मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भोंडला खेळू

Bhakti ·
अ सखे फेर धरू ...गरागर जात्यावर दळण फिरे... गरागर पीठाचे मांडे करू...भराभर चुलीसाठी सरपण शोधू ...भराभर रानातून सरपण आणू... झरझरा अशी पावले टाकू...झरझरा रानात गवत पसरले...दूरवर मागे फिरू ,घर राहिले...दूरवर घरी पिल्लांचा लाडिकपणा...मनभर चिमणीच्या चोचीत दाणा...मणभर दाणे जवारीचे उडाले...

माझ्या संग चांदणं ही...

Deepak Pawar ·
“माझ्या संग चांदणं ही” हे माझं नवं गाणं रिलीज झालं आहे. एकदा नक्की बघा आणि गाणं कसं वाटलं सांगा. https://youtu.be/wFyTCuCXdPs?si=u2k7pzivz-u5yW9i सपनानं तुझ्या मन रातभर व्यापलं माझ्यासंग चांदणं ही रातभर जागलं कंकण आवाज पैजणाचं नाद रातभर घुमे सखे तुझी साद असं कसं राती मला आगळच वाटलं. माझ्यासंग चांदणं ही रातभर जागलं. नभातला चांद सखे तुझ्यावानी वाटला तुझा श्वास गंध साऱ्या रानीवनी दाटला दाटला सुगंध वाऱ्यातून येई गंधाळून मन सखे माझं जाई गंध तुझ्या पिरतिचं रातभर दाटलं.

मिपा दिवाळी अंक २०२४ - आवाहन

साहित्य संपादक ·

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आग्या१९९० 07/10/2024 - 13:07
प्रमाण भाषा सोडून रांगड्या, पांढरपेशांना अश्लील वाटू शकणाऱ्या आपल्या बोलीभाषेत लिहिणाऱ्या मिपाने उडविलेल्या आयडींचे सदस्यत्व पुनर्जीवित करावे. मिळमिळीत शृंगारिक लेखात मजा नाय.

चौथा कोनाडा 06/10/2024 - 18:11
व्वा... आलं एकदाचं निवेदन. चावट शृंगार कथा.. लै भारी विषय... कोण कोण काय काय लिहितेय याची उत्सुकता आहे. सर्व सहभागी लेखकांना लेखानासाठी भरभरून शुभेच्छा. या वर्षी मिपा दिवाळी अंक येणार की नाही ही चिंता आणि अनिश्चितता संपली... ऑल डी बेस

नठ्यारा 06/10/2024 - 22:52
आयशप्पत, हे कसं शक्यंय ?
अर्थात ह्या लेखन विषय विभागासाठी पाठवलेले लेखन बीभत्स किंवा अश्लीलतेकडे झुकणारे नसावे ही एकमेव अट आहे ह्याची नोंद घ्यावी.
हे म्हणजे दारू प्यायला हवीये, पण इथेनॉल नको. ऐसा कैसा चलेगा भिडू ? इथेनॉल नायतर मिथेनॉल थोडंच पिणार ? -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

चौकस२१२ 08/10/2024 - 14:18
दारू ढोसणे = अश्लील बीभत्स दारूचा आस्वाद घेणे = शृंगारिक / मादक जयंत दळवीनचच्य्या कथेतील कामुकता किंवा आरती प्रभूंचं कथेतील कामुकता आणि पिवळी पुस्तके यतिल फरक जो तोच शृंगारिक , मादक = आज पहाटे श्रीरंगाणने मजला पुरते लुटले ग साखरझोपेमध्येच अलगद प्राजक्तासम टिपले ग बीभत्सेकडे कडे झुकणारे = पोरी जरा जपून दांडा धर

In reply to by सुबोध खरे

चौथा कोनाडा 07/10/2024 - 17:15
लै भारी... हे वाक्य पहिल्यांदाच ऐकलं / वाचलं... हा हा आ हसलो... द्विअर्थी चित्रपट पुरस्कार विजेते दादासाहेब कोंडके यांना विनम्र अभिवादन

In reply to by भागो

चौथा कोनाडा 24/10/2024 - 14:30
जवळजवळ झोपायची वेळ झाली आहे."
या विनोदाबद्द्ल https://www.misalpav.com/node/52548 या धाग्यातल्या यु ट्युब लिन्क मध्ये खतरनाक किस्सा आहे ! हा हा हा !

In reply to by चौथा कोनाडा

आग्या१९९० 25/10/2024 - 19:27
' जवळजवळ झोपायची वेळ झाली ' हा विनोदी संवाद सत्तरच्या दशकात ' गाढवाचं लग्न ' ह्या वगनाट्यातील सावळा कुंभार आणि गंगी ह्यांच्यामुळे खूप फेमस झाला होता.

