विचार करून आम्ही संमती दिली.

३. रस-आहारावर वीस दिवस आणि 'काळ-सर्प वियोग'

मग लगेचच बाजारात जाऊन ज्यूसर खरेदी केला आणि काकडी, हिरवी सिमला मिर्च, दुधी भोपळा, पालक, पोदिना, सेलरी, केल वगैरे हिरव्या भाज्या, हिरवी (ग्रॅनी स्मिथ) सफ़रचंदे, पिवळी-लाल सिमला मिर्च, गाजरे, संत्री, टमाटर, ग्रेपफ़्रूट, बीटरूट, लाल सफ़रचंदे, अननस, कलिंगड, वगैरे लाल-पिवळ्या भाज्या आणि फळे, आले, ओली हळद, लिंबू असे सर्व सामान नीट धुवून फ्रिज मध्ये ठेऊन सज्ज झालो.
.
दुसरे दिवशी सकाळी ताजा रस काढून प्राशन केला, आणि मग दिवस भर भूक लागेल तेंव्हा रस, नारळपाणी पीत राहिलो. अधून मधून काही खावेसे वाटले, तर खजूर, केळे, एकादे फळ, भाज्यांचे सूप, उकडलेले अंडे, आणि अगदी फार वाटले तर तीन-चार दिवसातून एकदा थोडी खिचडी, एकादी भाकरी वा वरण-भात, थालिपीठ असे खात सुमारे वीस-पंचवीस दिवस काढले.
...
रसासाठी भाजी आणि फळे आणताना ती हिरवी, पिवळी, नारंगी, लाल, जांभळी, काळी वगैरे विविध रंगांची असतील हे बघत होतो.
.
रोज सकाळ-संध्याकाळ वजन बघणे आणि थोडे पायी फिरणे सुरु केले. रोजची शी कशी होते, यावर देखील लक्ष ठेवले होते. दुसर्‍या-तिसर्‍या दिवसापासून पुढले काही दिवस विष्ठेतून भोवताली खूप तंतू असलेले, हलके, पाण्यावर तरंगणारे विचित्र आकाराचे 'आयटम' (जीव-जंतु ?) निघत होते.
.
पाचव्या दिवशी हातभर लांब, काळे, रबरासारखे वेटोळेच्या वेटोळे बाहेर निघाले (त्याचे मी 'काळसर्प' असे नामकरण केले) ते बघून अगदी थक्क झालो. लगेच स्वतःचे वजन केले, ते एक किलो कमी भरले. आतड्यात वर्षानुवर्षे साचून घट्ट बसलेली घाण निघाली, हे लगेचच लक्षात आले. गंमत म्हणजे मला एकदम दहा वर्षांनी तरूण झाल्यासारखे वाटले, आणि मोठ्याने एकादे 'आयटम साँग' म्हणत धावत सुटावेसे, नाचावेसे वाटू लागले...
...
सहाव्या दिवशी पण एक लहानसा 'काळसर्प' निघाला. या काळसर्प-वियोगानंतर दहा-पंधरा दिवसातच मूळव्याध आणि फिस्टुलाच्या भयंकर व्याधीतून माझी कायमची सुटका होऊन पुन्हा पूर्वीसारखा उत्साह वाटू लागला. यानंतर मी जोमाने सायकलिंग, पोहणे, लांब चालायला जाणे, काही व्यायाम वगैरे करू लागलो, त्याने आणखी आरोग्यलाभ झाला.
अमेरिकेला जाण्यापूर्वी मी भारतातून ३८-३९ इंच कंबरेच्या पटलूणी नेल्या होत्या, त्या अगदी ढगळ होऊ लागल्या, आणि ३३ इंची घ्याव्या लागल्या. वजन ५ किलो कमी झाले.

४. यानंतरचा काळ :
भारतात आल्यानंतरही रोज एक-दोन ग्लास जूस पिणे चालू ठेवले. थोडासा ताजा आवळ्याचा रस, नारळ पाणी यांची आणखी भर पडली. शिवाय दही, पिकलेले केळे, खजूर आणि ज्यूस काढताना निघालेला थोडासा चोथा हे सर्व मिक्सर मध्ये पाण्यासह घुसळून बनवलेली स्वादिष्ट लस्सी/स्मूदी पिऊ लागलो.
.
ब्रेड, तळकट आणि मैद्याचे पदार्थ, मिठाई याविषयीचे आकर्षण आपोआपच संपलेले असल्याने मुद्दाम स्वत:वर ताबा ठेवावा न लागता हे पदार्थ आहारातून बाद झाले. 'ग्लूटेन फ्री' खायचे म्हणून गव्हाच्या पोळ्या खाणे अगदी कमी केले.

ही झाली माझ्या आरोग्य संपादनाची हकीगत. मागे पुण्यात मिपाकरांसोबतच्या 'पाताळेश्वर कट्ट्या'त मी हा सर्व अनुभव सांगितला होता. त्यापैकी समीर शेलार याने मनावर घेऊन हा प्रयोग केला, त्याचा त्याला खूपच फायदा झाला.

कुणाला या विषयी जास्त माहिती हवी असेल, तर अवश्य व्यनि करावा. सध्या मी हे सर्व कसे घडून आले, यामागचे विज्ञान काय आहे वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.
या उपायाचे प्रवर्तक ऑस्ट्रेलियातील 'जो क्रॉस' यांच्या खालील वेबसाईट वर अनेक जूस, स्मूदी, सलाद, सूप वगैरेंच्या पाककृती दिलेल्या आहेत.
http://www.rebootwithjoe.com

Fat Sick and Nearly Dead:
https://www.youtube.com/watch?v=8o0pSnp0Xs8

पाकक्रियासमाजजीवनमानराहणीऔषधोपचारविज्ञानशिक्षणप्रकटनलेखअनुभवशिफारससल्लामाहितीमदत

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

19 Oct 2015 - 1:44 pm | प्यारे१

हा कालसर्पयोग प्रकार वेगवेगळ्या प्रकारे करतात असं वाटतंय.

२००० साली एस एस वाय केलं होतं तेव्हा शेवटच्या टप्प्यात पातेलंभर कोमट पाणी मीठ घालून प्रत्येकाला दिलं होतं. पित राहायचं नि थोडं चालणं उड्या मारणं वगैरे. मीठाचं पाणी प्यायल्यावर व्हायचं ते होतं. आधी उलट्या मग खालून सगळं बाहेर पडणे वगैरे. पाणी पिणं थांबवायचं नाही.
या बाहेर पडण्यात आधी चित्रगुप्त म्हणतात तसं अतिशय घाण पासून नंतर हळू हळू सगळं चिकटलेलं वगैरे बाहेर पडतं. शेवटाकडं प्यायलेलं पाणीच संडासवाटे बाहेर पडू लागतं.
नंतर १० १५ दिवस बाळाचा आहार घ्यायचा. गुरगुट्या भात तूप घालून वगैरे. आणि त्यातले लोक निव्वळ कच्च्या भाज्या, ड्राय फ्रुट्स नि फळं यावर असतात.

अत्यंत माहितीपूर्ण धागा. तुमच्या चिकाटीला सलाम!!!!!

तुमचे दिवसाचे पूर्ण वेळापत्रक द्याल का?

१) सकाळी किती वाजता उठलात?
२) सकाळी शरीर मोकळे होण्यासाठी काही व्यायामप्रकार केले का?
३) नाष्ट्या ऐवजी किती ग्लास ज्यूस प्यायलात? किती वाजता?
४) दिवसभरात इतर काही खाल्ले का? साधारणपणे किती वाजता?
५) पाणी किती प्यायलात? घन स्वरूपातील अन्न टाळत असल्याने पाणी पिण्याचे प्रमाण वाढले का? पाणी कोमट प्यायलात का साधे?
६) हे सगळे करताना दिवसातून ठरावीक वेळी माफक व्यायाम केला का?
७) झोप शांत लागते का?
८) झोपेच्या पूर्वीच्या आणि आत्ताच्या वेळापत्रकामध्ये काही फरक पडला आहे का?

