Skip to main content

जर्द पिवळी दुपार

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 16/04/2025 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
जर्द पिवळी दुपार दार ठोठावत येते आत आत कोंडलेले झळीनेच धुमसते घोर फुफाटा धुळीचा अणु रेणू तापलेला मृगजळाच्या काठाशी निवडुंग फोफावला गारव्याची शीळ निळी दूर विजनी घुमते तिथे पोचायचे कसे? बेडी पायात काचते
लेखनविषय:

वाचने 1835
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

जर्द पिवळी दुपार ... गारव्याची निळी शीळ ... -- एकदम चपखल. तिथे पोचायचे कसे? बेडी पायात काचते -- हे मात्र समजले नाही. 'तिथे' म्हणजे कुठे ? आणि 'बेडी' कसली ?

In reply to by चित्रगुप्त

"तिथे" = गारव्याच्या निळ्या शिळीसारखे अंतर्बाह्य सुखावणारे आपापले श्रेयस जिथे वसते ती अप्राप्य जागा "बेडी" = "तिथे" पोहोचण्यापासून परावृत्त करणारी अनेक बंधने

"जर्द पिवळी दुपार"कार अनन्त्_यात्री यांची क्षमा मागून तसेच अथांग आकाश यांच्या सूचनेचा मान ठेवून "जर्द पिवळी विजार" झालेली काढून इथे धुवायला टाकली आहे!