बॉडी डबल

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
30 Oct 2010 - 2:37 pm

बॉडी डबल हा शब्द पहिल्यांदा वाचनात आला तेव्हा माझ्यासारखे जे बोडीने डबल आहेत त्यांच्यासाठी हा शब्द वापरत असावेत असा माझा ग्रह झाला होता. मंदाकिनिचा कुठलातरी चित्रपट होता आणि मित्राने सांगितले बॉडी डबल आहे. मी असले चित्रपट का बघतो असे विचारु नका. असाही हा प्रश्न विचारायचा हक्क फक्त असले चित्रपट न बघितलेल्या लोकांना आहे. (हे अकबर बिरबलाची गोष्ट आहे ना की मोत्यांना हात लावायचा हक्क फक्त वारा न सरलेल्या माणसांना आहे त्या धर्तीवर वाचावे) अस्मादिक बराच काळ विचारात पडले होते की मंदाकिनी काही इतकी डबल नाही आहे. मग मित्रानेच खुलासा केला की पडद्यावर काही अभिनेत्री (???) आपण करु नये (आणि लहान मुलांनी पाहु नये) असले काही प्रकार करतात तेव्हा त्यांच्याऐवजी दुसरीच कुठलीतरी बाई (किंवा बाबा) हे सगळे करते. आणि आपल्याला सगळा प्रकार त्या अभिनेत्रीच्या नावावर खपवला जातो. किती भयावह प्रकार आहे बघा. समोर तुम्ही झीनत अमानला (काळानुरुप तुम्ही वेगवेगळ्या बायांना बघत असता. माझ्या डोळ्यासमोर माझ्या जन्माच्या आधीपासुन चित्रपटात मुलांनी पाहु नये असे दाखवत आलेली झीनत अमान का आली या प्रश्नाला काही उत्तर नाही) बघत असता आणि प्रत्यक्षात ती झीनत अमान नसुन कोणितरी स्पॉट बॉय असतो किंवा असु शकतो. अर्रे किती हरामखोरपणा कराल. किती खोटारडेपणा कराल. समोर चित्रपटरसिकांनी बांधलेले स्वप्नांचे इमले त्या स्पॉट्बॉयसाठी बांधलेले असतात का? उद्या त्या तुमच्या स्वप्नात झीनत अमान नसुन प्रत्यक्षात तो स्पॉटबॉय आहे अशी कल्पना करुन बघा . आवडेल का ? (आवडली तर तुम्ही २५% येता असे समजुन चाला).

मुळात हा बॉडी डबलचा संभावितपणा मला पटत नाही. दाखवता ते दाखवता. तुमच्याच नावावर खपते ना ते. बये तुला बघितल्यावर लोकं हीचे ती "त्या" प्रसंगातली असे म्हणतात ना? मग हे नाटक कशाला? आमची उर्सुला अँड्रेस बघा. ती असली नाटकं करायची नाही. तिने बिनधास्त सगळे प्रसंग स्वतः केले. (महत्वाची माहिती आहे ना?). किंवा मग सुकन्या कुलकर्णीचा आदर्श ठेवा. तिने जिगर चित्रपटात तिच्या बॉडी डबल ने असले काही प्रसंग करण्यास ठाम विरोध केला. लोकांना शेवटी मीच दिसणार ना? किती लोकांना सांगत फिरु की ती मी नाही म्हणुन? आणी का? असा रोखठोक प्रश्न तिने विचारला आणि शेवटी ते प्रसंग चित्रपटातुन उडाले (म्हणजे ष्टोरीची डिमांड वगैरे असली फुटकळ कारणे पण चुकीचीच म्हणायची)

पण आता काळ बदलला आहे. आता अभिनेत्रींना बॉडी डबल लागत नाही. हिरोने जसेजसे विनोदी अभिनेत्याचे काम पण शिरावर घेतले तसे हिरोइनीने हेलनचे काम "अंगावर" घेतले. आता परत आयटम्सचे फॅड येते आहे. पण मुख्य अभिनेत्रींनी 'अंग'भूत'कौशल्ये दाखवण्याचे काम सोडले नाही आहे. आता बॉडी डबलची गरज पडत नाही. मागच्याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या (आणि त्याच आठवड्यात बाजार उठलेल्या) हिस्स मध्ये म्हणे सगळे प्रसंग मल्लिकाने स्वत: केले आहेत (तिने करो नाही तर बॉडी डबल ने करो कोणाला फरक पडतो).

एकुणात आता बॉडी डबलचा जमाना गेला असाच आमचा समज झाला होता. आता हा शब्द ऐकु येणार नाही असा आमचा समज झाला होता. पण तो नुकताच साफ चुकीचा ठरला. म्हणजे अभिनेत्रींनी बॉडी डबल वापरण्याचा जमाना गेला. जित्या जागत्या माणसाच्या बॉडी डबलचे कोणाला कौतुक नाही. जित्या जागत्या माणसाचेच कोणाला कौतुक नाही. आता प्राण्यांचेच बॉडी डबला यायला लागले आहेत.

सोमवारी मृत म्हणुन जाहीर केलेला प्रख्यात भविष्यवेत्ता पॉल ऑक्टोपस म्हणे प्रत्यक्षात ३ महिन्यांपुर्वीच येशुच्या घरी रवाना झाला होता. ३ महिन्यांपुर्वी म्हणजे फिफा वर्ल्ड कप च्या अंतिम सामन्याच्या २ दिवस आधी. आणि ही बातमी म्हणे हेतुपुरस्सर पॉलच्या चाहत्यांपासुन दडवुन ठेवण्यात आली होती. जियांग झिओ (आयला या चिन्यांची नावे पण डेंजर असतात राव) या महिलेने हा सनसनीखेज खुलासा (आरोप) केला आहे. तिच्या म्हणण्याप्रमाणे तिला ६०% ते ७०% खात्री आहे की पॉल जुलैमध्येच परमात्म्यात विलीन झाला. आता खात्री ६० ते ७० % अशी कशी काय कॅलक्युलेट करता येते हे त्या झिओलाच महिती. झिओच्या म्हणण्याप्रमाने पॉल ९ जुलैलाच मेला. म्हणजे अंतिम सामन्याचे भाकीत करणारा पॉल नव्हताच तर त्याचा बॉडी डबल होता. जर्मनीच्या ज्या सी लाइफ अ‍ॅक्वेरियम मध्ये पॉल होता त्याच्या चालकांनी हा सगळा बनाव घडवुन आणला आणि लोकांची दिशाभूल केली म्हणे.

आता झिओला या गोष्टीचा साक्षात्कार आत्ताच का झाला किंवा तिने ही गोष्ट लोकांना ३ महिन्यांनी का सांगितली हे देवच जाणो. पण एवढे खरे की तिच्या या साक्षात्कारानंतर प्राण्यांच्या बॉडी डबल ला बराच भाव येणार आहे. काय कल्पना कदाचित प्राणिसंग्रहालयातील एखादे प्रसिद्ध माकड आता २००-३०० वर्षे न मरता जगु शकेल. केरळच्या एखाद्या मंदिरातील "सुंदर" नावाचा देवाच्या पालखीचा मान मिरवणारा हत्ती आता अमर होउ शकेल. सिंगापूरमधला मणी पोपट अजुन जिवंत आहे का?

बाकी जाताजाता एक गोष्ट सांगायची राहुनच गेली

बाकी जाताजाता एक गोष्ट सांगायची राहुनच गेली जियांग झिओ कोण म्हणुन विचारता? अहो "Who killed Paul the Octopus" या नावाच्या प्रदर्शनाच्या मार्गावर असलेल्या चित्रपटाची दिग्दर्शिका आहे ती. :)

प्रेमकाव्यप्रतिशब्दबालगीतभाषाविनोदवाङ्मयशब्दक्रीडासमाजमौजमजाचित्रपटप्रकटनविचारप्रतिसादबातमीअनुभवआस्वादभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

मी-सौरभ's picture

30 Oct 2010 - 2:42 pm | मी-सौरभ

आवडेश :)

परिकथेतील राजकुमार's picture

30 Oct 2010 - 2:52 pm | परिकथेतील राजकुमार

ज ब र्‍या तडातड फटाके फोडलेत भौ.