आणखी काही मुद्दे आठवले तर पुढील प्रश्न विचारेन.

पिलीयन रायडर's picture

19 Oct 2015 - 2:07 pm | पिलीयन रायडर

मोदकला पुढचा प्रोजेक्ट मिळालेला आहे!
आता लवकरच आपल्याला शास्त्रशुद्ध लेखमाला वाचायला मिळलेच. मग आपण ती आपल्या रुटीनमध्ये चोप्य पस्ते करु!

प्यारे१'s picture

19 Oct 2015 - 2:11 pm | प्यारे१

=)) =)) =))

ओ ताई.. कशाला चेष्टा करताय गरिबाची.

व्यायाम करायचा कंटाळा असल्याने आणखी काही मार्ग मिळतो आहे का ते शोधत असतानाच हा लेख सामोरा आला
..आणि हे सर्वांना सहज शक्य आहे.

चित्रगुप्त साहेब.. तुमचे या लेखाबद्दल प्रचंड प्रचंड आभार..!!!!!!!!

टवाळ कार्टा's picture

19 Oct 2015 - 2:45 pm | टवाळ कार्टा

खि खि खि

चित्रगुप्त's picture

19 Oct 2015 - 8:42 pm | चित्रगुप्त

१. सकाळी उठण्याची वेळः मला लहानपणापासून सुमारे ५-५:३० वाजता उठायची सवय आहे, त्यातून आता वयामुळे पहाटे तीन ते पाच च्या मधे केंव्हातरी जाग येते.
२. व्यायामः मी सर्व बाबतीत अनियमित असल्याने व्यायाम नियमित कधीच केलेला नाही. त्यातून हा प्रयोग सुरु केला तेंव्हातर फारच आळशी झालेलो होतो. पोट, वजन कमी झाल्यावर मात्र उत्साह संचारून बर्‍यापैकी नियमित व्यायाम सुरु झाला.
३. माझ्या जेवणाखाण्याच्या वेळाही ठरलेल्या नाहीत (कदाचित अश्या सर्व अनियमितपणाच्या परिणामीच मूळव्याधीपर्यंत मजल गेली असावी) त्यामुळे जेंव्हा वाटेल, तेंव्हा थोडे थोडे जूस सावकाशपणे पीत होतो.
४. अन्य खाणे: याबद्दल नोंद न ठेवल्याने आता आठवत नाही, परंतु दोन-तीन दिवसांनंतर (कृमि मेल्यावर ??) अन्य काही खाण्याची इच्छा कमी झाली. खजूर, केळे, अंजीर, भिजवलेले बदाम, उकडलेले अंडे असे वाटले तर खात असे.
५. पाणी तहान लागेल तेंव्हा साधेच पीत असे. मुद्दाम ठरवून अमूक इतके असे केले नाही. जूसिंगच्या दिवसात एकाद लीटर पाणी पुरेसे वाटते. उन्हाळा असेल तर जरा जास्त. उत्तम भाज्या - फळे थंडीत चांगली मिळत असल्याने तेंव्हा करणे सोपे.
६. व्यायाम दहा-पंधरा दिवसांनंतर करू लागलो, तोही अगदी हलका.
७. झोप नेहमी अगदी लगेच लागते, त्यात काही बदल झाला नाही.

पांढरी साखर (आणि मिठाया) खाऊ नये, त्या ऐवजी खजूर, केळी (अगदी पिकलेली) खाणे चांगले.
मैद्याचे सर्व पदार्थ वर्ज्य केल्यास उत्तम परिणाम होतो.

धन्यवाद. आणखी प्रश्न असल्यास जरूर विचारेन.

तर्राट जोकर's picture

19 Oct 2015 - 2:13 pm | तर्राट जोकर

इच्छुकांसाठी जो क्रॉस यांची ही मोफत पीडीएफ आहे. १५ दिवसाचा प्लान आहे. बघुया करून. ते आतडीतून निघालेले रबर बघून नखशिखांत हललो आहे. कित्येक प्रयत्नांनंतरही वजन कमी न होण्याचे खरे कारण आज सापडले. चित्रगुप्त यांना लाख धन्यवाद!

हा धागा योग्य रितीने चालू राहावा, चांगले माहितीपूर्ण प्रतिसाद येऊन प्रयोगकर्त्यांच्या अनुभवाचे बोलही इथे यावेत. आर्थिक घडामोडीसारखा हा धागा प्रवाही राहिले तर बरं.

पिडिएफ घेतलीये.आज सर्व भाज्या फळं आणते लिस्ट प्रमाणे.बघतेच करुन डिटाॅक्स !
पिरे चल सुरु करु.

पिलीयन रायडर's picture

19 Oct 2015 - 2:38 pm | पिलीयन रायडर

इथे कुणीतरी ज्युस करुन , माझी मान मागे करुन माझ्या घशात ज्युस ओतुन मझं तोंड पुसुन माझी मान परत जागेवर आणुन देणार असेल तर I am in!!!

टवाळ कार्टा's picture

19 Oct 2015 - 2:46 pm | टवाळ कार्टा

घरी नव्रा नामक हक्काचा नोकर अस्तो =))

पिलीयन रायडर's picture

19 Oct 2015 - 4:15 pm | पिलीयन रायडर

तो सध्या घरी नसतो.. हच पिराब्लेम आहे..

अजया's picture

19 Oct 2015 - 2:57 pm | अजया

मान कुरियर कर इथे.

टवाळ कार्टा's picture

19 Oct 2015 - 4:19 pm | टवाळ कार्टा

khikk

प्यारे१'s picture

19 Oct 2015 - 4:27 pm | प्यारे१

'कनेक्टीविटी' चा प्रॉब्लेम येईल असं नाही वाटत?

चित्रगुप्त काका, अत्यंत प्रेरणादायी लेख.. 'कोलोन क्लिनींग' बद्दल ऐकले आहे, पण त्याचे महत्त्व इतके असते हे ठाऊक नव्हते. ती एक 'मार्केटींग गिमीक' वाटायची.. काही प्रश्न, ज्यांनी उत्तरे तुमच्याकडून व डॉक्टरलोकांकडून अपेक्षित आहेत..
१. सुरुवातीला कही त्रास झाला का? 'क्रेव्हींग्स' वगैरे..
२. वर दादादरेकरांनी विचारलंय की चोथ्यासकट प्यावं की चोथ्याशिवाय? तुम्ही 'चोथ्याशिवाय' असं लिहीलंय. पण मग चोथ्यातील पोषकतत्वे वाया नाही का जाणार? चोथ्याला पुन्हा पाणी टाकून फिरवून त्याला गाळून घेतल्यास चालेल काय? (कंजूसपणासाठी सॉरी ;-) )
३. महीना-दोन महीना हा आहार केल्यास त्याचे काही तोटे आहेत का (क्रॅशडायटींगसारखे)?
४. ह्या आहारासोबत व्यायाम केल्यास चालतो का? कि थकवा येणार? वेल्लासाहेबांची कमेंट आहेच वर..
५. ह्या आहारानंतर आपल्या नेहमीच्या (माफक प्रमाणात 'बिंज' करणार्‍या) आहाराकडे वळल्यास त्याने काही तोटे आहेत का? बर्‍याचशा डाईटींग प्लान्सनंतर शरीर 'रिबाऊंड' करण्याचा प्रयत्न करते, असं ऐकलं आहे..

आणखीही काही प्रश्न आहेत.. सध्या इतकं पुरे..

चित्रगुप्त's picture

20 Oct 2015 - 3:29 pm | चित्रगुप्त

१. सुरुवातीचे दोन-तीन दिवस रोजच्या अन्नाच्या अभावी जरा चुकल्या चुकल्या सारखे वाटले, परंतु भूक अशी लागली नाही, कारण खरेतर रोजच्यापेक्षा जास्त पोषक द्रव्ये शरीराला जूसमधून मिळणे सुरू झालेले असते. शरीरात साठून असलेली चरबी जाळणे हे उद्दीष्ट असल्याने खरेतर अन्नाची गरजही नसते.
२. चोथ्यात असलेली पोषक तत्वे वापरण्यासाठी त्यात पाणी टाकून फिरवून वा उकळून गाळून सूप बनवता येईल. किंवा घरच्या इतर मंडळींसाठी चोथा वापरून पराठे, थालपीठ, आणखी भाजी घालून रस्सा वगैरेही बनवता येईल. चोथ्यात दही-केळे आणि पाणी घालून मिक्सर मधे उत्तम पेय तयार होते. मात्र हे सर्व जूसिंग करणाराने त्या ठराविक दिवसात न घेणे बरे. फार वाटले, तर एकाद वेळी घ्यायला हरकत नाही.
३. सुरुवातीला एकदम महिना-दोन महिने न करता सात-आठ दिवस करणे बरे. नंतर मधे काही दिवस सकाळी एक-दोन ग्लास जूस, बाकी दिवस भर रोजचा आहार (अर्थात मैद्याचे पदार्थ वर्ज्य) असे करून पुन्हा काही दिवसांनी पाच-सात दिवस रसाहार, असेही करता येईल.
४. उत्साह वाढत असल्याने व्यायाम करावासा वाटू लागतो, तो अवश्य करावा, मात्र अति शीण येणारे व्यायाम नकोत. योगासने सर्वात उत्तम. शिवाय पायी चालणे, सायकलिंग, पोहणे वगैरे झेपेल तेवढे करावे. हे सर्व जास्त वेगात करू नये.
५. एवढे केले, की पुढे काय करायचे हे आपोआपच समजते. मी रोज जूस आणि चोथा वापरून केलेली लस्सी/स्मूदी घेणे सुरु ठेवले आहे. पांढरी साखर, ब्रेड-मैद्याचे तळकट पदार्थ, याविषयी आपोआपच विरूचि निर्माण झाल्याने ते मुद्दाम टाळावे लागत नाहीत. कणकेची पोळी कधीतरी खातो, त्याऐवजी भाकरी, थालीपीठ, भात हे 'ग्लूटेन फ्री' अन्न घेतो.
प्रत्येकाची प्रकृती निराळी असल्याने आपल्यावर काय परिणाम होतो, हे ज्याने त्याने जागरूकपणे बघून ठरवावे.

चिगो's picture

20 Oct 2015 - 4:43 pm | चिगो

आपल्या सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद, चित्रगुप्तकाका..

आनंदराव's picture

19 Oct 2015 - 3:41 pm | आनंदराव

काका , लेख वाचुन थक्क झालो आहे. मला पित्ताचा त्रास आहे. (बराच आळशी पण आहे). तुम्ही सांगितलेला प्रयोग करुन बघणार.

बाकी वेल्लाभट यांनी दोन ओळीत जीवनसत्य सांगितले आहे.
बॉडी अँड सोल इज द ओनली अ‍ॅसेट यू रियली ओन. इन्व्हेस्ट इन वर्काउट अँड गुड हेल्दी डाएट, अँड रीप द डिव्हिडंड कॉल्ड फिटनेस.

आभार!

प्यारे१'s picture

19 Oct 2015 - 3:48 pm | प्यारे१

>>>> बॉडी अँड सोल इज द ओनली अ‍ॅसेट यू रियली ओन. इन्व्हेस्ट इन वर्काउट अँड गुड हेल्दी डाएट, अँड रीप द डिव्हिडंड कॉल्ड फिटनेस.

बाल की खाल - यु रिअलि 'ओन' द बॉडी???? :)

वेल्लाभट's picture

19 Oct 2015 - 3:55 pm | वेल्लाभट

बाल की खाल - यु रिअलि 'ओन' द बॉडी????

यू आर सपोज्ड टू ओन इट. बट मेनी पीपल जस्ट पझेस इट.
अँड दोज हू अझ्यूम ओनरशिप ऑफ इट, टेक केअर ऑफ इट.
बिकॉज ओनरशिप कम्स बन्डल्ड विथ रिस्पॉन्सिबिलिटी.

कुणाला या विषयी जास्त माहिती हवी असेल, तर अवश्य व्यनि करावा.

मला याबद्दल अधिक माहिती हवी आहे, इथे दिलीत तरी चालेल. वर मोद्कभाउंना पडलेले प्रश्न मलाही पडले आहेत. तसेच आपणास आहारात अचानक बदल केल्या केल्या काही त्रास जाणवला काय ? विषेशतः अपचन, अशक्तपणा, चक्कर वगैरे वगैरे ? मी सध्या रात्री फक्त सफरचंदे आणी संत्री (अधाशासारखा बका बका भरपेट ) खातो. पण यामुळे मला गॅसचा त्रास वाढला असे अनुभवाला आले आहे. त्यामुळे लिक्वीड डायट करायचे माझ्या मनात बरेच दिवस होते पण धिर होत न्हवता. तुमच्या मुळे तो सुदीनही उगवला असे वाटत आहे, आपण माहिती लवकर शेअर करा मी शक्यतो उद्या पासुनच हे करु इछ्चीत आहे. अतिशय धन्यवाद.

तर्राट जोकर's picture

19 Oct 2015 - 5:14 pm | तर्राट जोकर

जे सदस्य हा प्रयोग लगेचच सुरू करू इच्छितात त्यांनी मी वर दिलेली पीडीएफ वाचून घ्यावी. त्यात म्हटल्याप्रमाणे १५ दिवसांचा प्लान सूरु करण्याच्या एक आठवडाआधीपर्यंत एक सिमॉल प्याक प्लान करावा. ज्यात फक्त दिवसातून एकदा ज्यूस, तळलेले व इतर हानिकारक पदार्थ वर्ज्य, पाणी भरपूर पिणे इत्यादी करावे. नंतर मेनकोर्स ला सुरुवात करावी. सुरवातीचे ३-५ दिवस असहय होण्याची शक्यता आहे. नंतर सुरळीत होईल. अधिक माहिती साठी पिडीएफ नीट वाचून घ्यावी.

अजाणतेपणी शरिरासोबत अचानक प्रयोग करू नयेत. एकदा असेच ज्युस-फलाहार टायप डायट करून माझी प्रकृती पार बिघडली होती. चक्कर यायचे. अशक्तपणा वाढला. डॉक्टरकडे गेलो तर तो म्हणाला साखर कमी झालिये. पूर्ण चौरस आहार दोन्ही वेळेला घ्या. पण ह्या सगळ्या धबडग्यात या आगावूपणाचा दोन महिने खूप त्रास झाला. डॉक्टरकडे जायला अजून उशीर झाला असता तर स्वर्गवासी झालो असतो बहुधा, तेही कुणाच्या नकळत.

तस्मात् सावधान!

चित्रगुप्त's picture

19 Oct 2015 - 5:51 pm | चित्रगुप्त

तर्राट जोकर यांच्या वरील प्रतिसादाशी सहमत. मला पूर्ण वेळ मोकळा, दगदगीचे काम काही नाही, मुलगा स्वतः फिजियोथेरापिस्ट आणि या प्रकारचे प्रयोग स्वतः केलेले असलेला, असे असल्याने निश्चिंतपणे प्रयोग करता आला. सावधगिरीने वागणे बरे, पण थोडी हिंमतही करणे आवश्यक.
१५ दिवसांचा प्लान सूरु करण्याच्या एक आठवडाआधीपर्यंत एक सिमॉल प्याक प्लान करावा.... हे उत्तम. साखर, मैद्याचे पदार्थ वर्ज्य करावेत.
१५ दिवस जमत नसेल तर ७ दिवस करावे.

प्रसाद१९७१'s picture

19 Oct 2015 - 5:23 pm | प्रसाद१९७१

डॉक्टर खरे साहेबांचे ह्या पोटातुन निघणार्‍या सर्पा विषयी मत आणि माहिती वाचायला आवडेल.

डॉक्टरांनी त्या बाबतीत मौन च पाळले आहे असे दिसते.