In reply to by आग्या१९९०

चौथा कोनाडा 26/10/2024 - 18:24
हा .... हा .... हा .... ! ' गाढवाचं लग्न ' आणि "विच्छा माझी पुरी करा" म्हंजे नुसता दंगा असायचा. काय धम्माल यायची .. प्रेक्षक गडाबडा लोळायचे .. हसुन हसुन मुरकुंडी वळायची ! प्रासंगिक सामाजिक आन राजकिय पंचेस अफलातुन असायचे ! गेले ते दिवस !

Bhakti 07/10/2024 - 10:29
बाई...आधीच इथे पुरूषांचा वावर अधिक,आणि ही' थीम :) यावं की नाही इथे दिवाळीत ;) एखादा पुरुषाच्या नावाचा डूआयडी काढून ठेवायला पाहिजे होता. खुप खुप शुभेच्छा! मराठी भाषेचा इतिहास वाचायची उत्सुकता _/\_

In reply to by Bhakti

हा हा हा अहो भक्ती ताई, तुम्हाला म्हाहीत नाही पुर्वी इथे पाशवी शक्तींचा इतका सुळसुळाट होता कि मिपा प्रशासनाने त्यांना स्वतंत्र दालन काढुन दिलं होतं ! महा म्हणजे त्याला जे नाव दिलेले होते ते एका कोळ्याच्या प्रजातीचे नाव होते , बेकार हसलेलो. पण तोही प्रतिसाद उडवण्यात आला होता . त्याकाळी कित्येक मिपाकर वैतागुन लिहायचे बंद झाले होते तेव्हा :( anahita असो , मिपावरचे कोळी गेले, जळमटं हटली , आता कुठे थोडी मोकळी हवा खेळेल अशी आशा निर्माण झाली आहे . मला नाही वाटत की कोणीही सभ्यता सोडुन काहीही अश्लाघ्य असे लेखन करेल . रादर , शॄंगारिक लिहिता येणे हीच मुळात एक परिक्षा असते कारण त्यात अश्लीलता असभ्यता आणि शॄंगार आणि मादकता ह्याती सीमा सांभाळावी लागते . बघु किती जणांना जमते ते !!

In reply to by Bhakti

चौथा कोनाडा 08/10/2024 - 17:46
मिपाकर कन्या/महिला गौरी देशपांडे शैलीत "धीट" कथा लिहू शकतात्च की ...किंबहुना लिहावीच आणि आपल्यातील प्रतिभेचे दर्शन घडवावे.. उत्तम संधी आहे व्यक्त होण्याची !

In reply to by चौथा कोनाडा

अकिलिज 16/10/2024 - 19:40
शेक्सपिअर नावाचा 'क्ष' चित्रपटात कामं करणार्‍या नटाची मुलाखत होती. त्याने सांगितलं की अश्या चित्रपटांना दिग्दर्शित करणार्‍यांमध्ये स्त्रियांचे बर्‍यापैकी प्रमाण आहे. उगाचच टॅबू बनवून ठेवला आहे.

In reply to by Bhakti

बाई...आधीच इथे पुरूषांचा वावर अधिक,आणि ही' थीम :) यावं की नाही इथे दिवाळीत ;) एखादा पुरुषाच्या नावाचा डूआयडी काढून ठेवायला पाहिजे होता.
महिला आयडी घेऊन महिलांना व्यनीमनीच्या गोष्टी करणारे मिपावर होऊन गेले आहेत. होऊन गेले आहेत म्हणजे आताही अदलून बदलून येत असतील वाटतं. =)) -दिलीप बिरुटे =))

In reply to by मनिष

चौथा कोनाडा 09/10/2024 - 10:19
या तीन थीम पलीकडचे लेखन चालेल ना?
चालेल का.? म्हणजे काय.. अहो धावेल.. पळेल..
दिवाळी अंकाकरिता मिश्र थीम असली तरी थीम बाह्य लेखनाचेही (कथा, कविता, ललितलेखन, विज्ञान-तंत्रज्ञानाधारित लेख, प्रवासवर्णन, पाककृती, भाषांतर आणि व्यंगचित्रे इत्यादी.) प्रतिवर्षी प्रमाणे सहर्ष स्वागतच आहे!
असं आवाहनात म्हटलंच आहे की. सहर्ष स्वागत आहे. जरूर लिहा ) (एक टीप : राजकारण अति झालंय, टीव्ही, यू ट्यूब फेसबुक सोशल मीडिया यां वर सतत हेच ऐकून माझा जीव कंटाळलाय.. मी तरी राजकारणावरील वाचेन असं वाटत नाही. १८+ साहित्य .. त्ते तर आमचे जीवन सत्व आणि जवान सत्व.. डॉक्टरांनी लिहून दिलंय म्हणजे तो डोस तर घ्यायलाच हवा ) कोणत्याही विषयावर बिनधास्त लिहा.. नक्की वाचणार आणि कमेंट देणार शुअर. होऊन जाऊ द्या लेखन सुरू

चौकस२१२ 08/10/2024 - 14:07
" महाराष्ट्र्र विधानसभा गेली ५ वर्षे" यावर लिहावे म्हणतो त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांची घटना कुठे मिळेल काय ?

In reply to by चौकस२१२

राघव 09/10/2024 - 15:25
पक्षघटने बद्दल माहित नाही. पण लिहायचे असेल तर जास्त कष्ट न घेता लिहिता येईल की.. :-) फार नाही.. अबांचे दोन-तीनशे प्रतिसाद संगतवार लावून छापून द्यायचे.. हाय काय नि नाय काय! हघे. ;-)

In reply to by चौकस२१२

चौथा कोनाडा 09/10/2024 - 15:49
शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांची घटना कुठे मिळेल काय ?
खरं तर त्या त्या पक्षाच्या संकेतस्थळावर हवी ! पन मी काय म्हंतो ....... सध्याच्या परिस्थितीत राजकिय पक्ष आन त्यांच्या घटना / संविधान यांचा संबंध येतोच कुठे ? (रोज एकमेकांवर वाट्टेल ते आरोप करत असतात.. आन त्यातला एक ही सिद्ध होत नाही ! ) कधी तरी अडचणीत आले आन सारवासारव करायला काही नसलं की पक्षघटनेची यांना आठवण येते ! हे पक्षघटनाच्या नादी लागलं नाही तर लेख लिहिण्याच्या वेळ वाचेल ... अन मिळालीच तर ते मुद्दे नंतर कसे जोडता येतील हे बघता येईल !

In reply to by चौथा कोनाडा

चौकस२१२ 10/10/2024 - 05:00
राजकिय पक्ष आन त्यांच्या घटना / संविधान यांचा संबंध येतोच कुठे ? येतो त्यावर तर मला लिहायच आहे आणि संपादकांची काही हरकत नाही( नागरिक शास्त्राच्या दृष्टितनेतून) मुळात गोम तिथेच आहे हा मुद्दा आहे माझा कसे ते सविस्तर आणि इतर समांतर उद्धरणे देऊन पण त्यासाठी आधी या घटना हाती पडल्या तर पुढे

In reply to by चौकस२१२

अथांग आकाश 10/10/2024 - 08:38

इथे मिळेल https://www.eci.gov.in/constitution-of-political-party

चित्रगुप्त 08/10/2024 - 21:34
सध्या AI निर्मित शृंगारिक चित्राबद्दल बरेच प्रयोग रसिक मंडळी करत आहेत, त्यातलाच मीही एक. अर्थात तसली चित्रे मिपावर कितपत चालतील ही शंकाच आहे. यात "बीभत्स किंवा अश्लीलतेकडे झुकणारे नसावे ही एकमेव अट" असली तरी अश्लीलतेची नेमकी मर्यादा कुठून सुरु होते, याबद्दल काही मार्गदर्शन मिळाल्यास उत्तम. वाटल्यास अशी काही चित्रे व्यनिद्वारे सध्या पाठवू शकतो. कळवावे.

In reply to by चित्रगुप्त

सौंदाळा 09/10/2024 - 16:20
दिवाळी अंक आणि शृंगारिक चित्र म्हटले की 'आवाज' हा दिवाळी अंक पटकन डोळ्यासमोर येतो. अजुनही मगदूम आणि पाटकर दोघांचेही 'आवाज' दिवाळी अंक आवर्जून वाचतो.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

चौथा कोनाडा 10/10/2024 - 20:21
अगदी खरंय ! 'आवाज' हा दिवाळी अंकाने इतिहास रचला अन मग बाकी त्याचे अनुकरण करू लागले. मेनकाने देखील शृंगारिक साहित्य प्रकारात स्वतः एक उच्च दर्जा राखला होता हे ही आठवते. आता मिपा दिवाळी २०२४ मधील या विभागाला पुढील पैकी एखादं नाव देता येईल !
मिपाकरांचा आवाज मिपाकरांची जत्रा मिपाकरांची रंभा मिपाकरांची मेनका मिपाकरांची उर्वशी

In reply to by चौथा कोनाडा

प्रचेतस 10/10/2024 - 20:39
पूर्वी 'काकोडकर दिवाळी' नामक दिवाळी अंक तसल्या साहित्यासाठीच प्रसिद्ध होता असे इथल्या चोखंदळ वाचकांना स्मरत असेलच.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 11/10/2024 - 20:16
येस्स... आठवला... जाणकार मिपाकरांनी या वर एक लेख लिहायला हरकत नाही. नाव, उदाहरणार्थ : दिवाळी अंकातील शृंगारिक अभ्यंग स्नान

संपादक मंडळ , नमस्कार . सगळ्यात आधी ,या वर्षीचे विषय आपण भारी निवडले आहेत . तिन्ही . आपल्या अंकासाठी मी - चांदके पार - ही कथा पाठवली आहे . १८ + साठी . अंकाला खूप शुभेच्छा !

भागो 25/10/2024 - 10:23
हा घ्या अजून एक. माझ्या मित्राने बेडरूम मध्ये एका नग्न स्त्रीचे कॅलेंडर आणून लावले. बायको म्हणाली, "अरे तू म्हणजे अगदी ताळतंत्र सोडलेस. नागड्या बायकांची कॅलेंडरं लावतो आहेस." "अगं ती नागडी थोडीच आहे? नीट बघ. पायात मोजे घातले आहेत बघ."

सर्व मिपाकरांना सप्रेम नमस्कार, विनंती विशेष, श्री गणेश लेखमाला सफल संपूर्ण झाली की मिपाकरांना वेध लागतात ते आपल्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असलेल्या "मिपा दिवाळी अंकाचे".

अभिजात मराठी

बाजीगर ·

In reply to by Bhakti

बाजीगर 07/10/2024 - 23:33
आपणच एकटीने दखल घेतली आहे, बाकी मंडळींनी दूर्लक्ष केलं आहे, कारण या राजकीय निर्णयाने आपल्या आयुष्यात काहीच फरक पडला नाही !

प्रचेतस 08/10/2024 - 08:01
ह्यात कन्नडचाही उल्लेख आवश्यक होता असे वाटते. कारण ह्या दोघी भगिनी आहेत. मऱ्हाटी संस्कृती : काही समस्या ह्या शं. बा. जोशी लिखित पुस्तकात कन्नड मराठीचा अनुबंध उलगडून दाखवला आहे. मराठी कन्नडपासून उत्क्रांत झाली हे त्यांचे मत बहुतांशी वादग्रस्त किंवा न पटण्याजोगे असले तरी दखल घेण्याजोगे आहे हे निश्चित.

In reply to by प्रचेतस

श्वेता२४ 08/10/2024 - 11:09
प्रचेतस यांच्या मताशी सहमत. माझा जन्म कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागाजवळचा. मराठीतील बरेच शब्द व कानडी शब्द सारखे आहेत. किल्ली,कडबू,अक्का,अण्णा इ. असो. कवितेतून बऱ्याच गोष्टींचा समावेश झाला आहे. काव्य हे उत्स्फुर्त असते. त्यामुळे त्यातल्या तपशीलापेत्क्षा भावनाप्रकटन महत्वाचे. कवीता अतीशय आवडली.

In reply to by प्रचेतस

सागर 09/10/2024 - 01:59
कन्नड आणि मराठी या भगिनि भौगोलिक कारणांनी आहेतच. पण सातवाहन काळात उत्तर कर्नाटक चा बराच भाग अधिपत्याखाली असल्याने महाराष्ट्राचे पैठण, तेर, नाणेघाट ते उत्तर कर्नाट्क यांच्यात संस्कृती आणि व्यापार यांचे आदान प्रदान झाल्याने एकमेकांवर प्रभाव आणि ठसा उमटणे हे होणारच. जशी कन्नड भाषेची लिपी ही तेलुगू लिहिण्यासाठी देखील वापरली जाते. याचे कारण पुन्हा तेच. आंध्र आणि उत्तर कर्नाटक यांचा एकमेकांवर असलेला सांस्कृतिक आणि व्यापारी आदान प्रदाना मुळे झालेला प्रभाव. त्यामुळे तेलुगू आणि कन्नड एकाच लिपीत लिहिले जात असले तरीही भाषा मात्र भिन्न आहेत. आणि त्यांच्यातही भरपूर साम्यस्थळे आहेतच. एकूणच भाषा प्रवाही असणे हे त्यातून दिसते. आणि अशा प्रवाही भाषाच काळाच्या ओघात टिकून राहतात. जवळपास १५ ते २० कोटी लोक मराठी भाषा बोलतात, वाचतात लिहितात हाही एक आपल्या माय मराठीसाठी एक अभिमानाचीच गोष्ट आहे. अभिजात दर्जाच्या निकषांची पूर्तता करण्यासाठी अनेक लूप होल्स आहेत हे मान्यच आहे. पण रंगनाथ पाठारे समितीने शिफारस केलेल्या अहवालात पुरेसा डाटा आहे ज्यावरून केंद्र सरकारला मराठी भाषा अभिजात आहे या निष्कर्षाला येण्यासाठी वेळ लागला पण अडचण आली नाही. पुढे मागे हा अभ्यास भाषातज्न्य पुढे नेतील आणि अजून वस्तुनिष्ठ पुरावे मांडतील अशी अपेक्षा करूयात :)

