मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेषित

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
भौतिकशास्त्रातील जटिल भानगडींनी भंजाळून जायचो तेव्हा आइन्स्टाईन एक अप्राप्य आदर्श -नव्हे प्रेषितच- वाटायचा मग एकदा लोबाचेव्स्किच्या भन्नाट भूमितीने युक्लीडच्या भारदस्त भूमितीला जिथे फाट्यावर मारले तिथे अगदी तिथेच पिंजारल्या पिकल्या केसांचा मिश्किल म्हातारा उपटला. म्हणाला," अरे ठोंब्या, भौतिकीतील न्यूनत्व सावरणाऱ्या सापेक्षतावादाची पुरेशी पुंजी माझ्या गाठीशी असूनही पुंजवाद पचनी पडलाच नाही माझ्या अन् शिवाय UFT(#)च्या गाठोड्याची गहन गाठ सोडवूच शकलो नाही शेवटपर्यंत" तेव्हा कळलं प्रेषितांचे पाय मातीचेच असणं हा नियम असतो अपवाद नव्हे :) ~~~~~~~~~~~~ (#): Unified Field Theory

वाचने 1022 वाचनखूण प्रतिक्रिया 2

वाह, आपल्या कवितांमधून विलक्षण, अज्ञात, अथांग, अज्ञात, नेणीव , वगैरे गीचामिड अनाकलनीय शब्दांची जळमटे हटून स्पष्ट सध्या सोप्या शब्दातील कळेल अशी कविता बाहेर येऊ पाहात आहे. ही प्रगती वाखानाण्याजोगी आहे गटणे! कॅटरपिलर चे फुलपाखरू होण्याच्या मार्गावर आहे तर ! पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा !