अम्रीकेच्या वाटे कुचूकुचू काटे
खिशाला फुटतात शंभर फाटे
तेवीस किलोत फक्त कपडे चार
आवांतर सामानाची गर्दीच फार
महिनाभर आगोदर येते यादी
म्हातारी वादी, म्हातारा प्रतिवादी
बुधानी,कल्याणी,चितळे, कयानी
वडी,सांई,जरा बेतानी खर्च करा नी
कलश,कालनिर्णय,कढाई,पेशवाई
रोज पॅन्ट शर्ट तरी पैठणीची अपुर्वाई
म्हातार्याची वडवड,चश्म्याची वाट
पायाला भिंगरी अन कण्हारली पाठ
सामानाची मांदियाळी बॅगा झाल्या भारी
काय सांगू,अम्रिकेच्या आधी पुण्याची वारी
तयारी झाली ,म्हातारीनं घेतली बॅक सिट
म्हातार्याच्या नावानं फाडतीया तिकीट
पिझ्झा, बर्गर...
छान मसत विनोदी कथा /हकिकत
In reply to छान मसत विनोदी कथा /हकिकत by nutanm
खूप हसायला मिळाले . स्रिमनत
In reply to खूप हसायला मिळाले . स्रिमनत by nutanm
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
हॅहॅहॅ !
In reply to हॅहॅहॅ ! by वामन देशमुख
धन्यवाद
हा हा हा
In reply to हा हा हा by यश राज
धन्यवाद
मस्तच
In reply to मस्तच by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
मस्त कथा, आवडली