In reply to by सागर

सुरिया 09/10/2024 - 12:08
त्यामुळे तेलुगू आणि कन्नड एकाच लिपीत लिहिले जात असले तरीही भाषा मात्र भिन्न आहेत. आणि त्यांच्यातही भरपूर साम्यस्थळे आहेतच. नाही. बिल्कुल नाही. असे म्हणणे म्हण्जे मराठी (देवनागरी) बंगाली आणि गुजराती एकच लिपि आहे असे म्हणावे लागेल. कन्नडा आणि तेलुगु मध्ये काही अक्षरे जरी सारखी असली तरी स्ट्रोक्स आणि वळणे भिन्न आहेत. काही अक्षरे सुध्दा वेगळी आहेत. जोडाक्षरांची पध्दत वेगळी आहे. केवळ शिरोरेषा नसणे ह्या निकषावर दोन्ही लिपी एकच म्हणणे म्हण्जे हास्यास्पद आहे. तसे सारखी लिपी आपण नेपाळी आणि देवनागरी ला म्हणू शकतो तसे कन्नडा आणि तेलुगुचे नाहिये.

In reply to by सुरिया

अथांग आकाश 10/10/2024 - 08:52
चांगली माहिती दिलीत! दोन्ही लिपी वेगळ्या आहेत एवढे माहित होते त्यामुळे >>तेलुगू आणि कन्नड एकाच लिपीत लिहिले जात असले तरीही भाषा मात्र भिन्न आहेत >>हे वाचुन चक्रावलो होतो!!

In reply to by सुरिया

सागर 10/10/2024 - 10:54
मला कन्नड आणि तेलुगु दोन्ही भाषा येत नाहित. लिपि ही केवळ भाषा प्रकट करण्याचे माध्यम असते. त्यात भाषे नुसार बदल होऊ शकतात. जशी संस्क्रुत इसवी सनाच्या ८ व्या शतका पर्यन्त ब्राह्मि लिपित लिहिली जायची. प्राक्रुत देखिल ब्राह्मि लिपित लिहिलि जात होति. पण भाषा वेगळ्या होतात. लिपि भाषे नुसार बदलते एवढाच मुद्दा होता. मी काही दाक्षिणात्य भाषा तज्न्य नाही. पण लिपि पूर्ण वेगळी आहे हे माझ्या वाचनात आले नाही.

सागर 09/10/2024 - 01:49
२०१२ साली अस्तित्वात आलेल्या रंगनाथ पाठारे अध्यक्ष असलेल्या समितीने महाराष्ट्र राज्य सरकार कडे सुपूर्त केलेला हा अहवाल केंद्र सरकारने एकदाचा मान्य केला आणि अभिजात भाषेचा दर्जा आपल्या माय मराठी ला मिळाला. कित्येक दशकांची भाषा धुरिणांची मेहनत फळाला आली. मागे अनेकदा मिपावर देखील मराठी भाषा अभिजात आहे की नाही यावर अनेकदा चर्चा झाल्या आहेत. संपादकांना शक्य झाले तर अशा चर्चा आणि लेख एका धाग्याखाली / टॅग खाली एकत्र करून मुख्य पानावर "अभिजात मराठी भाषा" किंवा तत्सम योग्य शीर्षकाद्वारे लिंक देऊन एकत्र करता आले तर छान होईन. असो.. तर अभिजात म्हणजे अन्य कोणत्याही भाषेपासून उत्पत्ती न झालेली आणि किमान २,००० वर्षे जुनी असलेली भाषा. त्यामुळे मराठी भाषेला अनेक विद्वान संस्कृतोद्भव किंवा अन्य भाषेपासून उत्पन्न झाली असे मानत होते त्या मिथकाला हा तडा आहे. शिवाय इतर देखील काही निकष आहेतच. त्याचा काथ्याकूट आधी अनेकदा झाला आहे. या सर्वांचा शेवट एकदाचा गोड झाला. आता आपण आपल्या मराठी भाषेच्या पुढील प्रवासासाठी अभिजाततेची ही शिदोरी घेऊन पुढे जाऊयात.

