ऐन पावसाळ्यातला माळशेज घाट. बाकीचे मित्र मैत्रिणी इथे तिथे पांगले होते . मस्त हिरव्यागार धुक्यात ती आणि मी दोघे चाललो होतो. एका जलाशयाच्या काठच्या दगडावर जागा बघून आम्ही दोघे बसलो. त्या पाण्यावर पण धुक्याचा हलकासा तवंग पसरला होता. अचानक ते धुकं दाट होऊन आमच्या अवतीभोवती पसरलं . दुरून पावसाचा आवाज ऐकू येत होता. मंजुळ पाय वाजवत तो पाऊस हलकेच जवळ येऊन आम्हाला मिठीत घेतो. त्या गर्द धुक्याच्या मिठीमध्ये मी, ती, तो जलाशय आणि फक्त आमच्या करता पडत असलेला पाऊस. ती माझ्या जवळ होती पण आणि नव्हती सुद्धा. एकमेकांच्या हृदयाची धडधड त्या पावसाच्या आवाजात मिसळून गेली होती.
अरे काय हे ?
पावे मराठी ;) :)
पहिल्या धारे ची....12 years old blended
In reply to पहिल्या धारे ची....12 years old blended by कर्नलतपस्वी
नवकवी हळवे असतात असा अनुभव
In reply to पहिल्या धारे ची....12 years old blended by कर्नलतपस्वी
आणखी तपश्चर्या
पावे मराठी - भावार्थ
भावार्थ लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद, भावना पोचल्या.
In reply to भावार्थ लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद, भावना पोचल्या. by कर्नलतपस्वी
आभारी आहे
पुढील रचनेच्या प्रतिक्षेत