वर्तुळ......

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
24 Aug 2019 - 4:44 pm

हजारो वर्षांची संस्क्रुती असलेल्या आपल्या भारतात कर्तबगार स्त्रीयांची वानवा कधीच नव्हती. पुराणकाळात ज्यांनी वेद्याध्ययन केले अशा गार्गी आणि मैत्रेयी आणि गणीत शिकणारी लिलावती तसेच द्रौपदी तारा मंदोदरी अहिल्या सीता या पंचकन्या अशी फार जरी नसली तरी उदाहरणे आहेत. राज्यकारभाराचे धडे देवून एक आदर्श राजा घडवणार्‍या जिजाऊसाहेब, लढवय्यी झाशीची राणी , गोरगरीबांचे जीवन सुकर करणार्‍या अहिल्या देवी होळकर , या स्त्रीयांनी एक इतिहास घडवला.
एक काल असा होता की मुलगी जन्माला येणे हेच मुळी अपषकुनी मानले जायचे. स्त्री अर्भक जन्माला आल्याआल्याच दुधात बुडवून मारले जायचे.मुलींचे संगोपन ,त्यांचे शिक्षण या तर पुढच्या गोष्टी. यातून वाचलेल्या स्त्रीयांचे पतीच्या निधनानंतर सती च्या नावाखाली जिवंतपणी पुन्हा मरण ओढवायचे. जिवंतपणीच आगीत होरपळून मरावे लागायचे समाजाचा रोष पत्करुनदेखील राजा राम मोहन रॉय यानी सती प्रथेविरुद्ध आवाज उठवून स्त्रीयांना जगण्याचा हक्क मिळवून दिला. त्याच्या पुढे जावून ज्योतिबा आणि सावित्री बाई फुल्यांनी स्त्रीयांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला.
ज्या समाजातल्या स्त्रीया शिकल्या त्या समाजाची उन्नती झाली.
आजच्या अधुनीक भारताला घडवताना स्त्रीया प्रत्येक क्षेत्रात कर्तबगारी दाखताना दिसतात. ब्रीगेडीयर प्रमिला वाड , वाईस अ‍ॅडमिरल पुनीता अरोरा , गणीतज्ञ मंगला नारळीकर , भारताच्या मंगळयान मिशनच्या डेप्यूटी डायरेक्टर नंदीनी हरीनाथ , अग्नी मिसाईल प्रोजेक्ट मधे महत्वाचा सभाग असलेल्या मिसाईल लेडी म्हणून ओळखल्या जाणार्‍या टेसी थॉमस, मायक्रोवेव्ह इंजीनीयरींग मधे १००वर रीसर्च पेपर्स लिहीणार्‍या राजेश्वरी चॅटर्जी , भारताच्या पहिल्या अंटार्क्टीका मोहीमेवर जाऊन ओशनोग्राफर अदिती पंत , किरण बेदी. भारताच्या आयर्न लेडी पंतप्रधान इंदीरा गांधी , राष्ट्रपतीपद भूषवणार्‍या प्रतीभाताई पाटील , ऑलींपीक मधे भारताची मान उंचावणारी पी टी उशा . बाबा आमटेंच्या तितकेच मोलाचे काम करणार्‍या साधनताई आमटे, मंदाताइ आमटे , अनाथांची माऊली होणार्‍या सिंधुताइ सपकाळ, खेळात जगात नाव उंचावणार्‍या सायना नेहवाल , सानीया मिर्झा , उद्योग जगतात अनु आगा, उद्योग रत्न लीला पुनावाला, वंदना लुथ्रा , किरण मझुमदार अशा अनेक स्त्रीया या समाजात दिसतात.
एकीकडे समाजात हे चित्र दिसत असले तरी दुसरीकडचे चित्र विदारक आहे. ज्या समाजातील मुली शिकल्या तो समाज सुधारला असे म्हणत असलो तरी अनेक ठिकाणी अजूनही मुलींची अवस्था बिकट आहे. त्या स्त्रीया आहेत म्हणून , सामाजीक रुढी परंपरा या मुळे त्यांचा आजही बळी जातोय. आपणएक समाज म्हणून कितीही स्वतःला सुधारलेले म्हणत असलो तरीही हे वास्तव आहे. आ[अण अजूनही त्याच वर्तुळात जगतो आहोत. आजही कित्येक ठिकाणी मुलीना शिक्षणाच्या नावाखाली जुजबी शिकवले जाते आणि समाजाच्या चालीरीती मुळे दडपणाखाली वयात यायच्या आतच याच्या अवघ्या दहाव्या बाराव्या वर्षी त्यांचे लग्न लावले जाते. तीचे शिक्षण बंद होते तीच्यावर मातृत्व लादले जाते. पुढच्या सगळ्याच गोष्टींचा त्या बलात्कारात बळी दिला जातो.
ही हत्याच नाही का? तेही आईबापाच्या सम्मतीने केलेली. हा रानटीपणा आपण हे कुठे थाम्बवणार आहोत?
त्या कळ्यांना नैसर्गीकपणे फुलूच दिले जात नाही. नुकत्या कुठे अंकूर फुटायला लागतो आणि कळ्या खुडल्या जातात. उडायला शिकत असतानाच पंख छाटले जातात
एकीकडे आकाशाला गवसणी घालणार्‍या कर्तबगार स्त्रीया आणि दुसरीकडे आईबापांकडूनच साधं सोप्पे जगणंही नाकारल्या जाणार्‍या या मुली… हे दोन वेगळे भारत आहेत असे नाही वाटत?
. या दोन भारतां मधली दरी आपण कधी बुजवणार आहोत. या पाखरांना मोकळ्या आकाशात गवसणी घालता यावी म्हणून यांच्या पंखात बळ देणार आहोत का?
हे वर्तुळ आपण कधी तोडणार आहोत का?

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

याची काळजी घेणेहि तितकेच आवश्यक.

जालिम लोशन's picture

24 Aug 2019 - 10:38 pm | जालिम लोशन

भोवतालच्या परिस्थितीचा तो परिणाम असतो.