In reply to by सागर

चौकस२१२ 09/10/2024 - 11:13
मराठी ला हा दर्जा प्राप्त झालला या बद्दल अभिनंदन पण संस्कृत शी काहीच संबंध नाही ??? संस्कृत नंतर प्राकृत आणि मग मराठी असे नाही का झाले ? संस्कृत, बंगाली हिंदी मराठी गुजराथी यांचाच संस्कृत शी काही संबंध नाही? काय एकदम उगवल्या का त्या भाषा

कंजूस 10/10/2024 - 09:34
भाषेला अभिजात मानांकन मिळाले याविषयी चर्चा असेल असे वाटले होते. आजच्या लोकसत्तामध्ये - यांच्या लेखामुळे मला बरेच काही कळले. 'अभिजात'तेची राजकीय पाळेमुळे' लेखक प्रमोद मुनघाटे अभिजात मराठीला कवितेत मांडलेले आवडले.

विवेकपटाईत 10/10/2024 - 10:10
अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे सर्व विश्वविद्यालयात मराठीच्या प्रोफेसर ची नियुक्ती होणार. बहुतेक 20 एक वर्षांपूर्वी दिल्ली विश्वविद्यालयात मराठी शिकवणाऱ्या प्रोफेसरशी भेट झाली होती त्यावेळी त्यांना सहज विचारले होते ,किती मुले मराठी शिकतात. त्यावर ते फक्त हसले. मराठीत एमबीबीएस, इंजिीअरिंग, आर्किटेक्ट इत्यादी विज्ञानाच्या शाखांचे विषय जो पर्यंत शिकविले जात नाही तो पर्यंत अभिजात देऊन काहीही फायदा नाही. फक्त चार पाचशे प्रोफेसरांना नोकरीत देण्यासाठी सरकारचा खर्च होईल.

सालंकृत नटली मराठी, झाली अभिजात मराठी ।। कोल्हापूर,जळगाव गोवा कोकण नागपूर सातारा सांगली मराठी, अनेक स्वादांची, सर्वच चांगली मराठी ।। आंग्लमिश्रीत भ्रष्टतोमय मराठी, सावरकरांची शुद्ध तेजोमय मराठी ।। शासकीयपत्रातील दूर्बोध गूढ मराठी, ओव्या अभंगातील गोड मराठी, संगणक प्रोग्रामींग शिकवणारी अर्वाचीन मराठी, शिलालेखांवर सापडणारी प्राचीन मराठी ।। फार्सीमिश्रीत बखरींतील मराठी, दलीत साहीत्य तसेच नारायण सूर्वेंची जळजळीत कष्टकरींतील मराठी ।। खांडेकर, कुसुमाग्रज, ग दि माडगूळकर,रणजित देसाई,अच्यूत गोडबोले यांची मराठी, शिवाजी सावंत, मृत्यूंजय मराठी, विश्वास पाटील, पानीपत मराठी ।। ब

दिवाळी अंक २०२४ :)

अनन्त्_यात्री ·
यंदाचा दिवाळी अंक आमच्या संस्थळावर आलाच नाही सदरहू जिलब्या आम्ही स्वप्नातच पाडल्या आहेत कालपर्यंत लेखकूनी कोणापाशी तक्रारी मांडल्या नाहीत कीबोर्ड जळमटले, डोळे शिणले संस्थळावर जिलब्यांसाठीचे आवाहन शोधित फिरलो अभिजात भाषेचे नवे सोवळे नेसून भिरभिरलो पण यंदाचा दिवाळी अंक आमच्या संस्थळावर आलाच नाही... (वरील खरडीचे एखाद्या ज्ञात कवितेशी साधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजावा..)

तृषा

Bhakti ·
चमचमणारी चांदणी मला व्हायचीच नाही, काळ्याकुट्ट रात्री ती चंद्राशिवाय एकटीच झुरत राहते... पहाटेची उषा मला व्हायचीच नाही विखुरलेल्या किरणांनी सूर्य हट्टाने तिला होरपळतो... रंगीत फुलपाखरू मला व्हायचेच नाही कोमल फुलाला नकळतही टोचून बढेजाव मिरवायचा नाही... मला व्हायचंय नदी...सरिता... खळखळ मधूर नादात अस्तित्व माझं जपतं तुझ्या कुशीत शिरणार आहे नदी-समुद्राच्या मिलनात तू माझा समुद्र होशील ना.. तिथे तृषा विरेल बहरेल अंतरंग गहिरे -भक्ती

परतीचा पाऊस...