सुबोध खरे's picture

19 Oct 2015 - 10:03 pm | सुबोध खरे

रस-आहारावर वीस दिवस
दुसरे दिवशी सकाळी ताजा रस काढून प्राशन केला, आणि मग दिवस भर भूक लागेल तेंव्हा रस, नारळपाणी पीत राहिलो. अधून मधून काही खावेसे वाटले, तर खजूर, केळे, एकादे फळ, भाज्यांचे सूप, उकडलेले अंडे, आणि अगदी फार वाटले तर तीन-चार दिवसातून एकदा थोडी खिचडी, एकादी भाकरी वा वरण-भात, थालिपीठ असे खात सुमारे वीस-पंचवीस दिवस काढले.
यानंतर मी जोमाने सायकलिंग, पोहणे, लांब चालायला जाणे, काही व्यायाम वगैरे करू लागलो

सुबोध खरे's picture

19 Oct 2015 - 10:04 pm | सुबोध खरे

मी गेली २४ वर्षे क्षकिरण तज्ञ म्हणून काम करीत आहे त्यात बेरियम एनिमा हि एक तपासणी येते. यात रुग्णाला प्रथम साधा एनिमा देऊन पोट साफ केले जाते त्यानंतर बेरियम सल्फेटच्या द्रावणाचा एनिमा दिला जातो आणी हा द्रव कुठपर्यंत जातो आहे कुठे अडकतो ई चे एकस रे घेतले जातात. इतक्या वर्षात कोणत्याही रुग्णाच्या पोटातून असा काळा सर्प बाहेर पडलेला नाही. शिवाय मी बर्याच एण्डोस्कोपी पाहिल्या आहेत ज्यात माझ्या आई आणी वडिलांचाही आणी अनेक नातेवाईक आणी रुग्णांचा समावेश आहे. यापैकी एकाच्याही मोठ्या आतड्यात असा काळा सर्प मला किंवा माझ्या माहितीतील कोणत्याही पोटाच्या विकाराच्या तज्ञाला आढळून आलेला नाही.
https://en.wikipedia.org/wiki/Mucoid_plaque
चित्रगुप्त साहेबांचा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे तो नाहीच असे मी कसे म्हणू शकतो. पण माझ्या अनुभवात असे कधीही आढळून आलेले नाही.
बाकी त्यांनी केलेल्या खालील गोष्टी सर्वानीच कराव्या अशा आहेत त्याबद्दल दुमत नाहीच.
रस-आहारावर वीस दिवस
दुसरे दिवशी सकाळी ताजा रस काढून प्राशन केला, आणि मग दिवस भर भूक लागेल तेंव्हा रस, नारळपाणी पीत राहिलो. अधून मधून काही खावेसे वाटले, तर खजूर, केळे, एकादे फळ, भाज्यांचे सूप, उकडलेले अंडे, आणि अगदी फार वाटले तर तीन-चार दिवसातून एकदा थोडी खिचडी, एकादी भाकरी वा वरण-भात, थालिपीठ असे खात सुमारे वीस-पंचवीस दिवस काढले.
यानंतर मी जोमाने सायकलिंग, पोहणे, लांब चालायला जाणे, काही व्यायाम वगैरे करू लागलो

चित्रगुप्त's picture

20 Oct 2015 - 2:21 pm | चित्रगुप्त

@एच्टूओ: अमेरिकेत नेहमी नवनवीन फॅड्स येत असतात, आणि त्यावर उलट-सुलट चर्चा, मतप्रवाह, त्या आधारे लाखो डॉलरांची उलाढाल वगैरे चाललेले असते. मी हा जो प्रयोग केला, तो याबद्दल उलट-सुलट मते न वाचता केला, आणि त्याचा अतिशय उत्तम परिणाम मला मिळाला. तुम्ही वर दिलेली लिंक अजून मी वाचलेली नाही. त्यात काय सांगितले आहे, हे थोडक्यात इथे सांगितले तर बरे होईल.

चित्रगुप्त's picture

20 Oct 2015 - 2:15 pm | चित्रगुप्त

'काळा सर्प' हे मी गमतीने दिलेले नाव आहे, परंतु त्यामुळे काहीतरी 'काळा, सॉलिड जीव' अशी कल्पना होते, तसे मात्र नाही. स्वयंपाकघराच्या सिंकच्या खाली पाणी वाहून नेणार्‍या प्लास्टिकच्या नळीतून जशी लांबट बुळबुळीत घाण निघते, तसे ते होते. मला वीसेक वर्षांपासून फिस्टुलाचा विकार होता, त्या अर्थी एवढ्या प्रमाणावर घाण साठून असणे सहाजीकच वाटते. दुसरे म्हणजे एरव्ही विष्ठा तुकड्या-तुकड्यात निघते, तसे न होता एकच एक लांब गुंडाळी सरसर निघाली, हे वेगळेच वाटले. (एक जिज्ञासा: बकरीच्या अगदी गोल, गुळगुळीत लेंड्या कश्यामुळे असतात ?)

चित्रगुप्तजी, अभिनंदन. फॅट, सिक, निअरली डेड हा शिनेमा पाहीन. मी त्यातील फॅट, सिक व निअरली डेड अशी नसले तरी तब्येत चांगली ठेवण्याविषयी आलेले लेख, चित्रफिती पाहते (व्यायामही नियमीत करते). तुमच्यासारखा प्रयोग करण्याचे धाडस अजून नाही कारण त्याने काही कमी जास्त झाले तर नस्ता उद्योग होऊन बसायचा असे वाटते. शिवाय हा आहार काही आमचा रोजचा आहार नसेल. मग काय करायचे? हा प्रश्न आहे.

प्रभाकर पेठकर's picture

19 Oct 2015 - 6:38 pm | प्रभाकर पेठकर

चित्रगुप्त साहेब,

तुमचा हा लेख ज्यांना, माझ्या सारखेच, वजन कमी करायचे आहे आणि जमत नाही अशा सर्वांसाठी, अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी आहे.

ते कृमी आणि कालसर्प अविश्वसनिय वाटते आहे तरी पण, तुमचा स्वानुभव असल्याकारणाने, हे का झाले असावे आणि फक्त तुमच्याच बाबतीत (फिस्तुला इतिहास) झाले की सर्वांच्याच पोटात असे कांही भयंकर वास्तव्यास असते अशा संभ्रमात मी आहे.
सामान्यतः आतड्यात गांठ वगैरे होऊन मलावरोध होतो आणि तदनुषंगाने इतर आजार होतात. त्यावर शस्त्रक्रियेने अशी गांठ दूर केली जाते आणि मार्ग मोकळा होतो असे पाहिले आहे. असो.

आता पंचांग पाहून, लवकरात लवकरचा 'मुहूर्त शोधून', आपण शिफारस केलेला आहार सुरु करायचा प्रयत्न करणार आहे.

विवेकपटाईत's picture

19 Oct 2015 - 7:35 pm | विवेकपटाईत

चित्रगुप्त साहेब, तुम्ही दिल्लीला परतला असाल तर, पुन्हा एखाद्या दिवशी भेटू. मलाहि वजन कमी करायचे आहे, आपला सल्ला उपयोगी पडेल.

चित्रगुप्त's picture

19 Oct 2015 - 8:25 pm | चित्रगुप्त

विवेकश्री, मी दिल्लीला २० नोहेंबरला परतणार आहे. त्यानंतर आपण पुन्हा महाराष्ट्र सदनात कट्टा करूया. आणखी जी मंडळी तिकड असतील, त्यांची माहिती तोपर्यंत काढून ठेऊया.
सध्या दिल्लीत लाल गाजरे, चुकंदर, पालक, मेथी, खीरा (हिरवा कंच अमेरिकन खीरा घ्या) किन्नोर सफरचंदे, नाग, बब्बूगोशा, देसी टमाटर, आवळे, सिमला मिर्च, दुधी भोपळा, मोसंबी, संत्री, अननस, द्राक्षे वगैरे सर्व उत्तम मिळत असेल, जूससाठी त्याचा लाभ घेणे सुरू करा.

मुक्त विहारि's picture

19 Oct 2015 - 8:02 pm | मुक्त विहारि

धन्यवाद....

ट्रेड मार्क's picture

19 Oct 2015 - 9:15 pm | ट्रेड मार्क

माझ्या अमेरिकन मित्रानी मला याचे बरेच फायदे सांगितल्यानंतर असाच उत्साहानी ज्यूसर घेवून आलो आणी रोज सकाळी भाज्या आणी फळांचा ज्यूस प्यायला सुरुवात पण केली होती. कशामुळे तरी खंड पडला आणि मग आता ज्यूसर नुसतीच जागा अडवून पडला आहे.

या निमित्ताने परत एकदा चालू करावे असं वाटतंय. संपूर्ण दिवस फक्त ज्यूस प्यायचं आत्ता तरी जरा अवघड वाटतंय. पण TJ नि दिलेल्या PDF मधील १५ दिवसांचे बघायला पाहिजे.

धन्यवाद चित्रगुप्त काका आणि TJ.

तर्राट जोकर's picture

19 Oct 2015 - 9:48 pm | तर्राट जोकर

प्रयोगासाठी अनेक शुभेच्छा! नीट प्लानिंग करून सुरुवात करा. कारण रोजचं कॅलरी इन्टेक शरिराच्या गरजेनुसार मॅच झालं पाहिजे. त्यामुळे हळू हळू सुरू करा. ज्युसिंगचा उद्देश बहुधा पचनसंस्थेवर ताण येऊ न देता आतड्यास उपास घडवणे असा काहीसा आहे असे वाटते. त्यामुळे रोजच्या आयुष्यासाठी आवश्यक इतकी उर्जा मिळेल इतकं पोटात जाणं आवश्यक अन्यथा सुगर वा इतर काही कमी पडून तब्बेतीवर परिणाम होऊ नये. जसा माझ्याबाबतीत झालं होतं ते बघता.....

खटपट्या's picture

19 Oct 2015 - 9:28 pm | खटपट्या

वजन तर कमी करायचे आहे. पण यामुळे काही उलट होउन दांड्या मारायला लागू नयेत असे वाटते आहे. रोजची कामे करायचीच आहेत. त्यामुळे कोणी जर फुल प्रूफ प्लान देत असेल तर सीरीयसली करायला तयार आहे.

ईथे कोणी विपश्यनेला जाउन आले आहे का? तिकडे रोजचा आहार अशाच प्रकारचा असतो असे ऐकीवात आहे. सरळ विपश्यनेला जावे काय?

कपिलमुनी's picture

19 Oct 2015 - 9:31 pm | कपिलमुनी

डायेटीशनकडे जावा

तर्राट जोकर's picture

19 Oct 2015 - 9:44 pm | तर्राट जोकर

विपश्यनेचा आहार हा त्या दहा दिवसाच्या जीवनशैलीला अनुसरुन आहे. तस्मात तो आहार रोजच्या धावपळीच्या जीवनात उपयोगाचा नाही. पण त्या दहा दिवसात त्वचेवर तजेला व शारिरिक हलकेपणा येतो. वजन खास कमी होत नाही. पण एकूण मानसिकतेवर खुप चांगला परिणाम होतो.

नाव आडनाव's picture

19 Oct 2015 - 9:58 pm | नाव आडनाव

ईथे कोणी विपश्यनेला जाउन आले आहे का? तिकडे रोजचा आहार अशाच प्रकारचा असतो असे ऐकीवात आहे.

आता काही बदल झाला असला तर माहित नाही (शक्यता कमी आहे), पण १० वर्षाआधी विपशना केली होती, तेंव्हा लेखात लिहिलेल्या पैकी काहीच नव्हतं तिथल्या रोजच्या आहारात.

चतुरंग's picture

19 Oct 2015 - 9:58 pm | चतुरंग

रोजच्या जीवनशैलीत जे बसवता येईल आणि सासत्य टिकवता येईल तेच करणे जास्त योग्य आहे.
एक सल्ला - वजन कमी करणे हे टारगेट ठेवू नका. सतत हालते रहा. बैठे काम असले तरी आवर्जून हालचाल करणे बघाच. म्हणजे लिफ्ट न वापरता जिन्याने जाणे, पाणी आपल्या ऑफिसमध्ये न भरुन ठेवता मुद्दाम लांबच्या नळावरुन आणणे, हाफिसातल्या हाफिसात ईमेल किंवा फोनवरुन सहकार्‍यांबरोबर होणारी कामे आवर्जून त्यांच्या ऑफिसात चालत जाऊन करणे. शिवाय घरापासून थोड्या अंतरावरची कामे चालत जाऊन करणे शक्य असेल तर तसेच करणे, सायकल जेव्हा सोयीची असेल तेव्हा वापरणे. किमान २५-३० मिनिटे व्यायाम रोज करणे. आणि मुख्य म्हणजे खाताना पोर्शन कंट्रोल. एका जेवणात समजा दोन पोळ्या खात असलात तर फक्त चतकोर किंवा शक्य असेल तर अर्धी पोळी कमी करा.
एवढ्याने काय फरक पडणार असे वाटते परंतु वजनही असेच हळूहळू वाढलेले असते हे आपण विसरतो:)आणि या सगळ्याचा पॉझीटिव साईडइफेक्ट म्हणजे वजन कमी होणे हा असतो!:)

द-बाहुबली's picture

20 Oct 2015 - 12:06 am | द-बाहुबली

विपष्यना अवश्य करा. अर्थात आपण म्हणता तसा आहार त्यात अजिबात नसतो पण इतर फायदे बरेच आहेत.

चित्रगुप्त's picture

20 Oct 2015 - 12:13 am | चित्रगुप्त

मी पंधराएक वर्षांपूर्वी विपश्यनेचा कोर्स केला, तो सहज, निर्हेतुक कुतुहलामुळे. मात्र त्यात माझी पाठदुखी बरी झाली ती आजतागयत. मात्र त्यानंतर मी एक दिवसही विपश्यना केलेली नाही. कोर्स मधे मात्र पूर्ण समर्पणाने केली.

सर्वांचे उत्तराबद्दल आभार...

विलासराव's picture

21 Oct 2015 - 1:04 pm | विलासराव

मी २०११ पासून रोज विपश्यना करतो. आताही मी ६० दिवसाच्या शिबिरात सेवा देतोय.
इथे सकाळी नाष्टा पोहे, शिरा, उपमा, साबूदाना खिचड़ी , ढ़ोकळा, खाकरा, ब्राउन ब्रेड, केळी आनी सीजनल फळे असा असतो. चहा आणि दुधही असते.
दुपारी कमी तिखट कांदा लसुन नसलेलया २ भाजी,डाळ् भात, चपाती, सॅलाड, रायता, ताक किंवा दही असे जेवण असते. संध्याकाळी ५ वाजता फक्त लिंबुपाणी असते.
प्रथमच १० दिवसाचा कोर्स करणार्यांसाठी संध्याकाळी चिवड़ा आणि चहा किंवा दूध असते.
विपशयना मुख्यता मन निर्मळ करण्याची साधना आहे. पण मनाचा शरिरावर खुप प्रभाव असल्याने मनाच्या आरोग्याचा शरीराच्या आरोग्यालाही फायदा होतो.

खटपट्या's picture

21 Oct 2015 - 1:17 pm | खटपट्या

धन्यवाद विलासराव...

चतुरंग's picture

19 Oct 2015 - 10:10 pm | चतुरंग

असे डाएट करायचे म्हणजे मनाचा पक्का निग्रह हवाच. तुमचे वय बघता तुम्ही हा उत्साह दाखवलात त्याबद्दल तुमचे अभिनंदन. आणि तुमचे अनुभव इथे मांडलेत त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
हे मला जमेल असे वाटत नाही परंतु दैनंदिनीमध्ये यातले काही प्रकार कसे बसवता येतील याचा विचार करु शकतोच.