दिवाळीच्या मुहुर्तावर एकदम खमंग लेखन वाचायला दिल्याबद्दल धन्यवाद.

मागच्याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या (आणि त्याच आठवड्यात बाजार उठलेल्या) हिस्स मध्ये म्हणे सगळे प्रसंग मल्लिकाने स्वत: केले आहेत (तिने करो नाही तर बॉडी डबल ने करो कोणाला फरक पडतो).

ती स्वतःचेच काय इतर हिरवणींची बॉडी डबल म्हणुन देखील काम करायला तयार होईल.

धमाल मुलगा's picture

1 Nov 2010 - 4:02 pm | धमाल मुलगा

अगदी अगदी! :D

मस्त कलंदर's picture

30 Oct 2010 - 4:15 pm | मस्त कलंदर

सही झालाय रे लेख.. मला पण बॉडी डबल म्हणजे असलेच काहीतरी वाटायचे.आताशाच ते काय असते याचे ज्ञान मिळाले आहे.

बाकी, आज पेपरवाल्याने चुकून मुंबई मिरर दिलाय. त्यातली बातमी: Priyanka is too fit to fit the role. अडतीस वर्षांच्या बाईचा रोल करण्यासाठी ती खूपच तरूण दिसतेय म्हणून तिने त्यासाठी बॉडी डबल वापरलीय म्हणे.

पैसा's picture

30 Oct 2010 - 7:21 pm | पैसा

काही नटनट्यांच्या बाबतीत मात्र ते पडद्यावर सुद्धा का आहेत असा प्रश्न पडतो...

पॉल ऑक्टोपस ला लोक कसं काय ओळखू शकतात जरा नवलच वाटतं. आम्हाला कोणत्याही ऑक्टोपसचा फोटो दाखवून "हा पॉल" असं सांगितलं तर काय कळणार आहे?

सविता's picture

1 Nov 2010 - 4:52 pm | सविता

खुसखुशीत लेख!!!

छोटा डॉन's picture

1 Nov 2010 - 5:06 pm | छोटा डॉन

येकदम क-ड-क लेख.
मजा आली बॉस.

>>(तिने करो नाही तर बॉडी डबल ने करो कोणाला फरक पडतो).
+१, सहमत.
काय फरक पडतो ?

हॅप्पी दिवाली शेठ, येऊद्यात असेच अजुन.

- छोटा डॉन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Nov 2010 - 5:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चान चान!

(अवांतरः खरंतर मृत्युंजय कंपूतला नाही पण कंपूतले सगळे त्याच्याशी खर्डाखर्डी करतात म्हणून मलाही "चान चान" म्हणावं लागतंय! नाहीतर माझ्या खरडी-प्रतिक्रिया लिहीण्यासाठी डबल वापरावी लागायची!)

मृत्युन्जय's picture

2 Nov 2010 - 9:45 am | मृत्युन्जय

ही कंपुत प्रवेश करण्याची पुर्वतयारी असते का? म्हणजे काय मी स्वतः, माझा डबल अश्या सगळ्या प्रकारे खरडी टाकतो कंपुला. तेवढ्याच ४ प्रतिक्रिया जास्त. ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Nov 2010 - 10:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मेल्या, कंपूत प्रवेश कसा करायचा हे सगळं उलगडून इथेच सांगितलं तर पर्‍या किंवा डॉन्या लेख कशावर लिहीणार? त्यापेक्षा तू तुझ्या डब्बल साईझ खरडी सुरू ठेव! ;-) आणि त्याहीपेक्षा मुख्य असे दणदणीत लेख सुरू ठेवच ठेव.

मृत्युन्जय's picture

2 Nov 2010 - 10:03 am | मृत्युन्जय

पराकडे शिकवणी लावेन म्हणतो. :)

प्रियाली's picture

1 Nov 2010 - 5:18 pm | प्रियाली

लेख आवडला. :)

स्वाती दिनेश's picture

1 Nov 2010 - 6:32 pm | स्वाती दिनेश

लेख आवडला, खुसखुशीत!
स्वाती

शिल्पा ब's picture

1 Nov 2010 - 11:43 pm | शिल्पा ब

खुस्खुशीत..