चक्कर_बंडा ·

Bhakti 03/10/2024 - 21:03
खुप सुंदर
इतका ही कोरडा होऊ नकोस रे की भिजण्याचे प्रयोजनचं संपेल इतका ही अलिप्त होऊ नकोस की जगण्याचे कारणचं खुंटेल..
अगदी अगदी!

थोडासा चिडलेला.... अंमळ रुसलेला.. परतीचा पाऊस... विजांच्या मागून जोरदार गरजला बरसून दमल्यावर रस्त्यात भेटला सवयीप्रमाणे थोडावेळ दाटला मग जाताना कानात पुटपुटला... कागदाच्या होड्या सोडताना आताशा भेटत नाहीस ? पन्हाळीखाली चिंब भिजताना मुळी दिसतचं नाहीस ? अनवाणी पायांनी वाहत्या पागोळ्यांमागे धावत ही नाहीस की ओंजळीत विरघळणाऱ्या बर्फ़ाळ गारा वेचित नाहीस इतका मोठा झालास की पावलांना गुंजभर चिखल ही लागु देत नाहीस इतका थोर झालास की कपड्यांवर थेंबभर ओलसुद्धा सहन करीत नाहीस.. गड्या !!

रानफुले

पाषाणभेद ·

गणेशा 14/10/2024 - 13:19
मस्त... खूप दिवसांनी मिपा आणि कविता विभाग पाहिला... आणि तुमची कविता वाचली सुरेख.. हल्लीच मारुती चितमपल्ली वाचतोय, त्यामुळे निसर्ग.. वाटा.. फुले.. पक्षी ह्या सर्व वर्णनांनी भारावून गेलोय, त्या मुळे कविता जास्तच आवडली...

असाच भटकत रानात असता रानफुले समोर येती नव्हता कसला गंध तयांना रंगही नव्हते भरजरी विविध परी तयांत होती नक्षी बारीक नाजूक सुंदर कोमल पिवळे गेंद उन्हात चमके वार्यावरती डौलाने डुलके वेड लागले मलाच तेथे दृष्य मनोरम खरोखर ते डोंगर उतार पठारावरती फुले पाहता लागली समाधी घोस तयांचे लेऊन घ्यावे वाटले तक्षणी अंगावरती एकरूप व्हावे, तेथेच रमावे परत न फिरावे घराप्रती बघतो जेव्हा अचानक रानफुले समोरी येती - पाभे (03/10/24) (काल डोंगर उतारावर पाहिलेले दृष्य)

पारनेर -४ (कोरठण खंडोबा)

Bhakti ·

Bhakti 02/10/2024 - 21:22
Q माझ्या कुळाचे आधीचे नाव 'पोळ' आहे (गाव पारनेर मधील जामगाव आहे )याचा या लेखात उल्लेख आहे.पण त्याच्या पुढील वाचता येत नसल्याने काय लिहिलंय ते नीट समजत नाही.

प्रचेतस 03/10/2024 - 11:56
कोरठणचा खंडोबा कुलदैवत असल्याने तिथे खूपदा जाणं झालंय. जवळच दर्याबाईचं मंदिर आहे, तिथले लवणस्तंभ बघण्याजोगे आहेत. तर अणे घाटात गुळुंचवाडीचा शिलासेतू दरीत उतरून बघता येतो. जुनी लेणी/ मंदिरे, नैसर्गिक आश्चर्ये ह्यांनी हा परिसर संपन्न आहे.

In reply to by गणेशा

Bhakti 14/10/2024 - 13:34
पारनेर या गावावरून असंख्य आठवणी पुन्हा मनात साद घालतात..
माहितेय ओ! माझं पूर्वजांचे अस्तित्व इथं अनेक पिढ्यांपासुन होते.मला तर पारनेर म्हटलं की रोमांचकारी वाटतं.

A स्वयंभू खंडोबा म्हाळसा बानू सह तांदळा

शोनार बांगला...! समाप्ती – ढाका बांगलादेश

समर्पक ·

प्रचेतस 02/10/2024 - 18:53
एकदम ऑफ बीट आणि उत्तम मालिका झाली ही, ह्याआधी कधीही न पाहिलेली आणि ऐकलेली ठिकाणे बघायला मिळाली. बंगालचा समृद्ध वारसा शेवटच्या घटका मोजत असलेला बघायला मिळतोय.