चित्रगुप्त's picture

19 Oct 2015 - 10:29 pm | चित्रगुप्त

माझा मुलगा, ज्याच्यामुळे हा प्रयोग आम्ही केला, हल्ली महिनाभरापासून जूसिंग करतो आहे.सकाळी साडेसहाला तो ऑफिससाठी निघतो, त्यापूर्वी आमची सून त्याला दोन-तीन (काचेच्या) बाटल्यात एक हिरवे आणि एक लाल जूस ताजे काढून देते, ती स्वतःही दोन बाटल्या नेते, आणि आमच्यासाठीपण काढून ठेवते. ते दोघे घरी साडेचार-पाचला येतात, तो पर्यंत जूसवरच असतात. संध्याकाळी अगदी हलका आहार सर्वजण घेतो. शिवाय पुन्हा जूसही घेतो. पंधरा-वीस दिवसाच्या जूसिंग नंतर मुलाचा आळस दूर होऊन तो आता संध्याकाळी चार-पाच मैल धावू लागला आहे.
हे सांगण्याचा हेतु हा की करायचेच म्हटले, तर सर्व करता येते.

बघूयात आता यातले कायकाय जमवू शकतो ते. :)

चित्रगुप्त's picture

19 Oct 2015 - 11:58 pm | चित्रगुप्त

व्यनित जूसर कोणता वापरता, अशी पृच्छा झाली आहे, आम्ही खालील जूसर वापरत आहोतः
अमेरिकेत BREVILLE juicer
.
पॅरिस मधे: BRAUN juicer
.
भारतातः OSTER juicer
.

परंतु यापैकी भारतातील आता जुना झाल्याने नवीन घेणे आहे. जूसर घेताना तो ७००-८०० वॉट चा असावा. फिलिप्स बजाज वगैरेंचे चांगले नाहीत. दिल्लीत सरसकट सर्व जूस विकणारे 'सुजाता' चा वापरतात. त्यांचा जूसर दिवसभर चालत असतो. त्यामुळे हा ८१० वॉटचा घेण्याचा विचार आहे:
.
Model Sujata Powermatic Juicer Mixer Grinder
-Motor Heavy duty, universal type 810 watts

अगदी नाइलाज असेल तेंव्हा सोडून दिवसातून एकदा तरी जूस पीणे हे रोजच्या दिनक्रमाचे आवश्यक अंग होऊ शकले तर उत्तम.

प्रसाद गोडबोले's picture

21 Oct 2015 - 5:17 pm | प्रसाद गोडबोले

ओके

मी विचार करत होतोच की कोणता जुसर घ्यावा . आता सुजाताची चौकशी करतो . ( फ्लिपकारटं लय अव्वाच्या सव्वा रेट सांगतय . लोकल स्तोअर ला जाऊन विचारेन म्हणतो )

मोलाची माहिती अन प्रेरणादायी अनुभवकथन.

एक प्रश्न माझ्याकडून. इथे अमेरिकेत नेकेड जूस मिळतात जे पूर्णपणे नैसर्गिक असतात असा त्या कंपनीचा दावा असतो. घरी जूस बनवण्याला हे जूस पर्याय बनू शकतात का?

रेवती's picture

20 Oct 2015 - 2:08 am | रेवती

नाही.

श्रीरंग_जोशी's picture

20 Oct 2015 - 2:13 am | श्रीरंग_जोशी

उत्तरासाठी धन्यवाद.

नंदन's picture

20 Oct 2015 - 3:12 am | नंदन

'नेकेड ज्युस'मध्ये तब्बल ३० ते ४० ग्रॅम प्रतिपोर्शन साखर असते. शीतपेयांइतकी किंवा अधिकच. त्यामुळे त्यापासून दूर राहिलेलेच उत्तम.

श्रीरंग_जोशी's picture

20 Oct 2015 - 3:22 am | श्रीरंग_जोशी

पूर्वी अधून मधून प्यायचो. या वर्षी एक दोनदाच पिले असेल. त्याचा कॅलरी काउंटही हाय असतो.

चित्रगुप्त's picture

20 Oct 2015 - 12:28 pm | चित्रगुप्त

हल्ली अमेरिकेत ऑर्गॅनिक, ऑल नॅचरल, ग्रास फेड, ग्लूटेन फ्री, यूएसडीए सर्टीफाईड, बायो, वगैरे शब्द वापरून नवनवीन महाग उत्पादने विकण्याची चलती आहे. नेटफ्लिक्स वर यांची बिंगे उघड करणारे सिनेमेही आहेत. मोठमोठ्या कंपन्या सिनेटर्सना कटात सामील करून घेऊन कायदे सुद्धा बदलायला कसे लावतात, वगैरे बरेच काही आहे. यावर दीपक चोप्रांनी सोपा उपाय सांगितलेला आहे, तो म्हणजे कोणतेही 'पॅकेज्ड फूड' घेऊ नका. 'ऑनेस्ट वेट' मधे ज्वार-बाजरीच्या पीठापासून मध, विविध बिया, तेले आणी शेकडो प्रकारचे पदार्थ ताजे, सुट्टे मिळतात. ते घेणे बरे. जूस घरी केलेला ताजाच घ्यावा. फारतर काचेच्या बंद बाटलीत वरपर्यंत गच्च भरून फ्रीजमधे एकाद दिवस ठेऊन संपवावा.

श्रीरंग_जोशी's picture

20 Oct 2015 - 10:40 pm | श्रीरंग_जोशी

या माहितीकरता धन्यवाद. वरवर अंदाज होताच पण इतके नेमकेपणाने वाचले नव्हते यापूर्वी.

palambar's picture

20 Oct 2015 - 12:45 am | palambar

general motors co. ने त्यांच्या staff करिता सात दिवसांचा diet plan असाच केला होता,त्यात फळे, भाज्या इ सात दिवस ओळीने खायच्या आहेत , त्यात सुधा वजन चांगले कमी होते.

लंबूटांग's picture

20 Oct 2015 - 2:20 am | लंबूटांग

लग्नासाठी वजन कमी करायचे म्हणून.

तिला तरी खूपच फायदा झाला. पहिले काही दिवस तिला थोडा डोकेदुखीचा त्रास झाला पण नंतर अतिशय energetic वाटत होते. मी कधीपासून करेन करेन म्हणत आहे पण अजून तरी केले नाहीये.

चित्रगुप्त's picture

20 Oct 2015 - 6:28 am | चित्रगुप्त

जीएम डाएट मी पूर्वी दोनदा केले होते, तेवढ्यापुरते वजन कमी झाले होते, पुन्हा जैसे थे. फिस्टुला वर मात्र काहीही परिणाम झाला नव्हता.

कवितानागेश's picture

20 Oct 2015 - 6:19 am | कवितानागेश

असा आहार असताना दूध कितपत चालते हे कुणाला माहीत आहे का?
माझ्या अंदाजानी कफ वाढेल रसाहारात दूध घेतले तर.
अशाच प्रकारची शरीरशुद्धी , पोट साफ़ होणे हे कोरफडीच्या रसानी झालेले एकाकडून ऐकले आहे. त्याला ४ दिवस सकाळी १ लीटर रस पयाला लावला होता. बाकी दिवसभर हलका आहार, म्हणजे मऊ भात फ़क्त.

चित्रगुप्त's picture

20 Oct 2015 - 6:35 am | चित्रगुप्त

कोरफडीचा रस अतिशय कडू असणार, त्यामुळे तो 'प्यायला लावला' हे योग्यच. भाज्या-फळांचा रस अतिशय छान लागतो, मुख्य म्हणजे त्यात 'आपल्याला' हवी असणारी पोषकद्रव्ये भरपूर असतात, पण 'परजीवी कृमी' ची उपासमार होते. रंगिबेरंगी भाज्या-फळे आणणे, स्वच्छ करणे, जूस काढणे आणि पीणे हा सर्व एक आनंददायक सोहळा असतो. वेळात वेळ काढून लावून घ्यावा असा हा उपयोगी छंद आहे.

