सळसळणार्या फांद्यांवरती शेंगा फिक्क्ट सोनेरी
नायलॉनच्या दोर्यांवरती वाळत पडली पोतेरी
कसा बुडाला पलीकडे तो निर्देशांकाचा गोळा?
पैसे गेले, अपचन झाले , लागतही नाही डोळा
पुण्यभूवरी रस्त्यांवरती फलक लागले कसे झणी!
कर्जमाफीच्या लोण्यामध्ये मिश्या बुडवल्या कुणीकुणी!
तरला तरला पाण्यावरती! पहा मुखवटा चंदेरी!
साबण मागत फिरणार्यांची पहा उडाली भंबेरी!
प्रदेश आले , जाती आल्या, रंग, पंथ अन भाषाही
भोग - तेवढा धर्म एकटा! धर्म दुजा कुठला नाही!
निलाजरा मी ए.सी.मध्ये बसून कविता करणारा
शिव्या घालतो भणंग कोणी रस्त्यांवरती फिरणारा
मस्तच.
अतिशय सुंदर..
In reply to अतिशय सुंदर.. by प्राजु
प्राजु शब्दार्थाच्या दॄष्टीने तू सुचविलेले बदलही चालतील
सुरेख..