श्वेता२४ 02/10/2024 - 20:56
'उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम्। वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र सन्ततिः॥' अशा, राजकीय भारताबाहेरील भारती जनांची भेट घ्यायची असेल तर ते लोक प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यासाठी तग धरून आहेत त्या स्फुर्तीस्थानांना भेट दिली पाहिजे प्रत्येक हिंदू बांधवांचे हे एक आवश्यक धार्मिक कर्तव्य असले तरी यासाठी मनाशी प्रचंड संकल्प व दृढ निश्चय हवा. आपली यात्रा सोपी नव्हती. आपण ती संकल्प पूर्वक केलीत म्हणूनच ती संपन्न झाली. अन्यथा हे सामान्य माणसाचे काम वाटत नाही. कोणत्याही परिस्थितीत जे मिळेल ते वाहन, जे मिळेल ते अन्नग्रहण करून राहायचे, यासाठी मनोनिश्चय महत्त्वाचा!!! बंगालचे आजचे स्वरूप व त्याचा भूतकाळ याची अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या या लेखमालेतून मिळाली. सदर लेखमाले करता मनःपूर्वक धन्यवाद!

झकासराव 03/10/2024 - 13:49
सुंदर।लेखमाला. एक अतिशय महत्वाचा दस्तावेज तयार झालाय आता इथून पुढे तिथे सामान्य भारतिय मनुष्याला acess असणार का किंवा कसे हे ही गुलदस्त्यात आहे।

सौंदाळा 07/10/2024 - 11:15
नवरात्रीच्या शुभपर्वात या मालिकेद्वारे एक से एक सुंदर लेख वाचायला मिळाले. आजपर्यंत फक्त देवीची महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे माहिती होती. एकूण किती शक्तीपीठे आहेत (याच लेखमालेत ५१ वाचल्यासारखे वाटत आहे) आणि कुठे आहेत?

In reply to by समर्पक

सौंदाळा 11/10/2024 - 12:45
धन्यवाद, लेख वाचला. भरपूर नविन माहीती मिळाली. देवीची बरीच शक्तीपीठे बंगाल (पश्चिम बंगाल, बांग्लादेश) मधे असल्याने इकडे देवीची उपासना पुरातन काळापासून होते हे पण समजले. आणि बरीच शक्तीपीठे लुप्त / नष्ट झाली हे कळल्यावर वाईट वाटले.

टर्मीनेटर 14/10/2024 - 13:35
समर्पक भाऊ... मस्तच झाली मालिका 👍 कित्येक अनवट ठिकाणांचा समावेश असलेल्या ह्या अनोख्या भटकंतीतुन खुप छान माहिती मिळाली! धन्यवाद.

सर्व लेख वाचले नी खूप आवडले. बांग्लादेश आणी पाकिस्तान ह्याबदल नेहमी एक आकर्षण वाटतं. बांग्लादेश त्यामानाने बराच सौम्य वाटतो. कदाचित पूर्व बंगाल हा मुस्लिमबहुल नसता आणी आपलाच असता तर किती आनंद असता?? बंगाल आणी पंजाब हे भारतातील शक्तिशाली राज्ये फाळणीमध्ये दुभंगून आक्रसली, त्यांचे अश्रू आपल्याला कळणार नाहीत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Bhakti 30/10/2024 - 07:35
अशाप्रकारे कोणी सिंध प्रांत सध्या पाकिस्तानात आहे याची भटकंती भारतीय हिंदूच्या नजरेतून केली असेल ना,ते पण वाचायला पाहिजे.ती सिंधू नदी, शंकराचार्यांच्या काळातील शारदा पीठ ....

. आज पुन्हा एकदा सर्व लेख वाचले! बांगलादेश फिरवणारी ही एकमेव मालिका असावी. अखंड बंगालचा नकाशा स्वातंत्र्याआधीचा अतिशय सुंदर दिसतो, बंगालची अशी शकले उडतील असे तेव्हा कुणाला वाटले असेल? बांगलादेश झाल्यामुळे कलकत्त्याची नैसर्गिक बाजारपेठ नि त्यामुळे. राय गेली, चितगाव गमावून भारतने खोल पाण्याचे शक्तिशाली बंदर गमावले! बंगाल सारखा सुबत्ता नी सुपिक असलेला प्रांत गमावून भारताचे खूप मोठे नुकसान झाले आहे! ह्या लेखमालेसह इतरही लेख वाचले, ग्रामिण शेतकर्यात इस्लाम पॉपुलर झाला होता त्यामुळे हिंदू जमीनदार नी मुस्लिम शेतकरी संघर्ष झाले, पण शेतकऱ्यात इस्लाम पॉपुलर होण्यामागे टोकाचा जातीभेद कारणीभूत असावा? म्हणजे आजच्या बंगालची शकले उडायला हिंदू धर्मच कारणीभूत आहे, आजही पश्चिम बंगालची कथा काही वेगळी वाटत नाही!

Sansad जातीय (राष्ट्रीय) संसद, ढाका