चित्रगुप्त's picture

20 Oct 2015 - 12:33 pm | चित्रगुप्त

रसाहाराचे दरम्यान दूध घेऊ नये.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Oct 2015 - 9:08 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

रच्याकने. रक्तशुद्धी आणि टवटवीत त्वचेसाठी कडुनिंबाचा रस कसा काम करतो? त्याचे दुसरे परिणाम होत असल्याने कधीतरी ४ महिन्यातुन एकदा घेतो. -_-

प्रदीप@१२३'s picture

20 Oct 2015 - 10:27 am | प्रदीप@१२३

धन्यवाद....

अनिता ठाकूर's picture

20 Oct 2015 - 10:53 am | अनिता ठाकूर

आपल्याला आलेला अनुभव सर्वांपर्यंत पोहोचविणारा आपला लेख अतिशय प्रेरणादायी आहे. आपण वेळोवेळी सर्वांना आवश्यक ते मार्गदर्शनहि केले आहे. तरीहि माझी एक विचारणा... १) भाज्या २) फळं ३) गाजर, काकडी, बीट ह्यासारख्या कोशिंबीर वर्गातील भाज्या..... ह्या सर्वांचा वेगवेगळा रस घ्यायचा , म्ह॑णजे फक्त भाज्यांचा, फक्त फळांचा ह्याप्रमाणे रस घ्यायचा की काहीहि एकत्र करून, वरून त्यात दही घालून वगैरे... असा रस घ्यायचा?

चित्रगुप्त's picture

20 Oct 2015 - 12:16 pm | चित्रगुप्त

@अनिता ठाकूरः जो क्रॉस यांचा मुख्य भर हिरवा रस घेण्यावर आहे. सुमारे २/३ भाज्या आणि १/३ फळे घ्यावीत, असे त्यांचे म्हणणे. जर दिवसभर रस घ्यायचा असेल, तर वेगवेगळी मिश्रणे करू शकतो. एकदाच घ्यायचा असेल, तेव्हा सर्व एकत्र करू शकतो. माझ्या माहितीप्रमाणे त्यात 'कोशिंबीर वर्ग' वगैरे काही नाही (बाकी आणखी कोणकोणते 'वर्ग' आहेत ? हे वर्गीकरण कोणत्या आधारावर केलेले आहे ?)
खालील दुव्यावर विविध जूसांच्या कृती मिळतीलः
http://www.rebootwithjoe.com/category/juice/
दही मिसळून करण्यासाठी मी जूसरमधून निघणारा वाटीभर चोथा काढून ठेवतो. त्यात केळे, एकादे फळ, वगैर घालून पातळ लस्सी/स्मूदी करतो.

निनाद's picture

20 Oct 2015 - 10:54 am | निनाद

जबरी आहे हा अनुभव.
करुन पाहिला पाहिजे एकदा

प्रकाश घाटपांडे's picture

20 Oct 2015 - 11:24 am | प्रकाश घाटपांडे

कालसर्प वियोग हा शब्दप्रयोग आवडला. अविश्वसनीय वाटावा असा आपला प्रेरणादायी स्वानुभव असल्याने विशेष वाटले.पोटाचे आरोग्य व तुमचा उत्साह याचा अतूट संबंध आहे. म्हणूनच आहार विहाराच गणित ज्याला जमत तो उत्साही व आरोग्यदायी असतो.

अनिता ठाकूर's picture

20 Oct 2015 - 12:58 pm | अनिता ठाकूर

@ चित्रगुप्त..उत्तराबद्दल धन्यवाद! दुवा पाहिला.

हेमंत लाटकर's picture

20 Oct 2015 - 11:16 pm | हेमंत लाटकर

छान लेख.

वाॅटर थेरपी सुद्धा चांगली असते.

चित्रगुप्त's picture

21 Oct 2015 - 12:44 am | चित्रगुप्त

वॉटर थेरॅपी बद्दल माहिती दिली तर उत्तम होईल.

प्रभाकर पेठकर's picture

21 Oct 2015 - 1:24 am | प्रभाकर पेठकर

वॉटर थेरेपी मी केली आहे.
हायपर अ‍ॅसिडिटी आणि अल्सर ह्या दोन्ही विकारांनी त्रस्त असताना, एका गुजराथी पेपरात वाचल्यानुसार, वॉटर थेरेपी केली होती.

सकाळी चार मोठे ग्लास (स्टीलचे उंच पेले) साधारण सव्वा ते दिड लिटर पाणी दात घासायच्या आधी प्यायचे. नंतर दात घासायचे पण दोन तास कांही खायचं प्यायचं नाही. अगदी चहाही नाही. चार-पाच वेळा लघुशंकेसाठी जावे लागते. दोन तासांनतंर तुम्ही चहा नाश्ता करू शकता.

तीन आठवड्यात अ‍ॅसिडिटीही गेली आणि अल्सरही गेला. आजतागायत काही त्रास नाही. पथ्यही फारसे कांही नाही. लागोपाठ जागरणं आणि मद्यपान टाळतो. नंतर सहा वर्षांनी सिगरेट सोडली.

सुबोध खरे's picture

21 Oct 2015 - 11:49 am | सुबोध खरे

बाकी सर्व ठीक आहे पण दात न घासण्याचे शास्त्रीय कारण सापडत नाही. रात्रभर तोंडात लाळ तयार होत नसल्याने तोंड साफ होत नाही तेथे जीवाणूंची वाढ होत राहते. (रुग्णालयातील रुग्णाच्या तोंडाला येणारा विशिष्ट वास हा अशा जीवाणुंच्या वाढीने येतो)
तोंड स्वच्छ न करता पाणी पिणे म्हणजे तोंडातील घाण परत पोटात ढकलणे आहे. मी माझ्या रुग्णांना स्वच्छ दात घासून पाणी प्या असा सल्ला देतो. फक्त त्यात १ लिम्बाचा रस आणि मधुमेह नसेल तर एक चमचा मध घालून थोड्याशा कोमट पाण्यातून प्यायला सांगतो. याचा पोटाचा विकार असणार्या बहुसंख्य लोकांना थोडा तरी फायदा होतोच. ज्याला हृदयाचा कोणताही आजार असेल त्याने मात्र आपल्या हृदयरोगतज्ञाला विचारूनच हा उपाय करावा.
सव्वा ते दीड लिटर कोमट पाणी ( लिंबू आणि मध घालून) प्यायल्यामुळे आतड्याला चालना मिळते. याचा बद्धकोष्ठ असलेल्या लोकांना फायदा होतो. रात्रभरात मूत्रपिंडे लघवी घट्ट(concentrate)/ संतृप्त करतात त्याचा निचरा भरपूर पाण्याने होतो.
वरील उपायाने माझ्या आजोबाना असलेली गंधर्व हरीतकी सारख्या रेचकाची जुनी आणि हट्टी सवय(२० वर्षाची) पूर्ण गेली.

प्रभाकर पेठकर's picture

21 Oct 2015 - 2:22 pm | प्रभाकर पेठकर

ह्या थेरपीत 'दात न घासता' ची अट का आहे हे मलाही माहीत नाही. पण आहे एव्हढेमात्र खरे. मी केले मला कांही त्रास झाला नाही. पाण्यात कांहीही न मिसळता घ्यायचे आहे. (लिंबू-मध- मीठ काही नाही) पाण्याला फुड व्हॅल्यू कांही नसल्याकारणाने पोटात जे अतिरिक्त आम्ल उतरते ते हळू हळू कमी होते. आणि अ‍ॅसिडिटी जाते. थोडक्यात पोटाला कमी अ‍ॅसिड्स रिलिज करण्याची सवय लागते. असे त्या लेखात म्हंटले होते.
पाण्याने इतरही अनेक फायदे होतात. जसे शरीरातील पाण्याचा समतोल राखला जाऊन हातापायाची, डोळ्यांची जळजळ थांबते, मलावरोध कमी होतो, मुत्रपिंडेही स्वच्छ राहतात. मुतखड्याचा त्रास होत नाही. वगैरे वगैरे अनेक फायदे, कांही विश्वसनिय कांही अविश्वसनिय, त्यात सांगितले होते. मला अ‍ॅसिडिटीवर हिस्टॅक गोळ्या डॉक्टरांनी सुरु केल्या होत्या. 'जर खाण्यापिण्याच्या सवयी नाही बद्दलल्या तर ह्या गोळ्या जन्मभर घ्याव्या लागतील' अशी भितीही घातली होती. पण वरिल वॉटर थेरपीने सर्व व्याधी दूर होऊन सवयी कांही बदलाव्या लागल्या नाहीत. ही ९६ची कथा आहे. पुढे वयोपरत्वे सिगरेट सुटली, मद्यपानही आटोक्यात आहे, जागरणंही कमी झाली. तिखट खाण्याची आवड अजूनही आहे. व्हेज-नॉन व्हेज दोन्ही चालू आहे. हिस्टॅक घरात असतात पण कधी घ्याव्या लागत नाहीत.

मांत्रिक's picture

21 Oct 2015 - 3:11 pm | मांत्रिक

पेठकर साहेब, वॉटर थेरपीविषयी अतिशय उत्तम अनुभवी माहिती दिलीत. धन्यवाद.

हेमंत लाटकर's picture

21 Oct 2015 - 8:40 am | हेमंत लाटकर

पेठकर तुम्ही वाॅटर थेरपी विषयी सांगितलेली माहिती बरोबर आहे.

बोका-ए-आझम's picture

21 Oct 2015 - 9:12 am | बोका-ए-आझम

यांचे मन:पूर्वक आभार. पेठकरकाका, वाॅटर थेरपीबद्दल जरा सविस्तर सांगा ना!

चित्रगुप्त's picture

21 Oct 2015 - 12:16 pm | चित्रगुप्त

वॉटर थेरॅपी मधे फक्त सकाळी पाणी प्यायचे एवढेच आहे? मग दिवसभर वाट्टेल ते वाट्टेल तितके खा? असे नसावे. जरा जास्त माहिती देता का?

तर्राट जोकर's picture

21 Oct 2015 - 1:04 pm | तर्राट जोकर

माझ्या वडीलांनी वॉटर थेरपी केली होती. त्यात पेठकरांनी सांगितल्याप्रमाणेच सकाळी दात न घासता साधे (थंड नाही) पाणी पिणे होते. त्यासोबत दोन्ही वेळ जेवणाआधी अर्धातास एक पेला व जेवण झाल्यावर अर्धा तासांनी एक पेला पाणी प्यायचे होते. हे त्यांचे वय ४० असतांना केले होते. पंधरा दिवसात त्यांच्या शरिरात उत्साह, उर्जा, शक्ती वाढली होती. चालण्याचा मोठा पल्ला मारतांना आधी दम लागून यायचा. तो बंद झाला. नंतर त्यांनी सातत्य ठेवले नाही. पण थेरपी म्हणून एवढेच केल्याचे आठवते, बाकी काही पथ्य नव्हते. वडीलांना इतर व्यसने, किंवा अनियमित जीवनशैली असे काही नव्हते. त्यामुळे व्यसने व जीवनशैलीच्या पथ्याबाबत सांगू शकत नाही.

तोंडातले जीवजंतू पोटात जाणे वाईट असते हे डॉक्टरांनी सांगितले. मुखारोग्याबद्दल वैद्यकिय अधिकारातल्या लोकांच्या ज्ञानाचा अधिकार मान्य असल्यामुळे त्याला फाटे फोडायची गरज वाटत नाही. पण लाळेसोबत २४ तास ते जीवजंतू पोटात जातच असतात. त्याबद्दल अधिक माहिती वा खुलासा मिळाला तर शंकानिरसन होईल.

सुबोध खरे's picture

21 Oct 2015 - 1:18 pm | सुबोध खरे

लाळ हि जागतेपणी तयार होत असते आणी ती सतत गिळली जात असते त्यामुळे तोंडात असलेल्या जंतूना वाढ होण्याचा वेळच मिळत नाही. दर काही मिनिटांनी ते पोटात ढकलले( गिळले) जातात आणी पोटातील आम्लाने त्यांचा खात्मा होतो. रात्री झोपता तेंव्हा लाळ घशात जाऊ नये म्हणून तोंडात लाळ तयार होण्याची प्रक्रिया थांबते. त्यामुळे सकाळ पर्यंत तोंडात वाढलेल्या जंतूंचे प्रमाण बरेच जास्त असते. म्हणून सकाळ झाल्यावर सर्वप्रथम तोंड धुणे हे आवश्यक आहे. इंग्रजी प्रकार बेड टी सारखा अनारोग्यकारक प्रकार दुसरा नसेल.

तर्राट जोकर's picture

21 Oct 2015 - 2:34 pm | तर्राट जोकर

धन्यवाद!

बेड-टी हा प्रकार चित्रपटात बघितल्यापासूनच विचित्र वाटत आलाय. त्यांच्या हवामानाआधारित सवयींमुळे त्यांना ते योग्यही वाटत असेल.

सहमत आहे.दात न घासता पाणी पिणे म्हणजे रात्रभर पोसलेल्या जंतूंना पोटात ढकलणे होईल.या जंतूंची एक पातळ फिल्म रात्रभरात दात जीभ यांवर तयार होते.तिला प्लाक म्हणतात.त्यामुळेच सकाळी उठल्यावर तोंडात अस्वच्छ वाटत असते.आणि दात घासल्यावर फ्रेश वाटते.त्यामुळे कोणत्याही कारणाने दात न घासता उठल्या उठल्या पाणी पिऊ नयेच.

यावरून एक म्हटली तर सवांतर, म्हटली तर अवांतर शंका:

गेली हजारो वर्षे लोक दात न घासताही निवांत राहिले कारण तेव्हा ते जे अन्न खायचे तेच जणू फिल्टरसारखे काम करायचे, शिवाय त्यात साखर वगैरे घटक नव्हते त्यामुळे चालून गेले वगैरे वगैरे....

सो ही जंतूंची पातळ फिल्म त्यांना त्रासदायक होत नव्हती का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Oct 2015 - 5:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

गेल्या २५ लाख वर्षांतले आदीमानवाचे व मानवाचे आयुर्मान (लाईफ एक्पेक्टन्सी) २० ते फारतर ४० वर्षे इतकेच राहिले आहे. आधुनिक मानवाच्या झपाट्याने होणार्‍या इतर विकासाबरोबरही ते फारसे वाढलेले दिसत नाही. मात्र, गेल्या शंभर एक वर्षांत त्यात खूप मोठी (५० टक्क्यांपेक्षा जास्त) वाढ झाली आहे. त्याचे मुख्य श्रेय आधुनिक शरीरशास्त्रामधील संशोधन आणि पर्यायाने आरोग्यदायक सवयींसंबंधी वाढलेल्या आकलनाला जाते. या आयुर्मानवाढीत जंतूशास्त्र आणि त्याअनुषंगाने विकसित झालेल्या औषधशास्त्राचा सिंहाचा वाटा आहे.

खालील टेबल पाहून ही कालरेखा अजून नीट ध्यानात येईल...


संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Life_expectancy
(जालावरून साभार)

प्यारे१'s picture

21 Oct 2015 - 6:03 pm | प्यारे१

यावरुन आठवलं.
रात्री दात घासून झोपणार्‍या लोकांना हृदयविकाराचा त्रास देखील कमी होतो/असतो असं वाचलं आहे.
खरं आहे ना?

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Oct 2015 - 6:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

होय.

तोंडातील (घसा, दात आणि हिरड्या) जंतूंपासून होणार्‍या हृदयविकारांमध्ये "हृमॅटिक हार्ट डिसिज" हा एक महत्वाचा गट आहे. तुलनेने तरुण वयात होणार्‍या या आजारात, हृदयाच्या झडपांना इजा होऊन त्या कायमच्या निकामी होऊ शकतात. सुधारलेल्या सर्वसाधारण दंताआरोग्यामुळे आणि दंतकर्माच्या (डेंटल प्रोसिजर्स) अगोदर दिल्या जाणार्‍या अँटिबायोटिक्समुळे या आजाराचे प्रमाण खूप कमी होत आले आहे.